हे संपूर्ण वर्ष सर्वांसाठीच अत्यंत खराब गेले असल्याचे दिसून आले आहे. अगदी सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येकालाच कोरोनाचा फटका पडल्याचे दिसून आले आहे. अनेकांची कामे या काळात गेली आहेत. असाच फटका बसला आहे तो एका प्रसिद्ध मराठी सेलिब्रिटीला. सध्या या कलाकाराकडे कोणतेही काम नसून आपल्याला काम मिळावे यासाठी त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ही पोस्ट वेगाने व्हायरल होत असून लवकरच या अभिनेत्याला काम मिळेल अशी अपेक्षा त्याचे चाहते करत आहेत. तसंच त्याच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी लवकरच त्याला काम मिळेल असा विश्वास दर्शवला आहे. हा अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आपल्या सडेतोड स्वभावासाठी आस्ताद प्रसिद्ध आहे. मात्र आस्तादचे रांगडे व्यक्तिमत्व आवडणारे अनेक चाहते आहेत.
आदित्य नारायण आणि श्वेता अगरवाल लग्नबंधनात, फोटो व्हायरल
सोशल मीडियावरून केले आवाहन
आस्ताद काळेने आपल्या सोशल मीडियावरून काम मिळण्याचे आवाहन केले आहे. आस्ताद नुकताच एका गाण्याच्या रियालिटी शो मध्ये दिसला होता. या शो च्या अंतिम भागापर्यंत आस्ताद पोहचला होता. आस्ताद चांगला गातो आणि त्याचा अभिनयही उत्तम आहे. मात्र सध्या अनेक ठिकाणी कोरोनामुळे काम नाही. तसेच काम आस्तादकडेही नाही आणि याविषयी त्याने आवाहन करत काम असल्यास आपल्याला द्यावे असे सांगितले आहे. आस्तादने याविषयी आपल्या भावना लिहिताना अगदी मोजक्या शब्दात आणि त्याच्या शैलीत लिहिले आहे, ‘नमस्कार. मी सध्या काम (अभिनय/सूत्रसंचालन) शोधतो आहे. माझ्या योग्य भूमिका असल्यास कृपया विचार करावा’ असे आवाहन करत आस्तादने काम मागितले आहे. आस्तादला बिग बॉस मराठीच्या पहिल्या हंगामात प्रेक्षकांनी पाहिले आहे. त्यामुळे आस्ताद जे मनात आहे तेच तोंडावर बोलतो हे सर्वांनाच माहीत आहे. या पोस्टनंतर आस्तादला काम मिळो अशी इच्छा अनेकांनी कमेंट्समध्ये केली आहे. तसंच असं सर्वांसमोर काम मागायलाही हिंमत लागते असं म्हणत अनेकांनी त्याला दाद देत खरा कलाकार असेही म्हटले आहे.
Bigg Boss 14 मधून राहुल वैद्य जाण्याची चर्चा, फॅन्सनी व्यक्त केली नाराजी
मराठी मालिकांमधील नावाजलेला चेहरा
आस्ताद काळे हा मराठी मालिकांमधील नावाजलेला चेहरा आहे. पुढचं पाऊल या मराठी मालिकेतून आस्ताद घराघरामध्ये पोहचला. मात्र त्यानंतर त्याच्या वाट्याला जास्त काम आले नाही. सध्या आस्ताद गुजरातमधील गीर अरण्यात फिरत आहे. मात्र दुसरीकडे त्याचा कामाचा शोधही सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सर्व निर्मात्यांना आस्तादने सोशल मीडियावरून विनंतीच केली असल्याचे समजून येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता असे अनेक कलाकार असतील ज्यांना काम नसेल. पण हिंमत दाखवून अशा रितीन काम मागणारा आस्ताद हा पहिलाच मराठी कलाकार ठरला आहे. त्यामुळे आता आास्तादच्या या आवाहना आणि विनंतीला मान मिळून कोणता निर्माता त्याला काम देतो हेदेखील पाहावे लागेल. आस्तादने अनेक मालिकांमधून काम करून आपल्या अभिनयाची प्रतिभा आधीच सिद्ध केली आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा एकदा तो मालिकांमधून झळकेल अशी नक्कीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आणि आशीर्वाद असणार.
प्रियांका आणि निकच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण, शेअर केल्या सुंदर आठवणी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक