ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
ओठांचे सौंदर्य खुलविण्यासाठी या टिप्स येतील कामी

ओठांचे सौंदर्य खुलविण्यासाठी या टिप्स येतील कामी

चेहऱ्यावरील ओठ हा असा भाग आहे ज्याची योग्य काळजी घेतली तर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यावे लागत नाही. ज्याप्रमाणे त्वचेचे स्किनटोन वेगवेगळे असतात अगदी त्याचप्रमाणे ओठांचेही वेगवेगळे शेड असतात. काहींचे ओठ हे गुलाबी चुटूक असतात. तर काहींच्या ओठांचा रंग हा डस्की म्हणजेच साधारण चॉकलेटी रंगाचे असते. ओठांचा शेड कोणताही असला तरी देखील ओठांची काळजी घेतल्यामुळे त्यांचे सौंदर्य अबाधित राहते. ओठ हे नेहमी आकर्षक दिसण्यासाठी ते ओलसर आणि हायड्रेटेड असणे फारच गरजेचे असते. अशावेळी ओठांचे सौंदर्य खुलवण्यासाठी काही टिप्स नक्कीच कामी येतील. अगदी सोप्या पद्धतीने ओठांची काळजी कशी घ्यायची ते आता जाणून घेऊया.

लग्नानंतर चेहऱ्यावर तेज येण्यासाठी सोप्या टिप्स

स्लिपिंग लिप मास्क

 हल्ली बाजारात लिप मास्क अगदी सहज उपलब्ध असतात. हे लिप बाम डीप नरिशमेंटचं काम करतात. जर तुम्हाला स्लिपिंग मास्क काय ते माहीत नसेल तर तुम्ही आताच त्याची माहिती घ्या. एखाद्या लिप बाम प्रमाणेच ते असतात. पण ओठांवरील डेट स्किन काढून ओठांना नरम करण्याचे काम हे स्लिपिंग मास्क करतात ज्यांच्या वापरामुळे तुमचे ओठ चांगले दिसू लागतात. असे स्लिपिंग मास्क वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीचा फ्लेवर निवडून तो रात्रभर ओठांना लावू शकता. त्यामुळे तुमचे ओठ हे कायम हायड्रेटेड दिसतात. 

लिप स्क्रब

ओठांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रब हे फार उत्तम असतात. लिप स्क्रबचा वापर केल्यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी तुम्ही लिप स्क्रबचा वापर केला तरी देखील तुमचे ओठ अधिक चांगले दिसतात. ओठांवर सतत लिपस्टिक लावून किंवा लिप बाम लावल्यामुळे डाग पडतात.  अशावेळी ते काढून टाकण्यासाठी असे लिप स्क्रब काढून टाकायला मदत करतात. लिप स्क्रब हे घरच्या घरीही करता येतात. तुम्ही अगदी मध आणि लिंबू घेऊनही अशाप्रकारे हे स्क्रब तयार करु शकता. ओठांना चोळल्यानंतर थोडा वेळासाठी ओठ जळजळतील पण त्यानंतर तुम्ही लगेचच त्यावर स्लिपिंग मास्क लावा.

ADVERTISEMENT

असं लावावं अंडर आय क्रिम, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत

लिप मसाज

जसा चेहऱ्याचा मसाज केला जातो अगदी त्याचपद्धतीने ओठांचाही मसाज करणे फार गरजेचे असते. ओठांना बदामाचे तेल किंवा कोणत्याही आवडीच्या तेलाने मसाज करा. तेलाने मसाज केल्यामुळे तुमच्या ओठांच्या आतपर्यंत तेल जाते त्यामुळे ओठ नरिश व्हायला मदत मिळते. शिवाय मसाज केल्यामुळे ओठ रिलॅक्सही होतात खूप जणांना ओठ चावायची सवय असते. अशावेळी ओठांवर काळे डाग पडणे. ओठ कोरडे पडणे असे त्रास होऊ लागतात. पण ओठांचा मसाज केल्यामुळे हे सगळे त्रास कमी होतात. ओठ हे फार हायड्रेट होतात.

उन्हाळ्यात छातीखाली येत असतील रॅश तर करा सोपे उपाय

लिप मेकअप

 ओठांचा मेकअप म्हणजेच ओठांसाठी लिपस्टिक किंवा लिप टिंटचा वापर करताना ती चांगल्या दर्जाची असायला हवी. ओठांचा भाग हा नाजूक असतो. तुम्ही कोणत्याही लिपस्टिकचा वापर करत असाल तर त्यामुळे तुमच्या ओठांना त्रास होण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळे कधीही चांगला लिप मेकअप निवडा आणि तो झोपताना काढून टाकायला अजिबात विसरु नका. 

ADVERTISEMENT


आता ओठांचे सौंदर्य खुलवण्यासाठी या काही टिप्स नक्की लक्षात घ्या. 

19 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT