लग्न आणि घरात नव्या पाहुण्याचे आगमन असा हा नवा हंगामच आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातही मराठी आणि बॉलीवूड सेलिब्रिटींकडून आता जवळजवळ रोजच अशा आनंदाच्या गोष्टी कळत आहेत. अशीच आता आनंदाची बाब शेअर केली आहे एका मराठी अभिनेत्याने. अक्षय वाघमारे लवकरच बाबा होणार असून त्याची पत्नी योगिता गवळी वाघमारे ही गरोदर आहे. त्याने योगिता आणि आपला फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. अगदी गरोदरपणाचे फोटोशूट केले असल्याचे दिसून येत आहे. अक्षय आणि योगिता या फोटोमध्ये खूपच आनंदी दिसून येत आहे. तर योगिताने या फोटोमध्ये वेस्टर्न गाऊन घातला असून अक्षय काळ्या शर्ट आणि पँटमध्ये आहे. मात्र दोघांचाही हा फोटो अत्यंत रोमँटिक आणि तितकाच प्रफुल्लित दिसून येत आहे.
आता अभिज्ञा भावेच्या हटके मंगळसूत्राची चर्चा, खास आहे डिझाईन
अक्षयने केले होते मे महिन्यात लग्न
अक्षय वाघमारे हे नाव घराघरात माहीत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अक्षयने अरूण गवळी यांची मुलगी योगिता गवळीशी मे महिन्यात लग्नगाठ बांधली. लॉकडाऊनमध्येच या दोघांनी एकत्र राहण्याचे निश्चित करून अगदी लहानशा कार्यक्रमात लग्नगाठ बांधली होती. मुंबईकरांना अरूण गवळी हे नाव नक्कीच नवे नाही. तर अक्षय आणि योगिता हे लग्नाआधी पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून दोघांंचा प्रेमविवाह आहे. लॉकडाऊन काळात सर्व नियमांचं पालन करून दोघांनी लग्न केले. आता लवकरच हे दोघेही आई वडील होणार आहेत. हाच आनंद अक्षयने आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. फोटो शेअर केल्यानंतर विविध स्तरातून दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अक्षय नेहमीच योगितासह आपले फोटो शेअर करत आपलं प्रेमही व्यक्त करत असतो. अक्षयच्या लग्नाच्या वेळी सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांनी साखरपुडा केला तर मार्चमध्ये लग्न होणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे हे लग्न मे मध्ये करण्यात आले. अक्षय पुण्याचा असून अक्षयने लग्नासाठी पोलिसांची परवानगी काढली होती. तर दगडी चाळीमध्ये हा लग्नसमारंभ अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला होता. आता लवकरच अक्षय आणि योगिता आई वडील होणार असल्याने दगडी चाळीतही आनंदाचे वातावरण पसरले असणार यात शंका नाही.
आलिया भटच्या हातावर रंगली मेंदी, रणबीरसोबत गुपचूप करणार का लग्न
अक्षयचे आहे दादा कोंडके यांच्याशी नाते
अक्षयचे अभिनेता दादा कोंडके यांच्याशी नाते आहे. दादा कोंडके यांची बहीण अक्षयची आजी आहे. होऊ दे जरा उशीर आणि अशा काही चित्रपटांमधून अक्षयने काम केले असून अनेक जाहिरातींसाठी त्याने मॉडेलिंगही केले आहे. इतकंच नाही तर अक्षय फिटनेस फ्रिक असून नेहमीच सोशल मीडियावर आपले फिटनेसचे व्हिडिओ शेअर करत असतो. अक्षयचा चाहता वर्गही मोठा आहे. दरम्यान सध्या अक्षय कोणत्याही मालिका अथवा चित्रपट करत नसला तरीही सोशल मीडियावर मात्र कायम अॅक्टिव्ह असतो. त्यामुळे त्याचे चाहते तो कधी लवकरच मालिका अथवा चित्रपटात दिसणार याची वाट पाहत आहेत. पण अचानक मिळालेल्या या सुखद धक्क्यानेही नक्कीच चाहते खुष असणार. आता अक्षयच्या घरी नक्की कधी लहान पाहुणा येणार आहे याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
डॉक्टरनंतर राखी सावंतला व्हायचे आहे गायक
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक