home / मनोरंजन
mann udu udu zal

इंद्रा आणि दिपूच्या नात्यात ट्विस्ट, सानूसोबत लागणार इंद्राचं लग्न

‘मन उडू उडू झालं’ (Mann Udu Udu Zala) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच घर केले आहे. या मालिकेतील इंद्रा (Indrajeet) अर्थात अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) आणि दीपिका (Deepu) अर्थात हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही जोडी सर्वांनाच आवडत आहे. #Indradeepu एक फ्रेश जोडी, फ्रेश कथा यामुळे ही मालिका अगदी तरूणांमध्येही पाहिली जाते. या मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहे. विशेषतः इंद्रा आणि दिपूचं नातं खुलत असून दोघांनीही एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले आहे. मात्र आता या नात्यामध्ये एक नाव ट्विस्ट दिसून येणार आहे. पण हा ट्विस्ट प्रेक्षकांना कितपत पचनी पडेल हे मात्र सांगता येत नाही. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Me Nandayla) या मालिकेतील ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांनी पाहणं बंद केलं होतं. मात्र या मालिकेच्या बाबतीत असं काही होऊ नये अशीच चाहत्यांना आशा आहे.

अधिक वाचा – ‘मिसेस मुख्यमंत्री’ ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’

नव्या प्रोमोनुसार इंद्रा आणि सानूचं लग्न 

या मालिकेचा नवा प्रोमो प्रसारित करण्यात आला आहे. देशपांडे सर अर्थात दीपूचे वडील यांनी मालिकेतील कार्तिक आणि सानू अर्थात दीपूची मोठी बहीण यांच्या नात्याला नकार दिला असून कार्तिक त्यांना अजिबात आवडलेला दाखवले आहे. इतकंच नाही तर सानूचे लग्न इंद्राशी लावण्याचा निर्णयही देशपांडे सर घेणार असल्याचे दिसून येणार आहे. मात्र या सगळ्या घडामोडीमुळे दीपू आणि इंद्राच्या प्रेमाचे काय होणार आणि या दोघांचा काय निर्णय असणार? सानिका या लग्नासाठी तयार होणार का? कार्तिकचं प्रेम विसरून देशपांडे सरांची तत्व सानिका पाळणार का? असे अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी अर्थातच मालिका पुढे पाहावी लागणार आहे. मात्र दीपू आणि इंद्राचे प्रेम नुकतेच खुलायला लागले होते आणि आता हे असे वळण पाहणे प्रेक्षकांना रूचेल का? असाही प्रश्न आहे. 

अधिक वाचा – मराठी शिक्षणपद्धतीचा आरसा ‘बदली’

प्रेक्षकांचा हिरमोड होऊ नये 

एक वेगळी मालिका म्हणून सध्या या मालिकेचा चांगला टीआरपी आहे. त्यामुळे दीपू आणि इंद्राला वेगळं करून या मालिकेतून प्रेक्षकांचा हिरमोड होऊ नये अशीच चर्चा आता हा प्रोमो पाहून सगळीकडे सुरू झाली आहे. देशपांडे सरांच्या तिन्ही मुलींच्या आयुष्यातील चढउतार दाखविण्यात येत आहेत. तर देशपांडे सरांची तत्व या सगळ्यापुढे पुरून उरणार का? असाही प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. पण कोणत्याही प्रेमकथेमध्ये प्रेम जिंकणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या जोडीला वेगळे करण्यात आले तर प्रेक्षकांचा नक्कीच हिरमोड होईल. त्यामुळे दिग्दर्शकाने याप्रमाणेच मालिकेमध्ये वेगळे वळण आणण्याचा विचार करावा असे प्रेक्षकांकडूनही सांगण्यात येते आहे. मालिकेमध्ये मनोरंजक वळण आणताना प्रेक्षकांच्या आवडीला धक्का बसू नये इतकीच माफक अपेक्षा करण्यात येत आहे. अजिंक्य आणि हृताची जोडी अर्थात इंद्रा आणि दीपू हे घराघरातील एक झाले असून या मालिकेतील इंद्रा या भूमिकेला थोडा दाक्षिणत्य हिरोचा टच असल्यामुळे हा अधिक आवडीचा झाला आहे. आता यापुढे नक्की वेगळे काय वळण येणार आणि देशपांडे सरांच्या तत्वाला मुरड घालून इंद्रा – दीपूचे प्रेम सफल होणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

अधिक वाचा – ओटीटीवर येणार ‘पुष्पा’ भेटीला, हिंदीत पाहायला मिळणार चित्रपट

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text