ADVERTISEMENT
home / मनोरंजन
निक जोनस आधी खरंच ‘या’ व्यक्तीशी झालं होतं का प्रियांकाचं लग्न, जाणून घ्या सत्य

निक जोनस आधी खरंच ‘या’ व्यक्तीशी झालं होतं का प्रियांकाचं लग्न, जाणून घ्या सत्य

सेलिब्रेटींच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. कारण ते नेहमीच आपल्या आवडत्या कलाकारांवर जीवापाड प्रेम असतात. बऱ्याचदा या कलाकारांवरील प्रेम दर्शवण्यासाठी चाहते त्यांच्या मर्यादादेखील ओलांडतात. पत्र, ईमेल, फोन कॉल अशा माध्यमातून ते त्यांच्या आवडत्या कलाकारापर्यंत आपलं प्रेम पोहचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र तुम्ही कधी एखाद्या कलाकारासोबत चाहत्याने गुपचूप लग्न केलेलं ऐकलं आहे का? अभिनेत्री प्रियांका चोप्रावर असंच गुपचूप प्रेम करणाऱ्या या हॉलीवूडच्या फॅनने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. एवढंच नाही तर आता जवळजवळ सहा वर्षांनंतर त्याने प्रियांकासोबत केलेल्या या लग्नाचं गुपितच सोशल मीडियावर फोटोंसह फोडलं आहे. 

Instagram

खरंच प्रियांकाने निक आधी केलं होतं का या फॅनसोबत लग्न

प्रियांका चोप्रा  आणि निक जोनस खरंतर आपल्या संसारात आता चांगलेच रमले आहेत. आधीच निकपेक्षा वयाने मोठी आणि चक्क परदेशात नांदायला गेलेल्या बॉलीवूडच्या देसी गर्लच्या संसाराबाबत अनेकांना चिंता वाटत होती. त्यात आता या बातमीने त्या चिंतेत अधिकच भर घालती आहे. सोशल मीडियावरून पसरलेल्या या बातमीमुळे प्रियांकाच्या दोन लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र चाहत्यांना हे ऐकून आनंद होईल की ही बातमी मुळीच धक्कादायक नाही उलट जराशी मजेशीरच आहे. सोशल मीडियावर Brandon schuster या व्यक्तीने प्रियांका चोप्राबाबत हे मजेशीर ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्याने प्रियांका चोप्रा आणि  त्याचं सहा वर्ष आधी लग्न झाल्याचं शेअर केलं आहे. त्यानं असं ट्विट केलं आहे की, ‘प्रियांकाने माझ्यासोबत 2014 मध्ये लग्न केलं आहे. कारण एका इव्हेंटमध्ये मी तिचं स्वागत करताना तिच्या गळ्यात फुलांची माळ घातली होती. मात्र मला तेव्हा हे माहीत नव्हतं की भारतीय सभ्यतेनुसार हा लग्नातील एक विधी आहे’ त्याने ही गोष्ट मजेत शेअर केली आहे. हे ऐकून प्रियांकाने त्याच्याशी खरंच सहा वर्षापूर्वी लग्न होतं की नव्हतं याचा नक्कीच खुलासा झाला असेल.

ADVERTISEMENT

प्रियांका आणि निकचा संसार

बॉडीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस बॉडीवूडप्रमाणेच हॉलीवूडचंही हॉट कपल आहे. या दोघांच्या पर्सनल आणि मॅरीड लाईफची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडणारच.  2018 साली प्रियंका आणि निकने हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला होता. या दोघांचा शाही लग्नसोहळादेखील सोशल मीडियावर प्रचंड गाजला होता. प्रियंका आणि निकचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्यामुळे लग्नानंतर सतत त्यांच्याविषयी जाणून घेण्यास त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्रियंका निकपेक्षा वयानेदेखील मोठी आहे तरी त्यांच्या वैवाहिक जीवनावर याचा कोणताच परिणाम झालेला नाही. शिवाय बॉलीवूड आणि हॉलीवूड सेलिब्रेटी असल्यामुळे सोशल मीडियावरून त्यांच्याबाबत अशा चर्चा सतत होतच असतात. मात्र निक आणि प्रियांका इतके संमजस नक्कीच आहेत की या अशा शुल्लक गोष्टींमुळे त्यांच्या मॅरीड लाईफवर परिणाम नक्कीच करून घेणार नाहीत. असो या दोघांंचं प्रेम असंच दिवसेंदिवस वाढत जावो. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

 

ADVERTISEMENT

बिपाशा बासूने साजरा केला लग्नाचा चौथा वाढदिवस,शेअर केला फोटो

साजिदसोबतच्या लग्नाला दिव्या भारतीच्या पालकांचा होता विरोध

लॉकडाऊनमध्ये शिल्पा शेट्टीचे कुटुंब घरात राहून करत आहे धमाल

03 May 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT