आहार चांगला असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. सौंदर्याच्याबाबतीतही अगदी तसेच आहे. त्वचा सुंदर दिसण्यासाठी तिला वरुन काहीही लावण्यापेक्षा त्वचा चांगली राहण्यासाठी आतून आरोग्य चांगले राहणे गरजेचे असते. आहारात चांगल्या गोष्टी समाविष्ट झाल्या की, आपोआपच त्वचा ही सुंदर होऊ लागते. सुंदर त्वचेसाठी तुम्ही आहारात नेमक्या कोणत्या डाळींचा समावेश करायला हवा ते आज आपण जाणून घेऊया. अगदी रोजच्या वापरातील आणि प्रत्येकाच्चा घरी उपलब्ध असतील अशा या डाळी असून त्यांचे सेवन आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फारच फायदेशीर ठरु शकते. चला करुया सुरुवात
फेसमास्कच्या अति वापरामुळे त्वचेवर होतात हे परिणाम, करु नका दुर्लक्ष
हिरवे मूग डाळ
हिरव्या मूगाची डाळ किंवा छिलकेवाली डाळ नावाने ओळखली जाणारी ही डाळ अनेकदा खिचडीसाठी आहारात वापरली जाते. अँटीऑक्सिडंट, फायबर आणि पोषक घटकांनी युक्त अशी ही डाळ आरोग्यासाठी फारच फायद्याची ठरते. पण त्यासोबतच तिच्या सेवनाने त्वचाही चांगली होण्यास मदत मिळते. मूगडाळीमध्ये व्हिटॅमिन A,C हे घटक मोठ्या प्रमाणात असतात जे तुमच्या त्वचेवर ग्लो आणण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा चांगली हवी असेल तर हिरव्या मूग डाळीचे सेवन करावे.
असे करा सेवन:
मूग डाळीचा आहारात समाविष्ट करताना तुम्ही त्याची खिचडी बनवू शकता. त्याच्यापासून बनवलेली खिचडी ही फारच चविष्ट लागते. त्याच्या सेवनामुळे शरीराला योग्य प्रमाणात फायबर मिळतात. या शिवाय हिरव्या मूगाच्या डाळीची कोरडी भाजी करुनही तुम्ही खाऊ शकता. या शिवाय ही डाळ शिजवून घेऊन त्यावर तूप घालून तुम्ही या डाळीचे सेवन करु शकता.
ओठांचे सौंदर्य खुलविण्यासाठी या टिप्स येतील कामी
काळी उडीद डाळ
उडीद डाळ ही खूप जणांकडे खाल्ली जाते.या उदीदाच्या डाळीपासून खूप जणांकडे घुट करण्याची पद्धत आहे. हे घुट चपाती किंवा भाकरीसोबत चांगलं लागतं. चवीला थोड बुळबुळीत लागणारी अशी ही उदीड डाळ ही सौंदर्यासाठी फारच फायद्याची ठरते. काळ्या उडीदाच्या डाळीमध्ये असलेले घटक हे त्वचेसाठी आवश्यक असलेल्या नव्या पेशी तयार करायला मदत करतात. यामध्ये असलेले घटक हे त्वचेला चमक आणि तजेला देण्याचे काम करतात.
असे करा सेवन:
जर तुम्हाला ही डाळ आहारात समाविष्ट करायची असेल तर तुम्ही ही डाळ शिजवून याला छान तुपाची फोडणी द्या. गायीच्या तुपात याला लसणीची फोडणी दिली तर त्याची चव ही अधिक चांगली लागते. या डाळीच्या सेवनामुळे तुमचे पोट स्वच्छ राहते. शरीराला फायबर पुरवण्यासाठी ही डाळ फारच फायद्याची असते. त्यामुळे ही डाळ रात्रीच्या जेवणात समाविष्ट करावी त्यामुळे तुमचा आहारही अगदी योग्य राहतो.
असाही करा वापर:
काळ्या उडीदाच्या डाळीपासून तुम्ही फेसपॅकही बनवू शकता. ही उडीदाची डाळ भिजत घालून तुम्ही त्याची पेस्ट करुन घ्या आणि चेहऱ्याला लावा. याच्या वापरामुळेही त्वचाही अधिक खुलून दिसते.
तेलकट त्वचेसाठी उन्हाळ्यात वापरा हा उत्तम घरगुती फेसपॅक
या डाळींचे सेवन करुन मिळवा सुंदर आणि चमकदार त्वचा