लिपस्टिक लावणे हे प्रत्येक मुलीला आवडते, मग ती लहान मुलगी असो अथवा कितीही वयस्कर महिला. पण बऱ्याचदा लिपस्टिकवरून वाद होतात की, लिपस्टिक नेहमी लावल्याने ओठ खराब होतात अथवा लिपस्टिकचा वापर केल्याने त्वचेचे नुकसान होते. पण तुम्ही जर चांगल्या ब्रँडची लिपस्टिक वापरत असाल तर तुमच्या ओठांना काहीही नुकसान होत नाही. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, लिपस्टिक लावण्याचे फायदे होतात तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना? तुम्हाला जर लिपस्टिक लावण्याचे फायदे (Benefits of lipstick) माहीत नसतील तर तुम्ही हा लेख नक्की वाचायला हवा. आम्ही तुम्हाला लिपस्टिक लावण्याचे काही फायदे सांगणार आहोत. हे वाचून तुम्हालाही नक्कीच आनंद होईल.
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून करते बचाव
लिपस्टिक तुमच्या ओठांना अधिक आकर्षक आणि सुंदर बनवते यात कोणातेच दुमत नाही. पण याचा दुसरा फायदा म्हणजे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या ओठांना वाचविण्याचे काम लिपस्टिक करते. सध्या बाजारामध्ये अनेक लिपस्टिक आहेत ज्यामध्ये SPF चे प्रमाण असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा लिपस्टिक खरेदी करायला जाता तेव्हा तुम्ही त्यामध्ये एसपीएफचे प्रमाण आहे की नाही याची खात्री करून तीच लिपस्टिक घ्या. तुम्ही जेव्हा उन्हामध्ये बाहेर जाता तेव्हा उष्णतेने तुमची त्वचा खराब होते. त्वचेसह याचा परिणाम तुमच्या ओठांवरही होत असतो. त्यामुळे तुम्ही नेहमी बाहेर पडताना सनस्क्रिन लोशन आणि लिपस्टिक लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे आणि ओठाचे नुकसान होणार नाही.
लिपस्टिकमुळे तुमचे हास्य होते अधिक सुंदर
लिपस्टिक लावल्यानंतर चेहऱ्याचा लुक संपूर्णतः बदलतो हे नक्कीच तुम्हाला पटेल. तसंच तर सुंदर दिसण्यासाठी कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य येणे पुरेसे ठरते पण तुमचे हास्य अधिक सुंदर करण्यासाठी लिपस्टिकचा उपयोग नक्कीच होतो. तसंच एखाद्या ठिकाणी पटकन जाण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही मेकअपची गरज भासत नाही. तुमच्या स्किनटोनप्रमाणे आणि कपड्यांप्रमाणे तुम्ही योग्य लिपस्टिक लावली की तुमचा लुक पूर्ण होतो.
लिपस्टिक लावल्याने वाढतो आत्मविश्वास
तुम्ही जेव्हा मेकअप करून कोणत्याही पार्टी अथवा मीटिंग्जमध्ये जाता तेव्हा तुमचा आत्मविश्वास नक्कीच बदलतो. लिपस्टिक लावण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, तुमचा आत्मविश्वास यामुळे वाढतो. त्यामुळेच बॉलीवूडचे स्टार्सदेखील मेकअप आणि लिपस्टिकसह घराबाहेर पडतात जेणेकरून त्यांच्यातील एक आत्मविश्वास दिसून येईल. तसंच सामान्य महिलादेखील लिपस्टिक लावल्यानंतर एक वेगळा लुक मिळाल्याने आत्मविश्वासाने सामोऱ्या जातात.
लिपस्टिक लावल्याने बदलतो तुमचा मूड
एका शोधानुसार ही गोष्ट समोर आली आहे की, लिपस्टिक लावल्यामुळे अनेक महिलांचा मूड बदलतो. इतकंच नाही तर लिपस्टिकचा रंगही तुमचा मूड बदलवण्यास फायदेशीर ठरतो. लिपस्टिक लाऊन जेव्हा तुम्ही हसता तेव्हा समोरच्या व्यक्ती तुमच्या मनातील दुःख ओळखू शकत नाहीत आणि तुम्हीदेखील इतरांसमोर अधिक आत्मविश्वासाने आणि आपल्या मनातील दुःख समोर येऊ न देता सामोरे जाऊ शकता. तुम्हालादेखील आनंदी राहण्याचा हक्क आहे हा एक वेगळा आत्मविश्वास मिळतो. लिपस्टिक एक चांगले मूड लिफ्टर म्हणून कामाला येते. तुम्ही जर ऑफिस अथवा कामाच्या ठिकाणी लिपस्टिक लाऊन जात असाल तर दिवसभर तुमची एनर्जीदेखील टिकून राहाते आणि तुम्ही सुंदर दिसत आहात या एका गोष्टीमुळे मनालाही समाधान मिळते.
तुम्हाला हा लेख वाचून लिपस्टिकचे फायदे मनापासून पटले ना? तुम्हालाही तुमच्यामधील आत्मविश्वास दाखवायचा असेल आणि चांगला लुक हवा असेल तर नियमित चांगल्या ब्रँड्सच्या लिपस्टिकचा वापर करावा. आमच्या POPxo मेकअप कलेक्शनमधील मिनी लिपस्टिक्सचादेखील तुम्ही वापर करू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक