ADVERTISEMENT
home / मनोरंजन
लोच्या झाला रे मोशन ट्रेलर प्रदर्शित

प्रेमाच्या महिन्यात होणार लोचा… लोच्या झाला रे 4 फ्रेबुवारीला प्रदर्शित

 मराठी चित्रपटांच्या यादीत आणखी एका नव्या चित्रपटाचे नाव जोडले जाणार आहे. कारण खास प्रेमाच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा ‘लोच्या झाला रे’ हा चित्रपट लवकरच म्हणजेच ४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे हे नवीन वर्षात लोच्या करायला पूर्णपणे सज्ज झाले आहेत.या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले असून हा चित्रपट तुफान कॉमेडी असल्याचे दिसत आहे. तुम्हालाही मराठी चित्रपट पाहायला आवडत असेल तर तुम्ही थोडा वेळ कळ सोसा कारण हा चित्रपट तुम्हाला बिग स्क्रिनवर पाहता येणार आहे.

खणाच्या ट्विनिंग कॉम्बोला मिळतेय पसंती, सणासाठी उत्तम

 असणार आहे टोटल धम्माल चित्रपट

 चित्रपटातील कलाकारांची यादी पाहिल्यानंतर हा चित्रपट टोटल धमाल असणार यात काहीही शंका नाही. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित असा हा चित्रपट असून या चित्रपटाचे टायटल पाहता कोणाच्या आयुष्याचा लोचा होणार आहे याचा शोध घेणे फारच गरजेचे आहे.आता हा शोध आपल्याला चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल. या चित्रपटाचे मोशन ट्रेलर टिझर प्रदर्शित झाले असून यामधून तरी ही एक टोटल धमाल अशी सफर दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी केले आहे. त्यामुळे यामध्ये एक टोटल धमाल पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट लंडनमध्ये चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट एक बिग बजेट चित्रपट आहे.

के- ड्रामाची दिवसेंदिवस वाढतेय क्रेझ, तुम्हीही आहात का चाहते

ADVERTISEMENT

सिद्धूची धम्माल कॉमेडी

मराठी चित्रपट हे वेगळे असतात.म्हणूनच हल्ली प्रेक्षकांना असे चित्रपट पाहायला आवडतात. असाच असणार आहे हा नवा कोरा चित्रपट जो प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा ‘लोच्या झाला रे’ हा चित्रपट लवकरच म्हणजेच ४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सयाजी शिंदे यांच्यामुळे या चित्रपटात कॉमेडीची मस्त फोडणी असणार आहे हे सांगायला काहीच हरकत नाही. सिद्धार्थची कॉमेडी धम्माल असतेच. तो चित्रपटात असेल तर खूप जणांना हा चित्रपट पाहावासा वाटतो. त्यात अंकुशचा हिरोपणा आणि कॉमेडी त्यामुळे हा चित्रपट खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. 

दर्जेदार चित्रपटांची निर्मिती

पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यापूर्वी पारितोष पेंटर यांनी ‘धमाल’, ‘टोटल धमाल’ अशा बॉलिवूडच्या चित्रपटांचे लेखन केले आहे. संजय मेमाणे यांनी ‘लोच्या झाला रे’चे छायाचित्रण केले असून त्यांनी याआधी  ‘झिम्मा’, ‘हिरकणी’, ‘हाफ तिकीट’ अशा सुपरहिट चित्रपटांच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली होती. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओ प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे. या चित्रपटात विजय पाटकर, प्रसाद खांडेकर आणि रेशम टीपणीस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत .

आता हा मराठमोळा चित्रपट पाहायला अजिबात विसरु नका.

नागार्जुनच्या ‘दी घोस्ट’ मधून जॅकलिन फर्नांडिसचा पत्ता कट

ADVERTISEMENT



19 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT