ADVERTISEMENT
home / मनोरंजन
दगडूची प्राजू झाली बोल्ड, केतकी माटेगावकरचा बोल्ड लुक व्हायरल

दगडूची प्राजू झाली बोल्ड, केतकी माटेगावकरचा बोल्ड लुक व्हायरल

प्राजू नाव घेतलं की एकच चेहरा डोळ्यासमोर येतो आणि तो म्हणजे अभिनेत्री केतकी माटेगावरकरचा. दगडू आणि प्राजूची ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर कायमची कोरली गेली. त्याचप्रमाणे केतकीचीदेखील एक सालस, गर्ल नेक्स्ट टू डोअर अशी छवी तिच्या चाहत्यांसमोर तयार झाली आहे. कधी आपल्या अभिनयाने तर कधी आपल्या गोड आवाजाने केतकीने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. अगदी बाहुलीप्रमाणे नाजूक दिसणाऱ्या या अभिनेत्रीचे आता काही फोटो व्हायरल होत असून यामध्ये केतकीचा बोल्ड लुक चाहत्यांना भावतो आहे. केतकीला तसं तर लहानपणापासूनच अनेक टीव्ही रियालिटी शो मध्येही पाहिलं गेलं आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून केतकीने गाणं सुरू केलं आणि रियालिटी शो देखील केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती अभिनेत्री म्हणून.

नवरा गुलदस्त्यात तरीही राखी सावंत बनणार आई, केला खुलासा

ऑल राऊंडर केतकी

गाणं आणि अभिनयासह केतकीच्या सौंंदर्याचेही अनेक चाहते आहेत.  केतकी नेहमीच आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. सध्या केतकीने काही फोटो शेअर केले आहेत. जे नेहमीपेक्षा बोल्ड असून केतकीचा हा लुकदेखील चाहत्यांना आवडत आहे. बोल्ड आणि ब्युटीफूल असंच काहीसं वर्णन या फोटोचं करावं लागेल. केतकीला नेहमी चित्रपटात सालस आणि लोभस अशा रूपात बघत आल्यानंतर तिचा हा लुक काही जणांसाठी नक्कीच धक्कादायक असला तरीही तिने एक मर्यादा पाळतच हे बोल्ड शूट केलं असल्याचं दिसून येत आहे. कपडे जरी आधुनिक असले तरीही केतकीचे सौंदर्य यामध्ये अप्रतिमरित्या फोटोग्राफर अक्षय परांजपे आणि आशिषने कॅप्चर केले आहेत. केतकीचा हा ग्लॅमरस लुक सर्वांनाच तिच्या फोटोवर कमेंट्स आणि लाईक देण्यास भाग पाडत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक सेलिब्रिटींनीही तिच्या या फोटोंवर कमेंट्स करत केतकीच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. 

मानसी नाईकच्या लग्नानंतर सुरू झाली आता सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाची लगबग

ADVERTISEMENT

केतकीचं खास फोटोशूट

केतकीला शाळा, काकस्पर्श आणि टाईमपास अशा चित्रपटातून पाहताना तिच्या अशा फोटोची कल्पनाही कोणाला करता येत नाही. मात्र आपल्या मनमोहक हास्याने केतकीने सर्वांचंच मन जिंकून घेतलं आहे. केतकीने आपल्या खास फोटोशूटने सध्या सोशल मीडियावर धूम केली आहे असं म्हणायला हवं.  तसंच तिच्या या फोटोजना देण्यात आलेले कॅप्शनही लक्षवेधक आहे. जेव्हा शब्दांची कमतरता जाणवते तेव्हा डोळ्यांची मदत घेणे योग्य ठरते अशा कॅप्शन्सने केतकीने चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे. तर नेहमीपेक्षा वेगळ्या लुकमध्ये असणाऱ्या केतकीला पहिल्यांदा या फोटोमध्ये पाहिल्यानंतर ती केतकी आहे यावर विश्वासही बसत नाही. केतकीचा नेहमीचा साधा लुक आणि यातील कुरळ्या केसांचा लुक यामध्ये खूपच फरक आहे. विनोद सरोदेने केलेला मेकअप केतकीवर अधिक खुलून आला आहे असं म्हणायला हवं. कोणत्याही प्रकारचा भडक मेकअप न करता अगदी सौम्य पण परिणामकारक मेकअप केतकीच्या चेहऱ्यावर या फोटोशूटसाठी करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे फोटो पाहून एखाद्या चित्रपटात केतकी बोल्ड भूमिकेत दिसली तर नक्कीच तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटायला नको. दरम्यान केतकीला लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता यावं अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. केतकीने मात्र सध्या आपण कोणते प्रोजेक्ट करत आहोत याबाबत काहीही सोशल मीडियावर सांगितलेले नाही.  

दिवंगत अभिनेता सुशांतला फॅन्सनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

21 Jan 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT