मराठी मालिका आणि चित्रपटात अनेक कलाकार काम करत असतात. त्यातील काही कलाकार हे आपल्या घरातीलतच एक होऊन जातात. त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्यात आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खासगी गोष्टी जाणण्यात त्यांच्या चाहत्यांची खूपच इच्छा असते. विशेषतः लग्न. 2021 मध्ये अशाच काही मराठमोळ्या जोड्यांनी लग्नबंधनात अडकावं असं त्यांच्या चाहत्यांना मनापासून वाटत आहे. अशाच काही जोड्यांची माहिती. तुम्हालाही जर अजून कोणत्या जोड्यांनी लग्न करावं वाटत असेल तर नक्की हा लेख वाचल्यानंतर आम्हाला कमेंट स्वरूपात कळवा.
मिताली – सिद्धार्थ
मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी साखरपुडा करून त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला होता. मात्र साखरपुडा झाल्यानंतर त्यांनी लगेच लग्न केलं नाही. सध्या दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. मिताली आणि सिद्धार्थ या दोघांचीही मालिका वेगवेगळ्या वाहिन्यांवर चालू असून दोघांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. मात्र 2021 मध्ये या जोडीने लग्न करून संसार थाटावा अशी नक्कीच त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. मितालीने नुकताच आपला 25 वा वाढदिवस साजरा केला. सिद्धार्थ नेहमीच मितालीसाठी वेगवेगळे सरप्राईजही प्लॅन करत असतो. त्यामुळे या जोडीने आता लग्न करून आपला संसार चालू करावा आणि चाहत्यांना खूषखबर द्यावी असंच सर्वांना वाटत आहे. पण या दोघांनी आतापर्यंत आपल्या लग्नाबद्दल कोणतीही वाच्यता केलेली नाही.
शिव – वीणा
मराठी ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या हंगामात एकमेकांच्या प्रेमात पडलेली आणि प्रेक्षकांचंही प्रेम मिळालेली जोडी म्हणजे शिव ठाकरे आणि वीणा जगताप. शिव आणि वीणामधील प्रेम आणि प्रेमातील नोकझोक प्रेक्षकांना खूपच आवडली होती. बऱ्याच जणांना हा आधी पब्लिसिटी स्टंटही वाटत होता. मात्र शिव आणि वीणा दोघेही प्रेमात गंभीर असून दोघांनीही आतापर्यंत आपले नाते टिकवून ठेवले आहे. बऱ्याचदा एकत्र फिरताना आणि सुट्टी एन्जॉय करताना हे दोघेही दिसतात. त्याशिवाय सोशल मीडियावरही एकमेकांना नेहमी हे दोघे कमेंट्स देत असतात. वीणा सध्या मालिकेत मुख्य भूमिका करत असून शिव आपला डान्स क्लास चालवत आहे. या दोघांनीही नव्या वर्षात लग्न करावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.
कोरिओग्राफर गणेश आचार्यच्या वेटलॉसवर कपिल शर्माने केली ही कमेंट
इशा केसकर – ऋषी सक्सेना
इशा केसकरने मराठी मालिकांमधून काम करून प्रेक्षकांच्या मनात जागा केली. तर ऋषि सक्सेनाही मराठी मालिकेतील एक प्रसिद्ध कलाकार असून त्याचे फिचर अनेक मुलींना आवडतात. ऋषिचा महिला चाहता वर्ग खूपच मोठा आहे. एका रिलालिटी शो च्या निमित्ताने या दोघांची ओळख झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. गेले तीन वर्ष दोघेही एकमेकांबरोबर राहत असून एकमेकांना नेहमीच सोशल मीडियवर कमेंट्स देत असतात. तसंच आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कधीही मागेपुढे पाहत नाहीत. ही जोडी अनेकांना आवडते. त्यामुळे नव्या वर्षात या दोघांनीही लग्नाचा विचार करावा असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे हे नक्की.
Good News: गायिका नेहा कक्कर होणार आई, फोटो व्हायरल
सोनाली कुलकर्णी – कुणाल बेनोडेकर
मराठीतील ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीनेही यावर्षी कुणाल बेनोडेकरसह साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता सोनालीने या नव्या वर्षात लग्न करून चाहत्यांना आनंदाचा धक्का द्यावा असं सर्वांना वाटत आहे. सोनालीचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. तर कुणाल हा या इंडस्ट्रीतील नसला तरीही सोनाली नेहमी त्याच्यासह आपले फोटो शेअर करत असते. कुणाल हा सोनालीसह अनेक फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसून येतो. कुणाल दुबईमध्ये स्थायिक असून लवकरच ही जोडी लग्न करेल अशी आशा चाहत्यांना आहे. फक्त आता या नववर्षाच्या सुरूवातील ही आनंदाची बातमी येते का याचीच उत्सुकता आहे.
नताशाने होकारापूर्वी 4 वेळा दिला होता नकार, वरूण धवनचा खुलासा
अदिश वैद्य – रेवती लेले
रात्रीस खेळ चाले मालिकेतून प्रसिद्ध झालेला आणि हिंदी मालिकेतीलही प्रसिद्ध चेहरा असणारा अदिश वैद्य याचादेखील महिला चाहता वर्ग खूप मोठा आहे. तर स्वामिनी मालिकेतील रेवती लेले या दोघांचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. अदिश आणि रेवती हे एकमेकांबरोबर खूपच छान दिसतात. या दोघांनीही नव्या वर्षात लग्नगाठ बांधावी असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. रेवतीचे नुकतेच करिअर सुरू झाले असून अदिश मात्र आता इंडस्ट्रीमध्ये स्थिरावला आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक