टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय जोडी माही विज आणि जय भानुशाली यांना एकूण तीन मुले आहेत. यातील दोन मुले त्यांनी दत्तक घेतलेली आहेत. लग्नानंतर नऊ वर्षांनी म्हणजेच मागच्याच वर्षी त्यांना एक गोंडस मुलगी झाली. माही आणि विज यांनी त्यांच्या या लाडक्या लेकीला तारा असं नाव दिलं. मात्र आता माहीला तिचं कुटुंब आणखी वाढवण्याची ईच्छा आहे. तिला पुन्हा एकदा आई होण्याचा अनुभव घ्यायचा आहे. याला जय सध्या तरी तयार नाही. यासाठीच माहीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक क्यूट व्हिडिओ शेअर करत जयकडे ही लाडीक मागणी केली आहे. तिने जयच्या फॅन्स आणि त्या दोघांच्या फ्रेंड्सकडे अशी विनंती केली आहे की, यासाठी त्यांनी जयला समजावून सांगावं. जयच्या इन्स्टाग्राम अंकाऊंटवर कंमेट करून तुम्ही जयला याबाबत सांगा अशी विनंतीच माहीने केली आहे.
या कारणासाठी माहीला पुन्हा व्हायचं आहे आई
माहीने तिच्या या इन्स्टाग्राम स्टोरीतून दर्शकांना विनंती केली आहे की, “प्लीज तुम्ही सर्वांनी जयच्या अंकाऊंटवर जा आणि कंमेट करा. मला आणखी एक बाळ हवं आहे. मात्र जय यासाठी तयार नाही. सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि त्यामुळे मी खूप कंटाळून गेली आहे. शिवाय माझी लेक तारा आता मोठी झाली आहे आणि ती माझं मुळीच ऐकत नाही”
माहीसाठी सध्या तारा हे तिचं पूर्ण जगच झाली आहे. तारा आता एक वर्षाची झाली आहे. माही आणि जय त्यांच्या तिन्ही मुलांवर सारखंच प्रेम करतात. काही दिवसांपूर्वीच माहीने तारासोबत ट्विनिंग करत एक छान फोटोसेशन शेअर केलं होतं. लॉकडाऊनमध्येही त्या दोघांनी मुलांना कंटाळा येऊ नये म्हणून घरातच नवनवीन प्रयोग करत मुलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. ताराबद्दल सांगताना एकदा माहीने तिचा आई होण्याचा पूर्ण प्रवास शेअर केला होता तीने शेअर केलं होतं की, मी तिच्याविषयी खूप विचार करते. तिची रूम कशी असावी, तिच्या रूमचे तापमान किती असावं, तिला दूध कसं द्यावं. अशा छोट्याछोट्या गोष्टींकडे मी खूप बारकाईने लक्ष देते. मात्र आजही जेव्हा डॉक्टरकडे तिला लसीकरण करण्यासाठी न्यायचं असतं. तेव्हा मी तिला सुई टोचल्यावर होणारा त्रास नाही सहन करू शकत. आई झाल्यावर मी खूपच हळवी झाली आहे. एवंढच नाही आता तर मी चित्रपटातील एखाद्या भावनिक सीन पाहूनही रडू लागते “
माही आणि जय आहेत आदर्श पालक
जय आणि माही जसं त्यांच्या स्वतःच्या मुलीवर प्रेम करतात. तितकंच ते त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलांवरही प्रेम करताना दिसतात. घरी काम करणाऱ्या मदतनीसाचीच दोन मुलं या दोघांनी दत्तक घेतली आहेत. लग्नाच्या आधी माहीच्या घरी केअरटेकरचं काम करणाऱ्या मदतनीसाची ही दोन मुलं आहेत. लग्नानंतर माही त्या केअरटेकरला तिच्या घरी घेऊन आली. आणि आता जय आणि माही त्याच्या मुलांना स्वतःच्या मुलांनप्रमाणे सांभाळतात. या मुलांचा पूर्ण खर्च माही आणि जय करतात. शिवाय त्यांच्यावर आईवडीलांप्रमाणे प्रेम करतात. ही मुलं त्यांच्या खऱ्या आई-वडीलांसोबतच राहतात मात्र त्यांना चांगलं शिक्षण, आरोग्य आणि आयुष्य मिळावं यासाठी जय आणि माही सतत प्रयत्न करत असतात. अनेकवेळा तारा, जय आणि माही यांच्यासोबत ही दोन मुलं दिसून येतात. ते या दोन्ही मुलांची अगदी स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेतात. एवढंच नाही तर या मुलांना जय आणि माहीने इतका लळा लावला आहे की ती मुलं या दोघांना मम्मी आणि पप्पा या नावाने हाक मारतात. दुसऱ्यांच्या मुलांवर इतकं प्रेम करणरे जय आणि माही आदर्श पालक आहेत असंच म्हणावं लागेल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या लग्नसोहळ्यातील आनंंदाचे क्षण, फोटो व्हायरल
आमिर खानची मुलगी चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये
आठवड्याभरात बिग बॉस 14 गाजवणारी मराठमोळी निक्की तांबोळी नक्की आहे कोण