लसणीची फोडणी कोणत्याही पदार्थाला दिली की, तो पदार्थ खमंग आणि चविष्ट होतो. त्यामुळे अगदी भाजीपासून डाळीपर्यंत सगळ्यांना लसणीची फोडणी अगदी हमखास दिली जाते. लसणीचा फ्लेवर काही जणांना इतका आवडतो की, हल्ली व्हेज असो वा नॉनव्हेज या पदार्थांना लसूणची चव देऊन खास केले जाते. लसणीचा कांदा हमखास सगळ्यांकडे असतो. पण लसणीचा कांदा हा नुसता फोडणीसाठीच वापरला जात असला तरी देखील त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. लसूण खाण्याचे फायदे (Lasun Khanyache Fayde) हे जाणून घेतल्यानंतर त्याचा आहारात अन्य कोणत्या पद्धतीने कशापद्धतीने समावेश करायचा ते देखील जाणून घेऊया. लसणीमध्ये डाएटरी फायबर्स, कॅल्शिअम, आर्यन, कार्बोहायड्रेट आणि पोटॅशिअम असते. काळी लसूण हा देखील हल्ली खूप ठिकाणी खाल्ला जातो. काळी लसूणचे फायदे हे देखील जाणून घ्यायला हवेत.
लसूण खाण्याचे फायदे | Lasun Khanyache Fayde
लसूण का खायला हवी हे जाणून घेताना त्याचे फायदे म्हणजेच लसूण खाण्याचे फायदे (Lasun Khanyache Fayde) नेमके काय होतात ते जाणून घेऊया. आहारात लसणीचा समावेश करावा कसा ते देखील जाणून घेऊया
कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत (Lower Cholesterol)
शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढले की, त्याचा परिणाम हा ह्रदयावर होऊ लागतो. सध्याचे लाईफस्टाईल आणि खाण्याची पद्धती पाहता सध्या अनेकांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले दिसत आहे. अशावेळी सोपा असा उपाय करायचा असेल तर तुम्ही लसणीचे सेवन करायला हवे. एखाद्या पदार्थामध्ये किंवा नुसता लसूण खाल्ला तरी देखील त्याचे फायदे मिळू शकतात.
प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत (Support Immune System)
आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रतिकारशक्ती ही देखील चांगली असायला हवी. जर तुमची प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर तुम्ही लसूण खायला हवा. लसूण खाल्ला तर प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. शरीरामध्ये अनेक चांगले आणि उपयुक्त घटक वाढवून तुमच्यातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसूण मदत करते.
सेक्स वाढवते (Improves Sex)
अनेकांना सेक्सच्या संदर्भात अनेक तक्रारी असतात. ज्यांना सेक्ससंदर्भात तक्रारी असतील विशेषत: पुरुषांमध्ये शीघ्रपतनाचा त्रास असेल तर त्यांच्यामधील सेक्सची आवड टिकून धरण्यासाठी मदत करते. लसणीचे सेवन केल्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे सेक्सचे कार्य उत्तम चालते.
आजारपणावर लढते (Combat Sickness)
लसूण हे शरीरात उर्जा वाढवते. त्यामध्ये असलेली हिट ही तुम्हाला सर्दी, पडसे, ताप याला दूर ठेवण्यास मदत करते. जर तुम्हाला आजारपण आलेले असेल तर तुम्ही अगदी हमखास लसणीचे सेवन करायला हवे. ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील.
शरीरातील अँटीऑक्सिडंंट्स (Increase Antioxidants)
शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट्स घटक वाटले तर त्वचा, केस आणि आरोग्यासाठी त्याचे फायदे मिळू शकतात. लसणीमध्ये असलेले घटक हे वरील सगळ्या गोष्टींसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील अँटीऑक्सिडंट मिळवण्यासाठी तुम्ही लसणीचा समावेश करायला हवा.
डिटॉक्स करायला मदत (Help To Detoxify)
लसूणमध्ये असलेला सल्फर घटक हा शरीरातून डिटॉक्स काढायला मदत करते. दिवसातून तीन वेळा याचे सेवन केले तर शरीरातून फॅट्स आणि नको असेल्या गोष्टी बाहेर काढण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास डिटॉक्स करण्यासाठी याचे सेवन करायचा हवे. शरीरातील जड पदार्थ बाहेर काढून शरीराची शुद्धी करायला मदत करतात.
हाडांचे आरोग्य (Bone Health)
लसणीमध्ये ॲस्ट्रोजन नावाचा एक घटक असतो. ज्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. एका ठराविक वयानंतर हाडांची झीज होऊ लागते. विशेषत:महिलांना प्रेग्नंसीनंतर म्हणजेच प्रसुतीनंतर हाडांची झीज होण्यास सुरुवात होते. अशावेळी लसूणचे सेवन केले तर त्याचा फायदा हाडांना होऊ शकतो. जर तुम्हाला साधेदुखी असेल तर तुम्ही आहारात लसणीचा समावेश करायला हवा.
वजन कमी करण्यास मदत (Weight Loss)
लसणीमध्ये असलेले काही घटक शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात. लसणीचे पाणी डिटॉक्ससारखे प्यायल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. अँटी ओबेसिटी हा घटक असल्यामुळे वजन नैसर्गिकपद्धतीने कमी करण्यास मदत करते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हमखास लसणीचे सेवन करा. Lasun Khanyache Fayde जाणून घेताना हा महत्वाचा फायदा आहे जो अनेकांसाठी गरजेचा आहे.
ब्लडप्रेशरसाठी चांगले (Good For Blood Pressure)
शरीरामध्ये एंजियोटीन नावाचा घटक वाढला की, ब्लड प्रेशर वाढते. जे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी लसणीचे सेवन केले तर तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. रक्तदाब नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही लसणीचे सेवन करायला हवे. जर तुम्हाला लसणीचा स्वाद आवडत नसेल तर तुम्ही लसूण ठेचून त्याचे दुधातून सेवन करावे.
मधुमेह (Diabetes)
मधुमेह नियंत्रित करण्याचा विचार करत असाल तर लसूण हा फारच फायद्याचा असतो. रक्तातील साखर नियंत्रणात ठेण्यासाठी लसूण हा फारच फायद्याचा आहे. लसणीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे मधुमेह असणाऱ्यांचा त्रास कमी होतो.
घशाची खवखव (Sore Throat)
लसूण हे सर्दी, खोकला यासाठी फारच फायदेशीर असते. घशाची खवखव होत असेल तर अशावेळी तुम्ही लसूण काही काळासाठी मधात बुडवून ठेवावा. त्यामुळे तुम्हाला होणारी खवखव कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. सोललेला लसूण तुम्ही जर कच्चा खा. तो खाताना तो चघळत राहा. त्यामुळे घशाची खवखव कमी होण्यास मदत मिळते.
गरोदरपणात मदत (During Pregnancy)
गरोदरपणात लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. पण पहिल्या काही महिन्यातच ते खाणे योग्य असते. जर तुम्ही गरोदर असाल तर तुम्ही डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेऊन त्याचे सेवन करा. त्यामुळे तुम्हाला त्याचे काहीही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
असा करा आहारात लसूणचा वापर | Garlic Uses In Marathi
आहारात लसूणचा वापर कसा करायचा हे देखील जाणून घ्यायला हवे. लसणीचे फायदे मिळवण्यासाठी त्याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.
- लसणीचा उपयोग तुम्हाला डिटॉक्स करायचे असेल तर तुम्ही लसणीच्या काही पाकळ्या घेऊन त्या चांगल्या ठेचून घ्या. त्या पाण्यात टाका. पाणी उकळा आणि ते पाणी प्या. त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.
- लसणीच्या काही पाकळ्या घेऊन त्या तव्यावर हलक्या तेलात रोस्ट करा असे रोस्ट केलेले लसूण तुम्ही थेट चमच्याने खाऊ शकता.
- लसणीची पेस्ट करुन ती तुम्ही ती कोणत्याही पदार्थांमध्ये घालू शकता.
- पोळी किंवा पराठा यामध्ये बारीक केलेले लसणीचे तुकडे घेऊन तुम्ही ते छान रोस्ट करुन खाऊ शकता.
- लसूण फर्मेंट करुन त्याला काळे झाल्यानंतरही ते खाता येते असे लसूण हे औषधी असते.
FAQ’s
कच्चा लसूण खाण्याचे फायदे आहेत का ?
लसूण वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जाते. पण कच्चा लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. दिवसातून एकदा तरी कच्चा लसूणीची एक कळी खाल्ली तरी देखील त्याचे फायदे मिळतात. हाडांना बळकटी, निरोगी ह्रदय, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी,मेंदूचे कार्य चांगले राहण्यासाठी कच्चा लसूण हा फारच फायद्याचा असतो.
भाजलेले लसूण आरोग्यदायी असते का ?
खूप जण लसूण भाजून खातात. भाजून लसूण खाल्ल्यामुळे त्याचे फायदे अधिक वाढण्यास मदत मिळते. निरोगी ह्रदय आणि चांगल्या आरोग्यासाठी लसूण फारच फायदेशीर ठरतो. ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी लसूण मदत करते.
लसूण खाण्याचे दुष्परिणाम काय काय आहेत ?
लसूण आरोग्यासाठी लाभदायक असली तरी देखील त्याचे अति सेवन हे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. लसूण खाण्यामुळे पोट फुगणे, तोंडाला वास येणे, गॅस होणे अशा समस्यादेखील होऊ शकतात. त्यामुळे लसूण खाताना ती योग्य प्रमाणात खायला हवी.