ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘लव्ह आज कल 2’ फेम ही अभिनेत्री लवकरच दिसणार वेबसीरिजमध्ये

‘लव्ह आज कल 2’ फेम ही अभिनेत्री लवकरच दिसणार वेबसीरिजमध्ये

कधी कधी एखादी छोटीशी भूमिकाही तुमचं नशीब बदलण्यासाठी पुरेशी असते. असंच काहीसं झालं नुकत्याच येऊन गेलेल्या एका चित्रपटातील अभिनेत्रीबाबत जिचं नाव आहे प्रणती राय प्रकाश. ‘लव्ह आज कल 2’ मध्ये आपल्याला तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. आता मात्र तिला या चित्रपटानंतर लागली आहे जबरदस्त लॉटरी.

अभिनेत्री प्रणती राय प्रकाश लवकरच झळकणार आहे अल्ट बालाजीच्या वेबसीरिज “कार्टेल” मध्ये. या वेबसीरिजमध्ये प्रणती मुख्य भूमिका साकारणार आहे. ही मालिका अल्ट बालाजीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये रित्विक धनंजानी , सुप्रिया पाठक, तनुजा विरवानी सारखे अभिनेते दिसणार आहेत. निश्चितपणे “कार्टेल” या वेबसीरिजबाबत तुमचीही उत्सुकता नक्कीच वाढली असेल. या वेब सिरीजचं दिग्दर्शन करणार आहेत सुयश वाधवकर.

रील आणि रियल

अभिनेत्री प्रणतीची या वेबसीरिजमधील भूमिका तिच्या वास्तविक जीवनपेक्षा खूप वेगळी असल्याचं ती सांगते. त्यामुळे प्रणती सध्या “कार्टेल” मधील तिच्या भूमिकेबद्दल खूप उत्सुक आहे. याबाबत सांगताना ती म्हणाली की, “मी करत असलेली भूमिका सुमी ही माझ्यापेक्षा खूपच वेगळी आहे, तरीही मी त्या भूमिकेला स्वतःशी कनेक्ट करू शकते. मी नेहमीच माझ्या भूमिकेकडे एक आव्हान म्हणून बघते आणि ती व्यक्तिरेखा साकारण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करते, म्हणूनच मला माझं काम आवडतं. कारण या कामातून मला बरंच काही शिकायला मिळतं. मी सुमीची भूमिका प्रेक्षकांसमोर खूप सुंदर पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करतेय.”

मॉडेलिंग, बॉलीवूड आणि वेबसीरिज

प्रणतीचा आतापर्यंतच्या प्रवास अगदी उत्कंठावर्धक आहे. ‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल’ ते ‘लव्ह आज कल 2’ पर्यंतचा तिचा प्रवास साधारण नव्हता. तिने फक्त मॉडलिंग विश्वात आपले नाव कमावले आहे असं नाही तर एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणूनही ती समोर येत आहे. या पूर्वी प्रणतीने “पॉयझन” या वेबफिल्ममध्येही काम केलं आहे. तसंच प्रणतीने जिमी शेरगिल आणि माही गिल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या “फॅमिली ऑफ ठाकूरगंज” चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटापासून ती एका चांगल्या भूमिकेच्या शोधात होती आणि तिचा शोध इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटावर संपला. इम्तियाजसारख्या दिग्दर्शकाच्या मदतीने प्रणतीने ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे.

ADVERTISEMENT

चित्रपट ‘लव्ह आज कल 2’ मध्ये छोट्याश्या भूमिकेच्या माध्यमातून प्रणती राय प्रकाशचं नाव चर्चेत आहे. तिने केलेल्या भूमिकेचं कौतुकही होत आहे. या चित्रपटामुळे तिला इम्तियाज अलीसारख्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. तिला बऱ्याच काळापासून इम्तियाजसोबत काम करायचं होतं. एवढंच नाहीतर इम्तियाजने तिच्या अभिनयाचं कौतुकही केलं. या चित्रपटामुळे तिचं एक स्वप्नं पूर्ण झालं आहे. 2020 या सालामध्ये प्रणती वेबसीरिजसोबतच अनेक चित्रपटातही दिसणार आहे.

मूळची बिहारची असणारी आणि पटना येथे शालेय शिक्षण घेतलेल्या प्रणतीने सुरूवात केली ती एका इंटरटेनमेंट वाहिनीवरच्या रिएलिटी शो इंडिया नेक्स्ट स्टारने. या रिएलिटी शोचे जज होते करण जोहर आणि रोहित शेट्टी. तसंच ती प्रसिद्ध रिएलिटी शो इंडिया नेक्स्ट टॉप मॉडेल सीझन 2 ची ही विजेती होती. तिने 2015 साली मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि फायनलपर्यंत ती पोचली. ज्यामध्ये तिला मिस फॅशन आयकॉन, मिस टँलेटेडसारखे किताब मिळाले होते.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

ADVERTISEMENT
26 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT