ADVERTISEMENT
home / मनोरंजन
प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले करणार 'मेरे साई' मध्ये भूमिका

प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले करणार ‘मेरे साई’ मध्ये भूमिका

मेरे साई- श्रद्धा और सबुरी (Mere Sai) मालिकेत तुषार दळवी (Tushar Dalvi) हा प्रसिद्ध कलाकार साईंची मध्यवर्ती भूमिका करत आहे आणि आता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मालिकेतील पुढील कथानकासाठी भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmuley) या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. भार्गवी लवकरच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भार्गवीने अनेक मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून काम केले आहे. आजच्या पिढीच्या कलाकारांमध्ये ती नेहमीच उठून दिसते. आता ‘मेरे साई’ मालिकेतून भार्गवीचा अभिनय दिसणार आहे.

वैभव तत्त्ववादी सोनीलिव्हच्या ‘प्रोजेक्ट 9191’ मध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

चंद्रा बोरकर नावाची व्यक्तिरेखा साकारणार

या मालिकेच्या आगामी कथानकात भार्गवी चिरमुले एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती चंद्रा बोरकर नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे, जी साईंची बहीण आहे आणि दोन मुलं असलेले तिचे सुखी कुटुंब आहे. परंतु, एके दिवशी तिचा नवरा ज्ञानप्राप्तीसाठी आपल्या कुटुंबाला सोडून निघून जातो, कारण कुटुंबाप्रती असलेल्या आपल्या जबाबदार्‍या म्हणजे त्याला आपल्या मार्गातला अडथळा वाटतो. स्वाभाविकपणे चंद्रावर आकाशच कोसळते. साई आपल्या बहिणीच्या पाठीशी उभे राहतात आणि चंद्राच्या पतीला ही जाणीव करून देतात की, आपल्या जबाबदार्‍या पूर्ण केल्यावरच ज्ञानप्राप्ती होते. ही भूमिका साकारताना भार्गवी खूपच उत्साहात आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना भार्गवी म्हणाली, “मेरे साई मालिकेतल्या या महत्त्वाच्या कथानकात सहभागी होता आल्याचा आणि साईंच्या बहिणीची भूमिका साकारण्याचा मला आनंद आहे. मला वाटते की, मेरे साई ही भारतीय टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त प्रसार असलेली मालिका आहे, आणि ती सकारात्मकता पसरवते. त्यात जे मुद्दे कथानकाच्या माध्यमातून हाताळण्यात येतात, ते आजच्या काळाशी देखील इतके संबद्ध आहेत की, प्रेक्षकांना प्रत्येक कथेतून काही ना काही बोध मिळतो. साई बाबांनी स्त्री-पुरुष असा भेद कधीच केला नाही, आणि ते नेहमी खर्‍याच्या बाजूने उभे राहिले. या कथानकात देखील हेच पुन्हा दिसून येईल. तामध्ये ते चंद्राच्या पतीला ही जाणीव करून देतील की, महिला पुरुषांपेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नसतात.”

ADVERTISEMENT

टेनिस खेळाडू सानिया मिर्झाच्या बायोपिकमध्ये सानिया साकारणार तापसी पन्नू

भार्गवी दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

पुढे भार्गवी असंही म्हणाली की, “या भूमिकेच्या माध्यमातून साईंनी माझ्यावर त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव केला आहे.” आपल्या पतीने आणि कुटुंबाने सोडून दिलेल्या स्त्रीला आपल्या समाजात किती त्रास सोसावा लागतो याचे चित्रण या भागात दिसेल. भार्गवीने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमधून आपला असा एक प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. आता हिंदी मालिकेमध्ये भार्गवी आपला वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण करेल यात शंका नाही. भार्गवीचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे आता या मालिकेमध्ये नक्की वेगळा कोणता ट्विस्ट येणार आणि भार्गवी ही भूमिका कशी साकारणार हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचे आहे. यासाठी तुम्ही सोमवार ते शुक्रवार 7 वाजता संध्याकाळी मेरे साई – श्रद्धा और सबुरी ही मालिका सोनी एन्टरटेनमेंटवर पाहता येईल. तर भार्गवीच्या चाहत्यांसाठी ही आता पर्वणीच आहे. भार्गवीला रोज या मालिकेतून चाहत्यांना पाहता येणार आहे. लवकरच या मालिकेतून भार्गवी चिरमुलेला पाहता येईल.

रश्मी अनपट साकारणार आर्या, वीणा जगतापने या कारणाने सोडली मालिका

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
31 Mar 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT