सुंदर चेहरा, उत्तम अभिनय असे कॉम्बिनेशन असलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे कोणाला माहीत नाही असे होणार नाही. सध्या ती ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे. नुकताच तिचा साखरपुडा देखील झाला. मराठी मालिका विश्वातील हा इतका प्रसिद्ध चेहरा आहे की, तिचे कोट्यवधी चाहते आहेत. अनेकांच्या फोनच्या स्क्रिनसेव्हरपासून ते त्यांच्या मोबाईलपर्यंत अनेकांकडे ऋताचे फोटोज दिसतात. तिचा प्रियकर असल्याचे कळाल्यानंतर अनेकांचा हार्ट ब्रेक झाला असणार यात काही शंका नाही. पण आता याच नात्यावरुन तिचा ट्रोल केले जात आहे. तू प्रेमात पडतानाही आपला फायदा पाहिलास का? असा सवाल अनेकांनी तिला केला आहे. जाणून घेऊया नक्की ऋता ट्रोल का होतेय ते
फायद्यासाठी ऋताने जोडले नाते
ऋताचा काहीच महिन्यांपूर्वी प्रतिक शाहसोबत साखरपुडा झाला. प्रतिक शाह हा हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध असा चेहरा आहे. त्याने अनेक मालिकांसाठी काम केले आहे. त्याची आई मुग्धा शाह ही सुद्धा एक नामांकित अभिनेत्री आहे. हे सगळे पाहून ऋताने हे नाते जोडले अशा कमेंटस ऋताच्या फोटोवर येत आहे. एका सोशल मीडियाने या संदर्भातील माहिती दिली आहे. ऋताला तिने मराठी मुलाशी नाते जोडले का नाही? असा सवालदेखील केला आहे. इतकेच नाही तर तिने हिंदी मालिकेमध्ये काम करण्यासाठी हे सगळे केले आहे अशा कमेंटदेखील अनेकांनी तिला केल्या असल्याचे तिने सांगितले नाही. ऋताला हे कळल्यानंतर ती चिडली आणि तिने प्रेम हे कोणती भाषा, जात, धर्म बघून होत नाही असे सांगितले. त्यामुळे ऋताला ट्रोल करणाऱ्यांची तिने बोलती बंद केली आहे.
ऋताचे दोन मिलियन झाले पूर्ण
ऋता सोशल मीडियावरील सगळ्यात हॉट असा चेहरा आहे. तिचे सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चाहते आहेत. तिच्या फोटोला लाखोंच्या घरात कमेंटस येत असतात. तिने नुकताच फॉलोअर्सचा टप्पा पार केला. त्यावेळी तिला अनेकांनी शुभेच्छाही दिल्या. पण अशाप्रकारे ट्रोल झाल्यामुळे तिचा पारा चांगलाच चढला. त्यामुळेच तिने उत्तर देऊन लोकांचे समाधान केले असावे. एकीकडे ऋता ट्रोल होत असली तरी देखील तिच्या या नव्या आनंदात तिचे खरे चाहते खूपच आनंदी आहेत यात काही शंका नाही.
मन उडू उडू हिट
फुलपाखरु या मालिकेतून ऋताला चांगलीच ओळख मिळाली होती. या मालिकेमुळेच एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला होता आणि आता तिची नवी मालिका सध्या सुरु आहे. या मालिकेच्या टायटल ट्रॅकपासून सगळ्या गोष्टीच चांगल्या हिट झाल्या आहेत. या मालिकेत ती दिपूची भूमिका साकारत आहे. अत्यंत मध्यम वर्गीय घरातील दिपू ज्यावेळी इंद्राच्या प्रेमात पडेल त्यावेळी काय होईल? किंवा ही लव्हस्टोरी कशी जुळून येईल हेच दाखवणारी ही मालिका आहे. या मालिकेत तिच्यासोबत अजिंक्य राऊत हा प्रमुख भूमिकेत आहे. त्यालाही मालिकेत भरपूर असे प्रेम मिळत आहे.