ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Manoj Bajpayi in Pushpa 2

पुष्पा पार्ट टू मध्ये मनोज वाजपेयीची एंट्री, आठ वर्षांनी करणार दाक्षिणात्य चित्रपटात काम 

पुष्पा पार्ट 2′ ची तयारी सध्या वेगाने सुरु आहे. कदाचित पुष्पाचा तिसरा भाग देखील येण्याची शक्यता आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिणेतील चंदन तस्कर पुष्पराजची कथा आता उत्तर भारताशी जोडण्यासाठी एक कल्पना तयार करण्यात आली असून या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध स्टार मनोज वाजपेयी यांना घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. असे झाल्यास, मनोज वाजपेयी यांचे पात्र ‘पुष्पा पार्ट 2’ या चित्रपटातच दाखल होईल आणि हेच पात्र या चित्रपटाला तिसऱ्या पर्वात घेऊन जाईल.

पोलीस अधिकाऱ्याशी पुष्पाचे वैर 

दक्षिण भारतातील लाल चंदन तस्करांमध्ये हळूहळू आपला प्रभाव वाढवणाऱ्या आणि या संपूर्ण व्यवसायावर आपले साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या पुष्पराज या काल्पनिक पात्राची कथा सांगणाऱ्या ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटाची कथा ज्या ठिकाणी पुष्पराज एका दबंग पोलीस अधिकाऱ्याशी वैर घेतो तिथे थांबते.  मल्याळम चित्रपटांचे कलाकार फहाद फासिलने चित्रपटाच्या पहिल्या भागात पोलीस अधिकाऱ्याची ही दमदार व्यक्तिरेखा साकारली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग पहिल्यापेक्षा मोठा आणि अधिक प्रभावी करण्यासाठी या चित्रपटात आणखी एक खलनायक आणण्याची चर्चा रंगली आहे. या व्यक्तिरेखेसाठी चित्रपट निर्मात्यांनी तामिळ चित्रपटसृष्टीतील मोठा स्टार विजय सेतुपती यांची निवड केली आहे. 

‘पुष्पा पार्ट 3’ मध्ये मनोज वाजपेयींची महत्वाची भूमिका 

‘पुष्पा पार्ट 3’ या चित्रपटामध्येही फहद फासिल यांची भूमिका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच मैत्री मुव्हीजने मनोज वाजपेयी यांच्याशीही चर्चा सुरू केल्याची बातमी सध्या कानांवर आली आहे. मैत्री मुव्हीजने अलीकडेच आणखी एका चित्रपटाची योजना आखली आहे ज्यासाठी ‘विक्रम’ चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनागराज यांना साइन केले आहे. या चित्रपटात सलमान खानला हिरो म्हणून घेणार असल्याची चर्चा आहे. लोकेशच्या या चित्रपटापूर्वीच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या बॅनरचे नाव मजबूत करण्याचा मैत्री मुव्हीजचा मानस आहे.मैत्री मुव्हीजची चित्रपट मालिका ‘पुष्पा’ ही त्यांच्या निर्मात्यांना मुंबईतही त्यांचे बॅनर उभारण्यासाठी योग्य दुवा वाटते आहे आणि म्हणूनच या चित्रपटातूनच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना दक्षिणेतील चित्रपटांशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘द फॅमिली मॅन’ द्वारे पुन्हा एकदा मुख्य प्रवाहातील मनोरंजन विश्वात पुनरागमन करणारे मनोज वाजपेयी ‘पुष्पा पार्ट 2’ आणि ‘पुष्पा पार्ट 3’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची शक्यता आहे.

मनोज वाजपेयी यांच्या जवळच्या सूत्रांनी खुलासा केला आहे की दक्षिण भारतीय प्रेक्षक त्यांना चांगले ओळखतात आणि ‘पुष्पा पार्ट 2’ चित्रपटाद्वारे दक्षिणेकडील प्रेक्षकांना पुन्हा त्यांचे काम बघता येईल. मनोज वाजपेयी यांनी 1999 साली दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या प्रेम कथा या तेलगू चित्रपटातून दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आणखी तीन तेलुगू आणि दोन तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेला ‘अंजान’ हा दक्षिण भारतातील त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

ADVERTISEMENT

पुष्पाचा दुसरा भाग कधी येणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनचा हा चित्रपट आता या ऑगस्टपर्यंत फ्लोरवर जाईल. या 6 महिन्यांपेक्षा जास्त असलेल्या वेळापत्रकात अनेक ऍक्शन सीक्वेन्स शूट केले जातील. असे म्हटले जात आहे की हे ऍक्शन सीन्स भारतीय सिनेमातील आतापर्यंतच्या सर्वात महागड्या सीन्सपैकी एक असतील. त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनचे काम केले जाईल. म्हणजेच हा चित्रपट आता 2023 च्या मध्यात रिलीज होण्याची शक्यता आहे.

प्रेक्षक पुष्पाच्या दुसऱ्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

21 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT