सोने (Gold) अथवा सोन्याचे दागिने (Gold Jewellery) अशी गोष्ट आहे जी तुम्ही रोजच्या रोज सहसा घालत नाही. एखादी चैन अथवा अंगठी तुम्ही घालू शकता. मात्र लग्नातील सोन्याचे दागिने हे कधीतरीच कपाटातून अथवा बँकेच्या लॉकर्समधून काढण्यात येतात. घरात एखादे कार्य असेल तरच हे दागिने सहसा वापरण्यात येतात. त्यामुळे किमान वर्षातून एकदा अथवा कार्याच्या वेळी सोन्याचे दागिने पॉलिश करून घेतले जातात. सोन्याचे दागिने घेतल्यानंतर त्याची काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. सोन्याची चमक गेली तर सोन्याचे दागिने बघायला अजिबात चांगले वाटत नाहीत. पण तुमच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांना तुम्हीदेखील सोप्या हॅक्समुळे चमक आणू शकता.असेच काही हॅक्स आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. बऱ्याचदा सोन्याच्या दागिन्यांची चमक गेली तर अनेक जण सोन्याचे दागिने विकून टाकतात. पण तुमच्या सोन्याची दागिन्यांची चमक तुम्ही घरच्या घरी आम्ही दिलेले हॅक्स वापरून नक्कीच तशीच ठेऊ शकता.
अधिक वाचा – मोत्यांच्या दागिन्यांची घरच्या घरी घ्या सोप्या पद्धतीने काळजी
माईल्ड लिक्विड सोप (Mild Liquid Soap)
घरच्या घरी तुम्हाला सोन्याचे दागिने स्वच्छ करायचे असतील तर तुम्ही माईल्ड लिक्विड सोपचा वापर करावा. एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्या. यामध्ये थोडेसे माईल्ड लिक्विड सोप तुम्ही मिक्स करा. त्यानंतर तुमचे सोन्याचे दागिने तुम्ही या पाण्यात किमान 15 मिनिट्स ठेवा. थोड्या वेळानंतर दागिने यातून काढून ब्रशने स्वच्छ घासा आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. सोन्याच्या दागिन्यांना पुन्हा पहिल्यासारखी चमक आलेली तुम्हाला दिसेल.
डिशवॉशिंग पावडर (Dish Washing Powder)
आपल्या घरातील डिश वॉशिंग पावडरचादेखील तुम्ही यासाठी उपयोग करू शकता. एका बाऊलमध्ये तुम्ही कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये तुम्ही डिशवॉशिंग पावडर घाला. या मिश्रणामध्ये तुम्ही साधारण 10-15 मिनिट्स सोन्याचे दागिने बुडवून ठेवा. त्यानंतर दागिने या पाण्यातून बाहेर काढा आणि मग ब्रशने तुम्ही स्वच्छ करा. तुमच्या सोन्याच्या दागिन्यांना झळाळी देण्यासाठी तुम्ही हा सोपा उपाय करू शकता.
हळदीने करा स्वच्छ (Use Turmeric Powder)
सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हळदीचादेखील वापर करू शकता. सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यापूर्वी एका स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्या. त्यानंतर या दागिन्यांना अगदी चिमूटभर हळद लावा आणि मलमलच्या कपड्याने तुम्ही या दागिन्यांवर हळद रगडा. तुमच्या सोन्याच्या दागिन्यांना पुन्हा एकदा तीच झळाळी मिळेल.
अमोनिया (Ammonia)
हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल आणि याचा नक्की वापर कसा करायचा याचीही तुम्हाला कल्पना नसेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो. कोमट पाण्यामध्ये तुम्ही अमोनिया पावडर मिक्स करा आणि या मिश्रणात सोन्याचे दागिने तुम्ही काही वेळासाठी तसेच ठेवा. त्यानंतर ब्रशच्या सहाय्याने तुम्ही काळे पडलेले सोन्याचे दागिने स्वच्छ करून घ्या. नंतर स्वच्छ फडक्याने हे दागिने नीट पुसून घ्या आणि पुन्हा आपल्या कपाटात ठेवा अथवा तुमच्या कार्यक्रमासाठी तुम्ही दागिने घाला. मात्र अमोनियाचा वापर करताना सोन्याच्या दागिन्यांवर कोणताही हिरा अथवा मोतीचा वापर झालेला नसेल याची काळजी घ्या. अमोनियाचा वापर यावर झाल्यास मोती वा हिऱ्याचे दागिने खराब होण्याची शक्यता आहे. अमोनिया खूपच हार्ड असल्याने त्यावरची चमक जाऊ शकते.
अधिक वाचा – जेमस्टोन दागिन्यांची अशी घ्यावी काळजी, टिकतील अधिक काळ
लक्षात ठेवा या गोष्टी
सोन्याचे दागिने स्वच्छ करताना या गोष्टींची काळजी घेणे आणि लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे त्याची तुम्ही नोंद घ्यायला हवी
- हिरे आणि सोन्याचे दागिने एकत्र ठेऊ नका. हिऱ्यामुळे सोन्याच्या दागिन्यांवर ओरखडे येण्याची शक्यता असते
- पूल अथवा गरम पाण्यात सोन्याचे दागिने घालून अजिबात जाऊ नका
- तसंच क्लोरीनच्या पाण्यापासूनही सोन्याचे दागिने दूर ठेवा
- भांडी घासताना अथवा बागकाम करताना सहसा सोन्याची अंगठी असल्यास, काढूनच काम करा. भांडी घासण्याच्या साबणामुळे सोन्याच्या दागिन्यांवर परिणाम होतो. त्यामुळे सहसा तुम्ही हे दागिने काढूनच काम करा
आम्ही दिलेले हॅक्स आणि उपाय तुम्हाला आवडले असतील तर नक्की हा लेख शेअर करा आणि तुम्हीदेखील या हॅक्सचा वापर करायला विसरू नका
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक