ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
आऊटडेटेड मेकअप ट्रेंड जे आताच करायला हवेत अनफॉलो

आऊटडेटेड मेकअप ट्रेंड जे आताच करायला हवेत अनफॉलो

मेकअप करायला आवडत असेल आणि तुम्ही वेगवेगळे ट्रेंड फॉलो करत असाल तर आजचा विषय तुमच्यासाठी फारच महत्वाचा आहे.  कारण मेकअप करताना काही वेगळे प्रयोग करण्याआधी तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणे फारच महत्वाचे आहे.  कपड्यांमध्ये जसे वेगवेगळे फॅशन ट्रेंड असतात. अगदी तसेच मेकअपमध्ये वेगवेगळे ट्रेंड येतात आणि जातात. जुने मेकअप ट्रेंड फॉलो करणे हे फार आऊटडेटेड मानले जाते. असे जुने ट्रेंड तुम्ही आताच अनफॉलो करायला हवेत. तुम्ही नियमित मेकअप करत असाल तर हे काही ट्रेंड तुम्ही आताच अनफॉलो करा.

चुकीचा मेकअप ठरु शकते त्वचेसाठी त्रासदायक, होतील हे त्रास

लाँग विंग्ड आयलायनर 

जुनी फॅशन पुन्हा परत येते हे आपण जाणतो. डोळयांना लांबलचक लायनर लावण्याचा ट्रेंड काही काळ चांगलाच ट्रेंडमध्ये होता. डोळ्यांचा बाहेर येत हे लायनर लावले जात होते. पण आता हा ट्रेंड मागे पडला आहे. मिनिमल मेकअप लुकमुळे आता असे आयलायनर हे फार आऊटडेटेड वाटते. तुम्ही खूप मेकअप केला आहे हे हा ट्रेंड दाखवून देते. त्यामुळे आता हे अशा पद्धतीचे लायनर जास्त जण लावताना दिसत नाही. जर तुम्ही असे लायनर लावत असाल तर आताच ही सवय बंद करा. कारण त्यामुळे तुम्ही उठून दिसणार नाही तर तुम्ही आऊटडेटेड आहात असे दिसेल .

ADVERTISEMENT

डार्क आयशॅडो
डोळ्यांच्या वर लावले जाणारे आयशॅडो लावायला खूप जणांना आवडते. वेगवेगळे रंग घेऊन त्यापासून काहीतरी वेगळे क्रिएट करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर आता काही खास सण वगळता कोणीही डार्क आयशॅडो वापरत नाही. जर आयशॅडो वापरायचा असेल तर तो स्किनटोनला साजेशा म्हणजे अगदी लावलेलाही नाही असा ग्लॉसी स्किन रंग निवडून लावला जातो. या रंगामुळे तुम्ही फार नॅचरल दिसता 

दंड टोन्ड करण्यासाठी जीममध्ये करा हे 5 व्यायाम, दिसेल फरक

Instagram

ADVERTISEMENT

केकी बेस
फाऊंडेशन लावण्याचा ट्रेंड आता फार कमी झाला आहे. खूप फाऊंडेशन पावडर लावणे आता फार आऊटडेटेड झाले आहे. केकी, फुटणारी त्वचा आता कोणालाच आवडत नाही. जर तुम्हीही रोज हेव्ही बेस फाऊंडेशन किंवा बीबी क्रिम लावत असाल तर ती लावू नका. त्याऐवजी एखादे फेस सीरमही तुमच्या चेहऱ्यावर मग मेकअप करु शकता. तुम्हाला फाऊंडेशन लावायचे असेल तर तुम्ही एखादे लाईट फाऊंडेशन निवडू शकता. 

आयब्रोज करु नका गडद
जाड आयब्रोज सगळ्यांना आवडतात. पण हे आयब्रोज करताना कधी कधी इतका प्रॉडक्टचा वापर केला जातो की, हे आयब्रोज सुंदर दिसण्याऐवजी यक्कु दिसू लागतात. काही काळापूर्वी असे डार्क आयब्रोज करण्याची पद्धत  होती. पण आता पुन्हा एकदा हा ट्रेंड कमी होऊ लागला आहे. काळ्या रंगाचा उपयोग करण्याऐवजी आता चॉकलेटी किंवा गडद चॉकलेटी रंगाचा उपयोग केला जातो.  जर तुम्ही काळ्या रंगाचा उपयोग करत असाल तर तो आताच थांबावा त्या ऐवजी चॉकलेटी रंग निवडा. तो अधिक चांगला उठून दिसतो. 

नॅचरल ब्लसर 

गुलाबी गाल सगळ्यांनाच हवे असतात. पण त्यासाठी खूप ब्लशर वापरणे चांगले नाही. लाल, गुलाबी रंगाचे ब्लशर हे मुळीच चांगले दिसत नाही. ते फेक आहेत ते दिसून येते. जर चमकणारे आणि गाल लाल करणारे ब्लशर वापरत असाल तर हा ट्रेंड आऊटडेटेड झाला आहे. त्या ऐवजी भारतीय त्वचेसाठी पीच रंगाचा ब्लशर अधिक चांगला दिसतो. 

ADVERTISEMENT

आता तुम्ही करत असलेल्या चुका टाळा आणि जुने ट्रेंड अनफॉलो करा.

उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी वापरा हे उटणं

30 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT