ADVERTISEMENT
home / मनोरंजन
मलायका- अर्जुन एकत्र

ब्रेकअपच्या चर्चा नुसत्या अफवा,मलायका-अर्जुन पुन्हा एकत्र

सेलिब्रिटी कपलमधील मलायका- अर्जुन एक पॉवर कपल आहे. वयामध्ये इतके अंतर असूनही त्यांची जोडी ही चर्चेचा विषय असते. मध्यंतरीच्या काळात मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा होऊ लागल्या होत्या. त्यांनी एकमेकांचे फोटो काढून टाकले म्हणून सगळीकडे त्यांच्या वेगळे होण्याच्या बातम्या जोर धरु लागल्या होता. पण ‘कल का भूला शाम को घर आहे तो उसे भुला नही कहते’ म्हणतात अगदी तसंच या दोघांनी संध्याकाळी त्याचे फोटो इन्स्टावर शेअर केले आणि सगळे आलबेल झाले असे दिसून आले. आता मलायका- अर्जुन सतत एकत्र दिसत आहेत. नुकतेच ते डेटला गेले असे देखील कळत आहे.

गानसम्राज्ञी लतादीदींना अजूनही काही काळ ठेवणार आयसीयुमध्ये, डॉक्टरांची माहिती

ब्रेकअप तो बस बहाना है

ब्रेकअप झाले या कारणामुळे खूप जणांचे लक्ष हे या कपलकडे लागून राहिले होते. सगळ्यांनी त्यांच्या प्रोफाईल चाळल्या. अचानक मलायका आणि अर्जुन  या दोघांनी एकमेकांचे फोटो का डिलीट केले याची चर्चा होऊ लागली. प्रसारमाध्यमामधून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला. पण त्यानंतर तासातचं ही दोघी एकत्र दिसून आले. एका लंच पार्टीसाठी हे दोघे एकत्र होते. मलायकाने या वेळी पांढऱ्या रंगाचा एक शॉर्ट ड्रेस घातला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर निळ्या रंगाच्या हुडमध्ये दिसत आहे. तो आधी पुढे जाऊन मलायकासाठी गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी तो उभा राहतो. आता त्यांच्यात काही आलबेल नसतं तर कदाचित ते एकत्र दिसले नसते. पण आता या दोघांमध्ये सगळं काही आलबेल आहे असं म्हणायला हवं.

मलायकाचा तो ड्रेस होतोय व्हायरल

मलायकाने त्या डेटसाठी जो ड्रेस घातला आहे तो ड्रेसही चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्या ड्रेसमध्ये ती सुंदर अशी परी दिसत आहे. तिचा हा ड्रेस ओपन प्लंज नेक असून तो तिला खूपच चांगला दिसत आहे. तिच्या या पांढऱ्या ड्रेससोबत तिने काळ्या रंगाचे हिल्स बुट्स घातले आहेत. ज्यामुळे ती खूपच जास्त ग्रेसफुल दिसत आहे. त्यामुळे तिचा ब्रेकअप झाला असे सांगण्याचा काहीही संबंध येत नाही.

ADVERTISEMENT

कडक उपवासानंतर अजय देवगणने घेतलं सबरीमाला मंदिरात अय्यपाचं दर्शन

मलायका दिसते एकदम फिट

मलायकाचे वय झाले असे जरी तिला कोणीही म्हटले तरी देखील तिचा फिटनेसने तिने सगळ्यांना मागे टाकले आहे. तिच्या सोशल मीडियावर तिचे हॉट फोटोज कायम ती पोस्ट करत असते. त्यामुळे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांशी जोडलेली असते. मलायकाच्या इन्स्टावरुन अर्जुनचे फोटो कोणत्या कारणासाठी काढले हा प्रश्न मात्र तसाच कायम आहे. पण नव्या  वर्षात नवा संकल्प असे काहीतरी समजायला काहीच हरकत नाही.

अर्जुन आणि मलायका दिसणार का एकत्र

अर्जुन आणि मलायका ही जोडी खूप ट्रोल होत असली तरी देखील त्यांना स्क्रिनवर एकत्र पाहण्याची खूप जणांना इच्छा आहे. त्यांना एकत्र चित्रपटात कधी पाहता येईल असे देखील काहींना झाले आहे. पण त्यांचे कोणतेही प्रोजेक्ट एकत्र असल्याची कोणतीही बातमी अद्याप समोर आलेली नाही. 

आता मलायका- अर्जुनच्या फॅन क्लबला त्यांच्या या नव्या फोटोजमुळे नक्कीच गैरमसज दूर झाला असेल.

ADVERTISEMENT

किरण माने प्रकरणात मालिकेने सोडले मौन, मालिकेतून का काढले याचे दिले कारण

17 Jan 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT