बॉलीवूडमध्ये ग्लॅमरस इमेज असलेली अभिनेत्री मलायका अरोरा कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचदा या चर्चेचा विषय कधी तिचा अरबाज खानसोबत झालेला घटस्फोट असतो तर कधी वयाने लहान बॉयफ्रेंड अर्जून कपूरसोबत असलेले रिलेशन असते. मात्र आता मलायकाने एका वेगळ्याच गोष्टीचा खुलासा केल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. मलायकाने एका टेलिव्हिजन शोमध्ये चक्क पुन्हा आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मलायका आणि अरबाज यांचा मुलगा अरहान खान आता जवळजवळ 19 वर्षांचा आहे. शिवाय मलायकादेखील वयाच्या 47 पर्यंत पोहचली आहे. तरिदेखील या वयात तिला पुन्हा एकदा आई व्हायचं आहे. मलायका सध्या ‘सूपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये परिक्षकाची भूमिका निभावत आहे. याच शोमध्ये तिने तिचं आई होणार असल्याचा खुलासा केला आहे.
काय म्हणाली मलायका
‘सूपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी परिक्षकाचे काम पाहत होती. मात्र तिच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्यामुळे शिल्पाला आयसोलेट व्हावं लागलं. ज्यामुळे तिच्या जागी काही एपिसोडसाठी मलायका अरोरा आता परिक्षकाचे काम पाहणार आहे. मलायकाला या शोमधील स्पर्धक मुलीपासून खूपच कुतूहल वाटत आहे. त्यामुळे तिला नेहमीच असं वाटतं की तिला एक मुलगी असती तर किती छान झालं असतं. एका एपिसोडमध्ये स्पर्धक अंशिका राजपूतचा डान्स पाहून मलायका इतकी प्रभावित झाली की तिने शोमध्ये जाहीरपणे तिची आई होण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या मते ती आता पुन्हा आई होण्याबाबत खूप गंभीरपणे विचार करत आहे. कारण तिला आता एक गोंडस मुलगी हवी आहे. तिच्या मते तिच्या जवळपास सतत मुलंच असतात. ती एका तरूण मुलाची आईदेखील आहे. पण आता तिला स्वतःची मुलगी हवी आहे. कारण मलायकाच्या मते तिच्याकडे भरपूर स्टायलिश कपडे, ब्रॅंडेड शूज आणि मेकअपचं साहित्य आहे पण ते शेअर करायला तिच्याजवळ तिची मुलगी नाही. या शोमध्ये भावूक होत मलायकाने डान्स स्पर्धक अंशिका मोठी झाल्यावर तिला स्वतःचा मेकअप आणि कपडे एका मोठ्या बॅगमध्ये पॅक करून देण्याचे वचन दिले. मात्र तरिही तिला या सर्व गोष्टी करण्यासाठी स्वतःची मुलगी हवी आहे.
गीता कपूरने मलायकाने लवकर आई व्हावे यासाठी केली प्रार्थना
‘सूपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये गीता कपूरदेखील परिक्षकाचे काम पाहत आहे. मलायकाचे आई होण्याबाबतचे बोलणे ऐकून गीता कपूर इतकी भावनिक झाली की तिने चक्क सर्वांसमोर मलायकाला पुन्हा आई होता यावं यासाठी प्रार्थनाच केली. गीताला असं वाटत आहे की लवकरच मलायकाला एक छानसी गोंडस मुलगी व्हावी. यावर मलायकाने गीता तुझ्या तोंडात साखर पडो असं म्हणत आनंद व्यक्त केला. मलायका आणि अर्जून कपूर सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत त्यामुळे मलायकाच्या मते तिला आता मुलगी व्हावी. पण असं नाही झालं तर तिचा मुलगी दत्तक घेण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे आता मलायकाच्या घरात आता पुन्हा पाळणा हलणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. बेस्ट फ्रेंड करिनानंतर लगेचच मलायकानेही पुन्हा आई होण्याचा निर्णय घेतला आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
देवदासनंतर आता संजय लीला भन्सालीच्या ‘हीरा मंडी’त माधुरीचा मुजरा
ऑडिशन न देताच तापसी पन्नूने मिळवला होता तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट
अलिबागकरांवरुन विधान करणे आदित्यला पडले महाग, मनसेने दिला इशारा