ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
माधुरी दीक्षितच्या ‘या’ साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क, काय आहे खासियत

माधुरी दीक्षितच्या ‘या’ साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क, काय आहे खासियत

माधुरी दीक्षित म्हटलं की, समोर येतं अप्रतिम सौंदर्य, सर्वोत्तम नृत्याविष्कार आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी धक धक गर्ल… माधुरीच्या दिलखेचक अदा आजही अनेकांना भुरळ पाडतात. दोन मोठी मुलं असूनही तिचं सौंदर्य आजही तरूणांना लाजवणारं आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एक फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमधील तिच्या साडीमधील अदा चाहत्यांना आकर्षित करणाऱ्या होत्याच मात्र या फोटोशूटसाठी जी साडी माधुरी नेसली होती तिची किंमत पाहून सर्वांच्या भुवया मात्र आश्चर्याने नक्कीच उंच होतील. यासोबतच पाहा खणाच्या साड्या आणि बरंच काही खास तुमच्यासाठी (Khanachi Saree Look In Marathi)

माधुरीच्या साडीची किंमत 

माधुरी दीक्षितने एका फोटोशूटसाठी जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. एखाद्या सेलिब्रेटी जेव्हा एखादा नवा लुक करते तेव्हा तिचा लुक चर्चेत असतोच. शिवाय त्या प्रकारचे आऊटफिट घेऊन तसा लुक करण्याकडे अनेकांचा कल असतो. बऱ्याचदा लग्न समारंभ अथवा खास कार्यक्रमात सेलिब्रेटींचे लुक फॉलो केले जातात. त्यात माधुरी दीक्षित सारखं दिसायला कोणाला नाही आवडणार. माधुरीने परिधान केलेली ही साडी लग्न समारंभासाठी अगदी बेस्ट आहे. शिवाय ती तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. पण तिची किंमत ऐकून मात्र तुम्हाला चांगलाच धक्का बसेल कारण ही साडी सध्या तोरीनी इंडिया- लक्झरी फॅशन डिझायनरच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पण या साध्या फ्लोरल डिझाईनर साडीची किंमत आहे 1,15,500 ( एक लाख, पंधरा हजार, पाचशे) वास्तविक ही साडी इतर साड्यांच्या किंमतीच्या तुलनेत जरा जास्तच महाग आहे. पण हौसेला काही मोल नसतं असं म्हणतात. त्यामुळे जर तुम्हाला हा रंग आणि डिझाईन आवडलं असेल तर तुम्ही या वेबसाईटवरून ही साडी ऑनलाईन विकत घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हालाही धकधक गर्लसारखा लुक करता येईल. जर तुम्ही ही साडी खरेदी केलीच तर साडी नेसल्यावर अवश्य शेअर करा हे अस्सल मराठमोळे साडी कोट्स (Saree Quotes In Marathi)

Kathachya Sadiche Blouse Designs | काठाच्या साडीचे विविध ब्लाऊज डिझाईन

काय आहे साडीची खासियत

माधुरीने परिधान केलेली ही निळ्या जांबळ्या रंगाची साडी सॅटिन नेटची असून तिचा फ्लोरल प्रिंटचा पदर मात्र मखमली रेशमी कापडाचा आहे. यासाडीवर नारंगी आणि पिवळ्या रंगाच्या फुलांची डिझाईन आहे. साडीची बॉर्डर चंदेरी रंगाच्या वर्कची आहे. साडीसोबत माधुरीने मिडरिफ- बारिंग स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे. ज्याच्यावर जांबळ्या आणि चंदेरी रंगाचे वर्क आहे. साडीचा लुक कप्लीट करण्यासाठी तिने चंदेरी आणि निळ्या रंगाचे चोकर गळ्यात घातलं असून त्यासोबत साजेसे स्टड इअर रिंग्ज आहेत. हा लुक माधुरीसाठी फॅशन स्टायलिस्ट अमी पटेलने केलेला आहे. माधुरीने तिचे केस नेहमीच्या स्टाईलने कॅरी केले असून केसांना खाली थोडा कर्ली लुक दिलेला आहे. मेकअप आर्टिस्ट लेख गुप्ताने तिचा मेकअप केलेला आहे. न्यूड शेडची आयशॅडो, काळा मस्कारा आणि आयलायननरने आय मेकअप केलेला आहे. न्यूड लिपस्टिकने लुक पूर्ण केलेला आहे. जर तुम्हाला हा लुक आवडला असेल तर आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

ADVERTISEMENT
17 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT