ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
मँगो ड्रींक्सच्या या सोप्या रेसिपीज करा आणि मिळवा वाहवा

मँगो ड्रींक्सच्या या सोप्या रेसिपीज करा आणि मिळवा वाहवा

आंब्याला फळांचा राजा असं म्हटलं जातं. जर उन्हाळ्यात भरपूर आंबा तर खावाच पण त्यासोबतच आंब्याच्या काही हटके रेसिपीज आणि त्यातही मँगो ड्रींक्स करून पाहायलाच हव्यात. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही खास मँगो ड्रींक रेसिपीज सांगणार आहोत. ज्या सोप्या तर आहेतच पण आंबा असल्यामुळे पौष्टीकही आहेत. मग पाहूणे आल्यावर करा या मँगो ड्रींक रेसिपीज आणि मिळवा वाहवा. या रेसिपीज खानदानी राजधानीचे कॉर्पोरेट शेफ महाराज जोधाराम चौधरी आणि रसोवराचे कॉर्पोरेट शेफ महाराज हेमाराम चौधरी यांनी सांगितल्या आहेत.

मँगो लस्सी

Mango Drinks 1
साहित्य

पिकलेला आणि सोलून घेतलेला 2 कप आंबा

दही 1 कप

ADVERTISEMENT

दूध 1/2 कप

साखर 3 मोठे चमचे किंवा स्वादानुसार

आमरस  ½ कप

वेलची पावडर 1 चमचा

ADVERTISEMENT

कृती

दही, आंबा, आमरस आणि साखर ब्लेंड करून घ्या.

आता यामध्ये वेलची पावडर घालून पुन्हा ब्लेंड करा.

आता एका लांबट ग्लासमध्ये हा मिश्रण घालून त्यात वेलची पावडर आणि कापलेल्या आंब्याच्या फोडी घालून सजवा. थंड थंड सर्व्ह करा.

ADVERTISEMENT

वाचा – संत्र्याचे आरोग्यदायी आणि सौंदर्य फायदे

आमरस

Mango Drink 2
साहित्य

पिकलेला आंबा 1 किलोग्रॅम

केसर 1/4 चमचे

ADVERTISEMENT

पिठीसाखर 1 कप

थंड दूध 2 1/2 कप

कृती

आंबा सोलून घ्या आणि त्याचे क्यूब्स कापून मिक्सरमध्ये साखर, दूध आणि केसरसोबत स्मूदीसारखं ब्लेंड करून घ्या. नंतर ग्लासात घालून आईस क्यूब्ससोबत  थंडगार सर्व्ह करा.

ADVERTISEMENT

मँगो आईस टी

Mango drink 3
साहित्य

सोललेला आणि कापलेला आंबा -1 कप

टी बॅग्स- 2 किंवा चहा पावडर – 2 चमचे

पाणी – 4 कप

ADVERTISEMENT

लेमन ज्यूस – 1 चमचा

मँगो क्रश – 2 चमचे

साखर – स्वादानुसार

पुदीन्याची पान – गार्निशिंगसाठी

ADVERTISEMENT

कृती

पाणी उकळून घ्या. आता त्यात टी बँग्ज किंवा टी पावडर घाला आणि साखर घाला. आता 1-2 मिनिटांपर्यंत उकळून घ्या. जोपर्यंत हे काळं होत नाही.

हे मिश्रण एका पातेल्यात घेऊन गाळून घ्या. आता यामध्ये लेमन ज्यूस, मँगो सिरप आणि आईस क्यूब्स घालून चांगलं मिक्स करा.

आता सर्व्हिंग ग्लासमध्ये आईस क्यूब्स, कापलेला आंबा घाला आणि वरून टी घाला.

ADVERTISEMENT

सर्वात शेवटी पुदीनाच्या पानांनी गार्निश करून सर्व्ह करा.  

मग तुम्हीही या मँगो ड्रींक रेसिपीज नक्की करून पाहा आणि तुम्हाला आवडल्या का ते कळवा. 

हेही वाचा – 

उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ADVERTISEMENT

तुमच्यासाठी कच्च्या कैरीच्या स्वादिष्ट रेसिपीज

उन्हाळ्यात ही 5 थंडपेय तुम्हाला ठेवतील कूल!

15 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT