ADVERTISEMENT
home / Recipes
Mango kesar lassi recipe

अशी बनवा घरच्या घरी थंडगार मॅंगो केसर लस्सी

मे महिन्याचा कडक उन्हाळा सुरू झाली की सर्वांचे धाबे दणादणात. कारण उष्णतेचा पारा या काळात एवढा वर चढतो की घराबाहेर पाऊल टाकण्याची हिंम्मत होत नाही. कधी कधीतर अशा वेळी घरात राहणंही मुश्किल होतं. घरातील पंखे आणि एसीची हवा पुरेशी पडत नाही. अशा वेळी उष्माघातापासून वाचण्यासाठी घरातच संतुलित आहार आणि पुरेसं पाणी पिण्याची गरज असते. हायड्रेट राहण्यासाठी पाण्यासोबत सरबत, ताक, लस्सी, पन्हं अशी थंडगार पेयं सोबत असतील तर उकाडा सुसह्य होतो. खंर सांगायचं झालं तर प्रत्येकाला या काळात काही तरी थंडगार सतत प्यावं असं वाटत असतं. त्यामुळे घरात राहून नवनवीन गोष्टी बनवणं फायदेशीर आहे. यासोबतच जाणून घ्या उन्हाळ्यातील आहार | Food For Summer Days In Marathi

या उन्हाळ्यात बनवा थंडगार मॅंगो लस्सी

बाजारात गेल्यावर या सीझनमध्ये सगळीकडे थंडगार लस्सीचं दर्शन घडतं. मात्र अशी दाट आणि मलईदार लस्सी घरी बनवणं सर्वांनाच जमतं असं नाही. उन्हाळ्यात मातीच्या ग्लासातून सर्व्ह केली जाणारी गारेगार, लुसलुशीत लस्सी पोटात जाताच उष्णता सहन करणं सोपं जातं. त्यामुळे उन्हाचा पारा चढू लागताच अनेकांना अशा लस्सीचे वेध लागतात. आजकाल लस्सीमध्ये निरनिराळे प्रकार बाजारात मिळतात. अनायसे प्रत्येकाच्या घरी आंब्याची पेटी आलेलीच असते. त्यामुळे नेहमीच्या लस्सीला एक छान ट्विस्ट देत तुम्ही देखील घरी मॅंगो केसर लस्सी ट्राय करू शकता. यासाठी फॉलो करा ही रेसिपी

साहित्य – 

  • एका आंब्याचा गर
  • एक वाटी दही
  • गरजेनुसार साखर
  • वेलची पूड
  • दूधात भिजवलेलं केसर

मॅंगो लस्सी बनवण्याची कृती –

ADVERTISEMENT
  • सर्वात आधी आंब्याचा गर काढून घ्या.
  • ब्लेंडरमध्ये आंब्याचा गर आणि दही धुसळून एकजीव करा.
  • त्यामध्ये साखर, वेलची पूड आणि केशर दूध टाका.
  • पुन्हा एकदा सर्व साहित्य घुसळून घ्या.
  • सर्व्ह करताना ग्लासात बर्फ टाकून त्यावर लस्सी टाका.
  • मलई, केशर आणि आंब्याच्या फोडीने ग्लास सजवा.

लस्सी पिण्याचे फायदे

तुम्ही रोझ सिरप, केसर, खस, ड्रायफ्रूट्स असे अनेक फ्लेव्हर्स वापरून लस्सीचे निरनिराळे प्रकार बनवू शकता. मात्र त्यासाठी जाणून घ्या लस्सी पिण्याचे फायदे

  • लस्सी पिण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, कारण दह्यामधून तुमच्या पोटाला पुरेसं प्रोबायोटिक्स मिळतात.
  • दह्यापासून ताक अथवा लस्सी बनण्यासाठी ते घुसळावे लागते या प्रोसेसमध्ये निर्माण होणारे पोषक घटक शरीरासाठी फायद्याचे असतात.
  • उन्हाळ्यात शरीरात तयार होणारी उष्णता कमी होते आणि शरीराला पुरेसा थंडावा मिळतो.
  • नियमित लस्सी अथवा ताक पिण्यामुळे तुमच्या शरीरात चांगल्या जिवाणूंची वाढ होते ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचनाचा त्रास कमी होतो. 
  • दह्यामधील कॅल्शिअममुळे तुमच्या हाडांचा विकास होतो. 
  • दह्यातील लॅक्टिक अॅसिड आणि व्हिटॅमिन डीमुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

04 May 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT