#worldcup2019 च्या इतक्या जवळ जाऊन भारताला हार मानावी लागली. याचे दु:ख संपूर्ण देशाला आहे. विजयश्री हातात घेऊन भारतीय संघ मायदेशी परतेल अशी अपेक्षा असताना अशाप्रकारे पत्कारावी लागलेली हार सगळ्यांनाच लागून केली आहे. तो दिवस आपला नव्हता असे म्हणून आता प्रत्येक भारतीय आता ते विसरत आहे. तोच सोशल मीडियावर आरोप प्रत्योरोपाच्या गोष्टी घडू लागल्या आहेत. त्यातच महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या निवृत्तीच्या बातमीने गानकोकिळादेखील भावूक झाल्या. त्यांनी चक्क धोनीला तू निवृत्तीचा विचार मनातून काढून टाक असा सल्ला दिला आहे.
काय म्हणाल्या लता मंगेशकर
लता मंगेशकर यांनी या सदंर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणाल्या की, धोनी तुम्ही निवृत्ती घेणार अशी बातमी कानावर पडत आहे. निवृत्तीचा विचार तुम्ही मनातून काढून टाका.देशाला तुमची गरज असल्याचे लता मंगेशकर या ट्विटमधून म्हणाल्या आहेत. त्यांच्या या ट्विटवर अनेक रिट्विटही करण्यात आले आहेत. धोनीच्या फॅन्सनी देखील त्याला चिअरअप केले आहे. त्याला शुभेच्छा देत आम्ही तुझ्या पाठिशी आहोत असा विश्वास दिला आहे. शिवाय त्यांनी आपल्या टीमचा उत्साह वाढावा यासाठी एक गाणं देखील शेअर केले आहे. त्यामुळे आता पुढच्या #worldcup ची प्रतिक्षा आहे.
Namaskar M S Dhoni ji.Aaj kal main sun rahi hun ke Aap retire hona chahte hain.Kripaya aap aisa mat sochiye.Desh ko aap ke khel ki zaroorat hai aur ye meri bhi request hai ki Retirement ka vichar bhi aap mann mein mat laayiye.@msdhoni
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) July 11, 2019
Kal bhalehi hum jeet na paaye ho lekin hum haare nahi hain.Gulzar sahab ka cricket ke liye likha hua ye geet main hamari team ko dedicate karti hun. https://t.co/pCOy7M1d1Y
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) July 11, 2019
काय म्हणाला धोनी
धोनीला देखील त्याच्या निवृत्ती संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला की, लोकांना असे वाटत आहे की, मी संन्यास घ्यावा. पण त्याने त्यावर स्पष्ट उत्तर दिले नाही. तर दुसरीकडे ज्यावेळी विराट कोहलीला या संदर्भात विचारण्यात आल्यावर त्यानेही हात वर केले. त्याने मला धोनीने या संदर्भात काहीही सांगितले असे सांगून टाकले. त्यामुळे आता नेमकं खरं काय ते धोनीच सांगू शकेल. पण लता मंगेशकरच नाही तर कित्येकांना धोनीने निवृत्ती घेऊ नये असेच वाटत आहे.
मुंबईतील या बेस्ट ठिकाणी नक्की खायला जा वडापाव
हा धोनीचा व्यक्तिगत निर्णय- सचिन तेंडुलकर
धोनीच्या निवृत्ती संदर्भातील प्रश्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विचारल्यानंतर त्याने हा धोनीचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगितले. सध्या धोनीला त्याचा वेळ देण्याची आपल्याला गरज आहे. सध्या कोणत्याही अफवा पसरवण्यापेक्षा त्याने देशासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान करा. सध्या या सगळ्याची जास्त गरज आहे.असे खुद्द सचिनेच सांगितल्यानंतर आता तरी या सगळ्या गॉसिप बंद करायला हव्यात.
या नैसर्गिक रसांनी मिळवा सुंदर ग्लोईंग त्वचा
अफवांवर ठेऊ नका विश्वास
सध्या सगळ्याच सोशल प्लॅटफॉर्मवरुन धोनीला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. शिवाय या सगळ्या गोष्टीला राजकीय फोडणी देण्याचे कामही केले जात आहे. पण भारतीय संघाशी संबंधित कोणत्याही अफवांवर पसरत असतील तर त्यावर सध्या विश्वास ठेऊ नका.
समीरा रेड्डीचा प्रेग्नंसीमधील या फोटोशूटमधून आहे खूप काही शिकण्यासारखे
83 लवकरच
#worldcup83 वर आधारीत असलेला 83 हा चित्रपटदेखील लवकरच फ्लोअरवर येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. काहीच दिवसांपूर्वी रणवीरने त्याचा कपिल सिंह रुपातील एक फोटो शेअर केला होता. त्या वर्ल्डकपचा प्रत्येक क्षण या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटासाठीची कसून तयारी अभिनेते करत आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाची प्रतिक्षा आहे.