ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
leheriya saree draping

लहरिया साडीचा ट्रेंड, कशी कराल कॅरी

पावसाळ्याच्या दिवसात कोणतंही फंक्शन अर्थात घरातील कार्यक्रम असेल आणि साडी नेसायची म्हटलं की अगदी जीवावर येतं. पण साडी नेसून आपल्याला मिरवायचं पण असतं. मग अशावेळी पावसाळ्याच्या दिवसात उपयोगी येणारी फॅशन म्हणजे लहरिया साडी. ही साडी सध्या ट्रेंडमध्ये आहे. पण ही साडी नक्की कशी कॅरी करायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला या लेखातून याची माहिती देत आहोत. या श्रावण महिन्यात अनेक सणही साजरे केले जातात. मग या सणासाठी जर साडी नेसायची असेल तर तुम्ही नक्की या लहरिया साडीचा (leheriya saree) उपयोग करून घ्या. लहरिया साडी दिसायला अत्यंत सुंदर असून हलकी असते त्यामुळे नेसायलाही सोपी आहे. तुम्हाला फेस्टिव्ह लुकसाठीही ही साडी सुंदररित्या ड्रेप करता येते.

लहरिया साडी साधारणतः जॉर्जेट, शिफॉन आणि डोरियासारख्या फॅब्रिकने तयार करण्यात येते. हे सर्व फॅब्रिक वजनाने अत्यंत हलके असते. त्यामुळे ही साडी नेसताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. तेव्हाच तुम्हाला चांगला लुक मिळू शकतो. सेलिब्रिटी साडी नेसण्याच्या काही सोप्या टिप्स जाणून घ्या.

साडी नेसताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, मिळवा परफेक्ट लुक

स्टेप 1

सर्वात पहिले साडी पेटीकोटमध्ये नीट खोचून घ्या. यादरम्यान तुम्ही साडीच्या उंचीकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुमची उंची कमी असेल आणि पायांची उंचीही जास्त नसेल तर तुम्ही साडी बेंबीच्या थोडी खालीच नेसावी. जर तुमची उंची जास्त असेल तर तुम्ही बेंबीच्या वर साडी नेसू शकता. 

ADVERTISEMENT

स्टेप 2 

बेसिक टक करून झाले की तुम्ही हँडफुल साडी घेऊन लोअर प्लेट्स खाली सोडून द्या. त्यानंतर बाकी उरलेल्या साडीचा पदर काढा. तुम्ही लहरिया साडीचा पदर आणि लोअर प्लेट्स व्यवस्थित काढल्यात तर ही साडी अतिशय उत्तम दिसून येते. ही साडी तुमच्या अंगाला अगदी परफेक्ट बसते आणि तुमची योग्य फिगर दाखविण्यास याचा उपयोग नक्की होतो. तुम्हाला जास्त लक्ष लोअर प्लेट्स बनविण्याकडे द्यायला हवे. त्यासाठी तुम्ही पिन न लावता साडी डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे न्या आणि व्यवस्थित खोचा. त्यानंतर उजव्या बाजूने निऱ्या काढायला सुरूवात करा. तुम्हाला निऱ्यांची लांबी कमी ठेवता आली तर पाहा. त्यामुळे तुमचं पोट कमी दिसेल. या निऱ्या काढून झाल्या की, तुम्ही पेटीकोटमध्ये व्यवस्थित खोचून घ्या.

साडीसाठी पेटीकोट निवडताना नक्की लक्षात ठेवा या गोष्टी

स्टेप 3 

लोअर प्लेट्स तुम्ही काढून घेतल्यानंतर साडी व्यवस्थित नेसण्याकडे लक्ष केंद्रित करा. लहरिया साडीचा पदर हा तुम्ही जितका लांब काढाल तितकी तुमची उंची जास्त दिसेल. पण इतकाही पदर लांब काढू नका की, साडी जमिनीवर लोळेल. लहरिया साडीचे फॅब्रिक हे सी थ्रू असते. त्यामुळे तुम्हाला खांद्यापासून प्लेट्स काढा आणि सी थ्रू नसेल तर तुम्ही ओपन फॉल स्टाईलमध्ये तुम्ही ही साडी कॅरी करू शकता. 

तुम्हाला लहरिया साडी कशी नेसायची याच्या सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते आम्हाला नक्की सांगा आणि आर्टिकल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 

ADVERTISEMENT

कॉटनची साडी नेसण्याची सोपी पद्धत, देईल एलिगंट लुक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT