सुपरहिट ठरलेल्या मल्याळम ‘अंगमली डायरीझ’ चित्रपटाचा मराठी रिमेक असलेला ‘कोल्हापूर डायरीझ’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांना नवीन वर्षात पाहायला मिळणार आहे. अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि वजिर सिंह निर्मित असा हा जो राजन दिग्दर्शित ‘कोल्हापूर डायरीझ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये भूषण नानासाहेब पाटील महत्त्वाची भूमिका साकारणार असून भूषणच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या या चित्रपटातील लुकची झलक सोशल मिडीयावर दाखवण्यात आली होती. चित्रपटाचा नायक जितक्या ताकदीचा आणि महत्त्वाचा असतो तितकाच ताकदीचा खलनायक जर असेल तर चित्रपटाविषयीची उत्सुकता नेहमीच वाढते. हल्ली, खलनायकाची भूमिकादेखील प्रेक्षकांची मने जिंकतात. यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रणवीर सिंगने साकारलेला खिलजी.
‘कोल्हापूर डायरीझ’ महेश शेट्टी साकारणार खलनायक
‘कोल्हापूर डायरीझ’ मध्ये भूषणच्या समोर कोणता खलनायक असणार याचा खुलासा नुकताच करण्यात आला आहे. छोट्या पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारा महेश शेट्टी ‘कोल्हापूर डायरीझ’ मध्ये ‘अण्णा’ हे खलनायकाचं पात्रं साकारत आहे. छोट्या पडद्यावर दरारा निर्माण केल्यावर महेश शेट्टी अण्णाच्या रुपातून लवकरच निर्माण करणार मोठ्या पडद्यावर त्याचा दरारा. मुळात, नायक आणि खलनायक या दोन्ही पात्रांचा लुक प्रदर्शित झाल्यावर प्रत्येकाला या चित्रपटाची निदान एक तरी झलक लवकरात लवकर मिळावी अशी उत्सुकता नक्कीच असणार.
तरण आदर्शनेही केलं पोस्ट
या चित्रपटात महेश शेट्टीचा लुक अगदीच भारी आहे. त्यामुळे ट्रेड अनालिस्ट तरण आदर्शनेही महेश शेट्टीचा हा लुक ट्विटरवर शेअर केला होता. अवधूत गुप्तेच्या या चित्रपटाची सगळीकडेच सध्या चर्चा आहे. अवधूत नेहमीच मराठी प्रेक्षकांसाठी काही ना काही वेगळं घेऊन येतो आणि यावेळीदेखील त्याने आपला वेगळेपणा जपला आहे.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम