ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Laxmii:अक्षय आणि शरदच्या अभिनयाचा उत्तम मेळ, तरीही साऊथला दिली नाही टक्कर

Laxmii:अक्षय आणि शरदच्या अभिनयाचा उत्तम मेळ, तरीही साऊथला दिली नाही टक्कर

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट अखेर रिलीज झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या काहीच तासात हा चित्रपट लाखोंच्या घरात लोकांनी पाहिला. अक्षय कुमार या लक्ष्मी रुपात पाहिल्यावर त्याच्या अभिनयाची सगळ्या प्लॅटफॉर्मवरुन तारीफ केली जात आहे. हा चित्रपट अनेकांनी पाहिला असून आता पर्यंत तुम्हाला ही लक्ष्मीच्या भूताची भूमिका अक्षय कुमारने साकाली असली तर या चित्रपटातील लक्ष्मीची भूमिका शरद केळकरने साकारली आहे. त्यामुळे हा चित्रपट डबल बोनांझा आहे. पण असे असले तरी साऊथमधील ‘कंचना’ या चित्रपटाचा रिमेक असून देखील या चित्रपटाला म्हणावी तितकी टक्कर या चित्रपटाने दिली नाही.

अक्षयने साकारला उत्तम किन्नर

अक्षय या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून त्याने आसिफ नावाची भूमिका साकारली आहे. एका शापित जागेवर त्याने तेथील निद्रिस्त आत्म्याला जागवल्यानंतर त्या जागेवरील लक्ष्मीचं भूत आसिफच्या शरीरात प्रवेश करुन आरपला बदला पूर्ण करते अशी या चित्रपटाची स्टोरी लाईन आहे. पण साडी नेसणं आणि त्यामध्ये किन्नरासारखे वावरणे हे तसे फारच कठीण असते. पण तरीही अक्षचय कुमारने ही भूमिका खूप चांगली वठवली आहे. किन्नर साकारताना त्याच्या प्रत्येक हरकती त्याने अगदी नीट साकारल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या चित्रपटात जर कोणी भाव खावून गेला आहे तर तो फक्त अक्षय कुमार आणि त्या खालोखाल शरद केळकर. त्यामुळे हा चित्रपट पाहायला हवा तो केवळ या दोघांसाठीच

पवित्रा पुनियाचे हॉट बॅकलेस ब्लाऊज डिझाईन्स, तुम्हालाही पाडतील भुरळ

शरद केळकर 10 मिनिटांची भूमिका करुन झाला हिट

शरद केळकरने या चित्रपटात अगदी 10 मिनिटांची भूमिका साकारली असेल. ज्या लक्ष्मीला मारण्यात येते ती लक्ष्मी ही शरद केळकर दाखवण्यात आली आहे. फ्लॅशबॅकमध्ये शरदने लक्ष्मीची सगळी स्टोरी सांगितली आहे. शरदला या भूमिकेत पाहून अनेकांना धक्का बसला असेल. गेल्या काही चित्रपटांपासून शरदचा अभिनय हा सगळ्यांच्या मनामध्ये घर करावा असाच राहिला आहे. या चित्रपटातही अगदी तसेच झाले आहे. 

ADVERTISEMENT

Bigg Boss 14: कविता कौशिकची पुन्हा एकदा एंट्री, राहुलला मिळाला प्रेक्षकांचा पाठिंबा

सहकलाकारांच्या भूमिकाही उठावरदार पण…

हा चित्रपट कंचनाचा रिमेक आहे. म्हटल्यावर त्याची तुलना या कंचनासोबत होणे स्वाभाविक आहे. कंचना हा हॉरर चित्रपट असला तरीदेखील त्यामध्ये सहकलाकारांची खुमासदार कॉमेडी दिसली होती. या ठिकाणी स्टोरीलाईन तशीच असली तरी यामध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहे. कियारा अडवाणी, अश्विनी काळसेकर, आयेशा रझा, राजेश शर्मा अशांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात कियारा अडवाणी फक्त नावाला असल्याचे दिसत आहे. तिचा अभिनय आणि तिची स्क्रिन टाईम हा फारसा दिसलेला नाही. त्यामुळे ती या चित्रपटात असून नसल्यासारखी आहे. अभिनयाच्याबाबातीत अश्विनी काळसेकर आणि आयेशा रझा यांना जितका स्क्रिन टाईम मिळाला आहे त्यांनी तो उत्तम केला आहे. 

अभिनेत्री इशिता दत्ताने उघड केलं बेबी बम्प दिसण्यामागचं गुपित

टी लॉरेन्सचे दिग्दर्शन

‘कंचना’ चित्रपटाचा सर्वेसर्वा टी लॉरन्स या चित्रपटात अभिनेत्याच्या भूमिकेत होता. आता हिंदीमधील लक्ष्मी हा चित्रपट त्यानेच केला असला तरी देखील साऊथच्या तुलनेत हा चित्रपच फारसा उठून दिसत नाही. यामध्ये विनोदाची ती बाजू मुळीच दिसत नाही. 2011 साली कंचनाचा पहिला भाग आला होता. यामधील दमदार स्टारकास्ट आणि त्यांचे अभिनय पाहून अनेकांनी या चित्रपटाला उचलून धरले होते. पण हिंदीत याचा मसाला कुठेतरी कमी पडला इतके नक्की!

ADVERTISEMENT

आता तुम्ही हा चित्रपट अद्याप पाहिला नसेल तर आताच जाऊन ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहा. कारण खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट रिलीज झाला आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

09 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT