संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपट 7 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यापासून तरूणाईचा सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
सिनेमाच्या एक्झिबिटर्सनुसार,’लकी-जियाची लव्हस्टोरी कॉलेज तरूणांना आपलीशी वाटतेय. लकीचे संवाद युवा वर्गाला आवडतायंत. बाकी लव्हस्टोरीजमधले नायक-नायिका हे कॉलेजमध्ये जाणारे वाटत नाहीत. पण या लव्हस्टोरीचे वैशिष्ट्य आहे की, लकी कपलची ही फ्रेश जोडी असल्याने ती कॉलेजमधली वाटते आणि त्यांची लव्हस्टोरी कॉलेज युवकांना पाहावीशी वाटते.
लकीच्या या लकी घौडदोडीबद्दल आणि युवावर्गाच्या भरघोस प्रतिसादाबद्दल फिल्ममेकर संजय जाधव म्हणाले की, “खरंतर, मराठी सिनेमा हा फक्त शनिवार-रविवार फॅमिली ऑडियन्समूळे चालतो असं म्हणतात. पण लकीला मधल्यावारीसुध्दा जो प्रतिसाद मिळालाय, त्यामुळे आम्हाला आनंद होतोय. कॉलेजच्या तरूणांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”
निर्माते सुरज सिंग यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा असल्यामुळे ते प्रेक्षकांच्या प्रतिसादाने भारावून गेले आहेत आणि भविष्यात अजून मराठी सिनेमांची निर्मिती करण्याचा त्यांचा मानस आहे. हा सिनेमा युवावर्गाविषयी आहे आणि तो कॉलेज युवक- युवतींना आवडतोय, ह्याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या चित्रपटात लकीची भूमिका साकारणारा अभिनेता अभय महाजन याबाबत म्हणाला की, “आजच्या संभ्रमित तरूणांविषयीची ही कथा आहे. इतरांसाठी लकी आणि स्वत:साठी अनलकी असलेला हा कॉलेज तरूण आपल्या निरागसतेने सिनेमामध्ये सर्वांचे मन जिंकून घेतो आणि मला असं वाटतं की, आज प्रेक्षकांना हीच गोष्ट आकर्षित करतेय. आजच्या युवावर्गाची ही प्रातिनिधिक कहाणी आमच्या वयोगटातल्या तरूणांना आवडतेय, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.”
तर जिया साकारणारी अभिनेत्री दिप्ती सती म्हणाली की, “सिनेमाला सब-टायटल्स आहेत. त्यामुळे अनेक अमराठी प्रेक्षकही सिनेमा पाहू शकतायत. माझ्या काही अमराठी मित्र-मैत्रिणींनी लकी सिनेमा पाहिला आणि त्यांची हसूनहसून मुरकुंडी वळलेली पाहून मी नक्कीच म्हणू शकेन की, हा चित्रपट आजच्या काळाचा आहे. तसंच हा चित्रपट पाहायला भाषेचं बंधन नाही. त्यामुळे या व्हॅलेन्टाईन्स डे ला आपल्या प्रेयसी, प्रियकर किंवा मित्र-मैत्रिणींना घेऊन तुम्ही सिनेमा पाहायला नक्की जाऊ शकता.”
मराठीत पहिल्यांदाच खास शूट करण्यात आलं ‘हिरोईन- इंट्रोडक्शन’ साँग
बी लाइव्ह प्रॉडक्शन्स प्रस्तूत ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांचं असून ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत.