ADVERTISEMENT
home / फॅशन
maadame tom and jerry collection

लहानपणीच्या आठवणी जागवणारे टॉम अँड जेरी कलेक्शन

आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांच्या फॅशन आवडत असतात. अनेक वेळा आपण आपल्या लहानपणीच्या गमतीजमतीमध्येही गढून जातो. आपल्याला आवडणाऱ्या कार्टून्सचे शर्ट अथवा टीशर्ट हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. त्यातही जर टॉम अँड जेरी ही जोडी असेल तर त्याला कोणतीही तोड येत नाही. असंच टॉम अँड जेरी कलेक्शन तुम्हाला तुमच्या वॉर्डरोबमध्ये हवं असेल तर सध्या बाजारात मादामने हे कलेक्शन लाँच केलेले पाहायला मिळत आहे. टॉम अँड जेरी हे जगातील सर्वात प्रसिद्ध कार्टून आहे. आपण कितीही मोठे झालो तरी यांच्याबाबतचं प्रेम कमी होत नाही. कधीही आपण हे कार्टून पाहू शकतो. फॅशनच्या बाबतीतही आपलं प्रेम तसंच राहातं. 90 च्या दशकातील ही फॅशन पुन्हा एकदा आली आहे. डोळ्याला आकर्षित करणारे हे कलेक्शन तुम्हालाही नक्कीच तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठेवायला हवे. कायमस्वरूपी आपल्या मनात जागा करणारे हे कार्टून कलेक्शन आपल्याकडेही असावे असे नक्कीच प्रत्येकाला वाटले तर नवल नाही. 

अधिक वाचा सेलिब्रिटींमध्ये बॅगचा हा ट्रेंड आहे सध्या व्हायरल

लहानपणीच्या आठवणी आणि टॉम अँड जेरी 

या आयकॉनिक फॅशन श्रेणीमध्ये टीज, जॅकेट्स, शॉर्ट्स, कपडे आणि जंपसूट्ससारख्या विविध प्रकारच्या कपड्यांचा् समावेश आहे. आधुनिक आणि फॅशन जपणाऱ्या महिलांसाठी आपल्या बालपणीच्या आठवणी जपणारे असे हे कलेक्शन आहे. याच प्रेरणेने हे कलेक्शन बनविण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा नव्वदच्या दशकातील फॅशन येऊ लागली आहे. महिलांना पुन्हा एकदा रेट्रो प्रिंट्स, कट आणि सिल्हूट कपडे आवडायला लागून त्यामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. सध्या अनेक ठिकाणी अगदी आपण साडी आणि पंजाबीमध्येही रेट्रो लूक पाहतो आहे. तसंच टॉम अँड जेरीचे कलेक्शन पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आले आहे. भूतकाळ आणि वर्तमानाला व्यवस्थित जोडणारा हा दुवा आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. 

अधिक वाचामिथिला पालकरची ही फॅशन तुम्हालाही दिसेल अधिक सुंदर, करा ट्राय

ADVERTISEMENT

कोणालाही शोभणारी अशी फॅशन 

कुठेही बाहेर जाताना सहज घालून जाता येईल असं हे कलेक्शन आहे. क्लासिक आणि तितकंच सॅसी असणारे हे कपडे तुम्हाला अगदी तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटायला जातानादेखील घालता येतात. लवकरच येणारा फ्रेंडशिप डे देखील तुम्ही या कलेक्शनसह साजरा करू शकता. मित्रमैत्रिणींना नक्की काय गिफ्ट घ्यायचं हा जर विचार असेल तर तुम्ही नक्की या फ्रेंडशिप डे ला या कलेक्शनमधील काही कपडे आपल्या मित्रमैत्रिणींना भेट देऊन मस्तपैकी फोटो काढू शकता. या कलेक्शनची किंमत साधारणतः 1199 रूपये ते रू. 1299 दरम्यान आहे. या कपड्यांची डिझाईनर परिका रावलने सांगितले की, टीव्हीवर एका चॅनेलवरून दुसऱ्या चॅनेलवर सर्फिंग करताना मला या टॉम अँड जेरीच्या कलेक्शनची कल्पना सुचली. प्रत्येकाला हा कार्टून शो आवडतो. त्यामुळेच हे कलेक्शनदेखील नक्कीच सर्वांना आवडेल अशी आशाही तिने व्यक्त केली आहे. कपडे ही आपल्या वैयक्तिक शैलीची अभिव्यक्ती आहे त्याुळे तुमच्यातील लहान मुलाला बाहेर आणण्यासाठी हे कलेक्शन नक्कीच मदत करेल असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला. टॉम अँड जेरी भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात जास्त पाहिले जाणारे आणि सर्वांचे आवडते कार्टून्स आहेत. त्यामुळे या कलेक्शनचा तुम्हीदेखील तुमच्या वॉर्डरोबमध्ये समावेश करून घ्या. 

अधिक वाचाइको फ्रेंडली समर कलेक्शनचा नवा ट्रेंड, उन्हाळ्यात राहा अधिक कम्फर्टेबल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

26 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT