ADVERTISEMENT
home / आरोग्य
Low platelets symptoms, Causes and Home remedies in Marathi

पेशी कमी होण्याची लक्षणे, कारणे आणि उपाय (Low Platelets Symptoms, Causes And Home Remedies)

मानवी शरीरात पांढऱ्या रक्त पेशी, लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स अशा रक्तात तीन प्रकारच्या रक्तपेशी असतात. थ्रोम्बोसाइटोपेनिया (Thrombocytopenia) ही एक अशी शारीरिक अवस्था आहे. ज्यामध्ये शरीरातील प्लेटलेट्स अचानक कमी होतात. प्लेटलेट्समुळे रक्त गोठण्यास मदत होते. शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्लेटलेट्स गरजेच्या असतात. रूग्णाला एखादी जखम झाल्यास त्या जागी रक्त न गोठल्यास अती रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. म्हणूनच शरीरात लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशींप्रमाणेच प्लेटलेट्सची संख्या नियंत्रणात असायला हवी. काही कारणांमुळे अचानक जर या प्लेटलेट्स कमी झाल्या तर त्या वाढवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. डेंग्यू अथवा काही गंभीर आजारांमध्ये शरीरातील या रक्त पेशी झपाट्याने कमी होण्याची शक्यता असते. याचे निदान करण्यासाठी कम्प्लिट ब्लड काऊंट (CBC) ही रक्तचाचणी केली जाते. ज्यामुळे शरीरातील पेशींची गणना करता येते. माणसाच्या शरीरात दीड लाख ते साडे चार लाख मात्र काही गंभीर परिस्थितीमध्ये त्यांची संख्या दहा ते वीस हजारावर पोहतचे. अशा वेळी त्या व्यक्तीच्या जीवाला धोका असू शकतो. ज्यासाठी तातडीने प्लेटलेट्स वाढण्यासाठी उपचार आणि औषधे द्यावी लागतात.  जाणून घ्यापेशी कमी होण्याची लक्षणे, पेशी कमी होण्याची कारणे  आणि प्लेटलेट्स वाढवण्याचे उपाय (How To Increase Platelets In Marathi) 

प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi)

पेशी कमी होण्याची लक्षणे (Symptoms Of Low Platelets In Marathi)

पेशी कमी होण्याची लक्षणे

पेशी कमी होण्याची लक्षणे समजली तर या अवस्थेवर तातडीने उपचार करणे सोपे जाते यासाठी जाणून घ्या पेशी कमी होण्याची लक्षणे (Symptoms of Low Platelets)

जखम होणे (Easy Bruising)

ज्यांच्या शरीरात प्लेटलेट्स कमी असतात अशा लोकांना अगदी सहज जखमा होतात. जखम होणे, जखम चिघळणे अथवा लवकर बरी न होणे हे शरीरात प्लेटलेट्स कमी असण्याचे मुख्य लक्षण आहे. कारण एखादी जखम झाल्यावर अती रक्तस्त्राव होऊ नये यासाठी रक्तातील प्लेटलेट्स रक्त गोठवण्याचे कार्य करत असतात. ज्यामुळे रक्तप्रवाह रोखला जातो आणि जखम नैसर्गिक रित्या भरून निघण्यास मदत होते. मात्र अशा परिस्थितीत प्लेटलेट्स कमी असतील तर जखम लवकर बरी होऊ शकत नाही.

ADVERTISEMENT

त्वचेवर छोटे छोटे लाल चट्टे येणे (Tiny Red Spots On Your Skin)

शरीरात प्लेटलेट्स कमी असतात त्यांच्या त्वचेवर लालसर रंगाचे छोटे छोटे चट्टे अथवा डाग निर्माण होतात. रक्तप्रवाह अनियंत्रित झाल्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. कारण रक्त गोठण्यासाठी लागणाऱ्या प्लेटलेट्सचे कार्य बिघडल्यामुळे संपूर्ण रक्ताभिसरणाच्या कार्यात यामुळे अडचणी निर्माण होतात.

अती रक्तस्त्राव होणे (Excess Bleeding After Even Minor Injuries)

प्लेटलेस्ट कमी असतील तर त्या रुग्णाची एखादी छोटीशी जखमदेखील गंभीर रूप धारण करू शकते. छोटं खरचटलं अथवा कापलं तरी रक्तप्रवाह न थांबल्यामुळे अशक्तपणा येणं अशा परिस्थितीत स्वाभाविक आहे.

सांधेदुखी (Pain In Your Joints)

सांधेदुखीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत कंबर, पायाचा गुडघा आणि टाचांच्या सांध्यामध्ये वेदना आणि दाह जाणवतो. रक्ताभिसरण कमी अनियंत्रित झाल्यामुळे आणि बोन मॅरो आजारांमुळेही सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

नाकातून सतत रक्त येणे (Frequent Nosebleeds)

पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स हे प्रमुख घटक असतात. मात्र अचानक प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे संपूर्ण आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो. ज्यामुळे अशा रुग्णांना सतत नाकातून रक्त येण्याचा त्रास जाणवू शकतो. 

ADVERTISEMENT

लघवी अथवा संडासावाटे रक्त जाणे (Blood In The Urine Or Stool)

गोठण्याच्या क्रियेत आणि नियंत्रणावर परिणाम झाल्यामुळे रूग्णाच्या लघवी आणि संडासावाटे रक्त पडण्याचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. 

डेंग्यूची लक्षणे आणि डेंगू वर उपाय मराठी जाणून घ्या (Dengue Symptoms In Marathi)

पेशी कमी होण्याची कारणे (Causes Of Low Platelets In Marathi)

How To Increase Platelets In Marathi

शरीरातील पेशी कमी होण्याची कारणे अनेक असू शकतात. बऱ्याचदा डेंग्यू, टायफॉईडसारखे आजार झाल्यास अचानक शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. यासाठी जाणून घ्या याचे कारण

ऑटोइम्यून आरोग्य स्थितीमुळे (Autoimmune Conditions)

ऑटो इम्युन आजारांमध्ये रूग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होण्याची शक्यता असते. कारण या आजारपणात रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे पेशी कमी होतात. मात्र यावर योग्य औषधोपचार केल्यास पुन्हा पेशी वाढण्यास सुरूवात होते.

ADVERTISEMENT

रक्तात इनफेक्शन झाल्यामुळे (Bacterial Blood Infections)

आजारपणांमध्ये शरीरातील इनफेक्शन रक्तात पसरते आणि त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्सचा ऱ्हास होण्याची शक्यता असते. यावरही वेळीच उपचार करून रूग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो. 

गरोदर असणे (Pregnancy)

गरोदरपणी अशक्तपणामुळे काही महिलांना रक्तातील प्लेटलेट्स कमी होण्याची लक्षणे आढळू शकतात. मात्र या काळातील थ्रोम्बोसाइटोपेनिया (Thrombocytopenia) हा अगदी सौम्य स्वरूपातील असून बाळाच्या जन्मानंतर पुन्हा सर्व काही सुरळीत होते. 

केमोथेरपी (Chemotherapy)

केमोथेरपी आणि रेडिएशन हे सुद्धा रक्तातील प्लेटलेट्स कमी होण्याचे कारण असू शकते. कारण या उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्करोगाच्या पेशींना मारले जाते. मात्र असं होत असताना काही चांगल्या रक्तपेशी त्यामध्ये नष्ट होतात. या थेरपीमध्ये बोम मॅरो पेशींचा नाश होतो ज्या प्लेटलेट्सच्या निर्मितीसाठी महत्त्वाच्या असतात. सहाजिकच त्यामुळे शरीर पुन्हा झपाट्याने प्लेटलेट्स निर्माण करू शकत नाही.

कुपोषण (Nutritional Deficiencies)

आपण जे अन्न खातो त्यातून आपल्या शरीरात रक्ताची निर्मिती होत असते.पण जर शरीराला पुरेसे पोषक अन्न मिळाले नाही तर शरीराचे कुपोषण होते आणि योग्य प्रमाणात रक्त निर्माण होत नाही. त्यामुळे प्लेटलेट्स कमी असण्याचं एक कारण कुपोषण असू शकतं. 

ADVERTISEMENT

व्हायरल इनफेक्शन (Viral Infections)

 हेपेटायटिस सी अथवा एचआयव्ही सारख्या व्हायरल इनफेक्शनमध्ये बोन मॅरोला प्लेटलेट्स निर्माण करण्यात अडचणी येतात. ज्यामुळे प्लेटलेटची निर्मिती रोखली जाते आणि अचानक शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात.

अती मद्यपान (Heavy Alcohol Use)

जे लोक अती प्रमाणात मद्यपान करतात त्यांच्या शरीरात प्लेटलेट्स कमी असू शकतात. कारण मद्यामुळे त्यांच्या शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही. शरीराला प्लेटलेट्स बनवण्यासाठी अडथळा आल्यामुळे त्यांच्या शरीरात पेशी कमी होण्याची शक्यता वाढते. 

प्लेटलेट्स वाढवण्याचे उपाय (Home Remedies To Increase Platelet Count)

Home Remedies To Increase Platelet In Marathi

शरीर निरोगी आणि कार्यक्षम राहण्यासाठी शरीरातील रक्तपेशींचे प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. मात्र काही कारणांमुळे जर तुमच्या शरीरातील रक्त पेशी कमी झाल्या असतील. तर त्या वाढण्यासाठी करा हे काही सोपे आणि घरगुती उपाय. जाणून घ्या कशा वाढवावी शरीरातील पेशींची संख्या (how to increase platelets in marathi)

पपई अथवा पपईची पाने (Papaya And Papaya Leaves)

शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने वाढण्यासाठी पपई आणि पपईची पाने वरदान ठरतात. अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की, डेंग्यूमुळे जर शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्या असतील तर त्या झपाट्याने वाढतात. पपईमध्ये असे अनेक केमिकल्स असतात ज्यामुळे शरीरावर चांगला परिणाम होतो. यासाठी अशा रुग्णांनी पाव किलो पपईची कोवळी पाने चावून खा. पपईची पाने पाण्यात उकळून त्याचा अर्क काढा आणि तो प्या. नियमित पपई खाण्यामुळेही शरीरातील पेशी वाढण्यास मदत होते. ’10’ आरोग्यदायी पपई खाण्याचे फायदे (Papaya Benefits In Marathi)

ADVERTISEMENT

भोपळा आणि त्याच्या बिया (Pumpkin And Its Seeds)

शरीरातील पेशी लगेच वाढण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन एची गरज असते. लाल भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे भोपळ्याच्या खाण्यामुळे प्लेटलेट्स वाढू लागतात. याचप्रमाणे भोपळ्याच्या बियांमध्ये इम्यूनोमॉड्यूलेटरी गुणधर्म असतात. जेव्हा शरीरातील पेशी कमी होतात तेव्हा त्या रूग्णाची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी लाल भोपळा फायदेशीर ठरू शकतो. यासाठी अशा रुग्णांनी नियमित लाल भोपळ्याचा रस, लाल भोपळ्याची भाजी अथवा लाल भोपळ्याचे सूप प्यावे. 

आवळा (Gooseberries)

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स सी असते. व्हिटॅमिन सीमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.यासाठीच या काळात आवळा खाणे फायदेशीर ठरू शकते. ज्यांच्या शरीरातील पेशी कमी झाल्या आहेत अशा लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यावा. ज्यामुळे हळू हळू प्रतिकारशक्ती वाढते आणि रक्तपेशींमध्ये वाढण्यास सुरूवात होते. 

गव्हांकुर (Wheat Grass)

गव्हांकुर हे प्लेटलेट्स वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. गव्हांकुरामध्ये फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन्स, झिंक असे पोषक तत्त्व असतात. सहाजिकच गव्हांकुर खाण्यामुळे शरीराला पुरेसे पोषण मिळतात. ज्यांच्या शरीरातील पेशी कमी झाल्या आहेत अशा लोकांना गव्हांकुराचा चांगला फायदा होतो. यासाठी घरातच गव्हांकुराचा रस काढा आणि तो नियमित प्या. 

लिंबाचा रस (​Lemon Juice)

लिंबामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर असतेच. व्हिटॅमिन सीमुळे रक्तपेशींच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. व्हिटॅमिन सी हे एक उत्तम अॅंटि ऑक्सिडंट आहे.  पेशी कमी झालेल्या रूग्णांच्या आहारात लिंबाचा रसाचे प्रमाण वाढवणे फायदेशीर ठरू शकते. यासाठी या रुग्णांनी नियमित लिंबाचा रस नियमित घ्यावा. 

ADVERTISEMENT
Low platelets symptoms, Causes and Home remedies in Marathi

पेशी कमी होण्याची लक्षणे, कारणे, उपायबाबत प्रश्न (FAQ’s)

1. अचानक पेशी कमी झाल्यास काय होते ?

अचानक रक्तातील पेशी कमी होण्याची कारणे अनेक असू शकतात.मात्र असं झाल्यास रूग्णाला अशक्तपणा येऊन रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे इतर आरोग्य समस्या होण्याचा धोका वाढतो. यासाठी पेशी कमी झाल्यास त्वरीत उपचार करणे गरजेचं आहे.

2. कमी झालेल्या पेशी किती दिवसांमध्ये वाढू शकतात ?

रक्तातील प्लेटलेट्स लाखोंच्या घरातून अचानक हजारावर येतात. मात्र त्या वाढण्यासाठी थोडा काळ जावा लागतो. साधारणपणे एक महिन्यामध्ये प्लेटलेट्स पुन्हा वाढतात. कधी कधी गंभीर आजार असल्यास त्या वाढण्यासाठी दोन ते तीन महिनेही जावू शकतात. 

3. पेशी कमी झाल्या असतील तर काय खाणे टाळावे?

रक्तातील पेशी कमी झालेल्या लोकांनी प्लेटलेट्स पुन्हा वाढण्यासाठई आहारातून शिळे अन्न, गोठवलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ. प्रक्रिया केलेले पदार्थ, डेअरी प्रॉडक्ट, मटण, मद्यपान आणि साखरेचे पदार्थ कमी खावे. 

20 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT