बुधवार (30 जून) हा अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) च्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळवणारा ठरला. पती राज कौशल (Raj Kaushal) याला हृदयविकाराचा झटका आल्याने मंदिरा बेदीवर दुःख कोसळले आहे. मंदिरा आणि राज यांची जोडी नेहमीच आदर्श म्हणून पाहिली जात होती. तर मंदिरा आणि राज यांचा प्रेमविवाह होता. मंदिराचं राजवर अतिशय प्रेम असल्याचं तिने आता त्याच्या मृत्यूनंतरही कृतीतून दाखवून दिलं आहे. राजच्या जाण्याने मंदिरा पूर्ण कोसळली आहे हे तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंमधूनही दिसून येत आहे. मात्र समाजातील परंपरा मोडत मंदिरा बेदीने आपल्या प्रेमापोटी राजवर अत्यंसंस्कार केले आहेत. सोशल मीडियावर मंदिराच्या या कृतीनंतर सोशल मीडियावर तिला सलाम केला जात आहे. अतिशय डोळे पाणावणारे हे दृश्य असून एखाद्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या दुरावा सहन करणे किती कठीण आहे हेच यातून दिसून आल्याने सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे. इतकंच नाही तर इंडस्ट्रीतील अनेकांनीही सोशल मीडियावर राजच्या जाण्यामुळे झालेले दुःख व्यक्त केले आहे. अजूनही कोणालाच विश्वास न बसणारी अशी ही घटना असल्याचेही म्हटले जात आहे.
‘जून’ – नवी सुरूवात करून देणारा, मनाची घालमेल ओळखणारा
राजच्या जाण्याने मंदिराला कोलमडली
अभिनेत्री मंदिरा आणि राज हे अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते. त्या दोघांना नेहमीच एकत्र पाहिले जायचे. एकमेकांविषयी असणारे प्रेम, आदर या जोडीकडून नेहमीच पाहायला मिळायचा. मंदिराने राजची साथ ही अंतिम क्षणीदेखील सोडली नाही. राजच्या जाण्यानंतर मंदिरा कोलमडून गेली असल्याचे अनेक व्हायरल व्हिडिओमधून दिसून येत आहे. अनेक वर्षांच्या परंपरा मोडित काढत मंदिराने आपला पती राज याच्यावर अंत्यसंस्कार केले. पतीला अखेरचा निरोप देत असताना मंदिराची अवस्था ही हृदय हेलावणारी असून सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त केली जात आहे. अखेरचा निरोप देताना मंदिरा स्वतःला सावरू शकली नाही. मंदिराच्या या धाडसाला आणि तिच्या प्रेमाला सोशल मीडियावर सलाम देण्यात येत आहे. तिच्यासह तिचा मित्रपरिवार आणि कुटुंबदेखील होते. पण हे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य अनेकांच्या मनात नक्कीच घर करून गेले. मंदिरा आणि राज यांना वीर नावाचा मुलगा असून गेल्यावर्षी त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले आहे.
अभिनेत्री सुरभी हांडे दिसणार देवी सप्तश्रृंगीच्या भूमिकेत
रविवारी केली होती पार्टी
मंदिराचा मित्रपरिवार खूपच मोठा आहे. तसंच राज आणि मंदिराचे मित्रमैत्रिणीही कॉमन आहेत. नुकताच चार दिवसांपूर्वी रविवारी दोघांनीही आपला मित्र रोनित रॉय याच्यासह पार्टी केली होती. या पार्टीमधील काही फोटोही पोस्ट केले होते. मात्र पुढच्या तीनच दिवसात होत्याचं नव्हतं होणार याची साधी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. रोनितला समोर पाहून मंदिराचा धीर सुटला आणि ती ढसाढसा रडू लागली. मंदिराचे हे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. मंदिराचे दुःख नक्कीच मोठे आहे. पण सध्या तिला सावरण्यासाठी तिचा मित्रपरिवार सरसावला आहे. तर आता दोन्ही मुलांना सांभाळण्यासाठी मंदिरालादेखील स्वतःला सावरावे लागणार आहे. मात्र अचानक कोसळलेल्या या दुःखामुळे मंदिराच्या चाहत्यांनाही आता नक्की कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायची हे कळून येत नाहीये. तर तिच्या या दुःखात सर्वच सहभागी असून तिला हे दुःख पेलण्याची ताकद मिळो अशीच प्रार्थना सर्वजण करत आहेत.
रणवीर सिंहच्या या लुकची सगळीकडे चर्चा, आता केलाय असा अवतार
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक