सेलिब्रिटी फावल्या वेळात काय करतात हे जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते.
ऑनस्क्रिनपेक्षा जेव्हा त्या निघून जातात तेव्हा आपसुकच हा प्रश्न पडतो तो म्हणजे ‘ती वा तो सध्या काय करते?’ असा प्रश्न मनाशी येणं अगदी स्वाभाविक आहे. काही सेलिब्रिटी अशी काही काम करतात ज्यांच्यामुळे त्यांची एक नवीन ओळख निर्माण होण्यास मदत मिळते. लिंबू कलरची साडी म्हटली की, डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या म्हणजे अश्विनी भावे. लग्नानंतर आणि इंडस्ट्रीपासून दूर परदेशात गेल्यानंतर त्यांनी नवा छंद जोपासला आहे तो म्हणजे गार्डनिंगचा चला जाणून घेऊया या विषयी
सई- आदित्यचे दिवस बदलले, चाळीत राहून करणार उत्कर्ष
नवनवे प्रयोग
निसर्ग कोणाला आवडत नाही असे होणार नाही. पण काही जणांना त्याची अगदी नशाच जडते. अश्विनी भावे यांची गार्डनिंगची आवड ही आता पॅशन बनून गेली आहे. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अश्विनी भावे यांनी त्यांच्या अंगणात अनेक भाज्या, फळं यांची लागवड केली आहे. त्या कायम त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी लावलेल्या झाडांची ओळख करुन देत असतात. त्यांनी त्यांच्या मळ्यात अनेक भाज्या आणि फळांची लागवड कशी केली आहे हे देखील व्हिडिओमधून दाखवले आहे. त्यांनी पोस्ट केलेले हे व्हिडिओ अनेकांसाठी प्रेरणा आहेत. हे नवनवे प्रयोग पाहायला अनेकांना आवडतात.
अजय देवगण आणि काजोलने जुहूमध्ये खरेदी केला करोंडोंचा आलिशान बंगला
कुकींगचीही आवड
गार्डनिंगच नाही तर अश्विनी भावेंना कुकींगचीही आवड आहे. त्यांनी त्यांच्या किचनमधील अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये त्यांनी लादीपाव, पुरणपोळी असे काही व्हिडिओ पोस्ट केले होते. काही प्रयोग करताना फसतात. पण तरी देखील त्यांनी त्यांचे फसलेले व्हिडिओही पोस्ट केले आहेत. त्यातील फसलेल्या पावाचा व्हिडिओ हा तर खूप जणांना आवडलेला आहे. बेकरीतल्या पावासारखे सुख असे काही नाही. जर तो घरी करायचा विचार केला असेल तर अगदी तसाच व्हायला हवा तर अश्विनी भावेंचा हा व्हिडिओ पाहून तुम्हााला नक्कीच थोडासा आनंद होईल.
लिंबू कलरची साडी…. आणि अश्विनी भावे
अश्विनी भावे म्हटले की, सगळ्यांना आठवतो तो चित्रपट म्हणजे ‘बनवाबनवी’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनी पाहिला नसेल असे मुळीच नाही. कारण आतापर्यंत अनेकांना हा डायलॉग पाठ देखील झाला असेल. हिंदी- मराठी अशा दोन्ही भाषांच्या चित्रपटामध्ये अश्विनी भावे यांनी काम केले आहे. त्यांनी त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यांच्या अनेक व्हिडिओला लाईक्स मिळतात. तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल तर हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.
सकारात्मक विचार हाच एकमेव मार्ग – अभिनेता डॉक्टर आशिष गोखले
आवड जोपासा
अश्विनी भावेंचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच काहीतरी नवे करायला हवे. कारण घरात बसून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आताच तुम्ही काहीतरी नवे करायला घ्या. त्यामुळे तुम्हालाही काहीतरी नवे केल्यासारखे नक्की वाटेल आणि सध्याच्याा या परिस्थितीचा नक्कीच कंटाळाही येणार नाही.
अश्विनी भावेंचा आवडलेला व्हिडिओ कोणता आहे? आम्हालाही नक्की सांगा.