Advertisement

मनोरंजन

‘Dance Deewane 3′ मध्ये मराठी पाऊल पडते पुढे

Dipali NaphadeDipali Naphade  |  Mar 21, 2021
‘Dance Deewane 3' मध्ये मराठी पाऊल पडते पुढे

टीव्हीवर अनेक रियालिटी शो येत असतात. त्यापैकी नृत्याचे शो अधिक प्रसिद्ध असतात. सध्या नुकताच सुरू करण्यात आलेला डान्स दिवाने (Dance Deewane 3) चे तिसरे पर्व गाजवत आहेत ते मराठी स्पर्धक. केवळ स्पर्धकच नाहीत, तर यावर्षी शो मध्ये दोन परीक्षकही मराठी आहेत. पहिल्या दोन हंगामात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ने या शो चे परीक्षण केले होते. यावर्षी डान्सचा डी अर्थात धर्मेश येलांडेनेदेखील शो चा टीआरपी वाढविण्यास मदत केली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मराठमोळ्या धर्मेशचे असंख्य चाहते आहेत आणि याचा या शो ला नक्कीच फायदा होत आहे. इतकंच नाही तर यावर्षी अनेक मराठमोळ्या स्पर्धकांनी परीक्षकांचे मन जिंकून पहिल्या 16 स्पर्धकांमध्ये आपली जागा मिळवली आहे. त्यामुळे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. 

पल्लवी टोळ्ये

अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा आपलं अस्तित्व परत मिळविण्यासाठी सज्ज झालेली नृत्यांगना पल्लवी टोळ्ये (Pallavi Tolye) हिने परीक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. नृत्यामध्येच करिअर करण्याची इच्छा असूनही काही ना काही कारणाने आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून गेलेल्या पल्लवीने पुन्हा एकदा आपल्या नृत्याला संधी देण्याचे ठरवत तिसऱ्या पिढीमध्ये आपला ठसा उमटवला आहे. अभिनेत्री शाल्मली टोळ्ये (Shalmali Tolye)ची मोठी बहीण असणारी पल्लवी आपल्या कथ्थक नृत्याने सर्वांनाच आपलेसे करून घेण्यात यशस्वी झाली आहे. 

सूचना शेट्टी चोरगे

सासू आणि सुनेचं नातं हे आई – मुलीसारखं असू शकतं हे सूचनाकडे बघून नक्कीच लक्षात येतं. वयाच्या 39 च्या वर्षी आपली आवड जपणारी सूचना (Suchna Chorge) परीक्षकांना खूपच भावली आहे. लावणीमध्ये धमाल उडवणारी सूचनाने आपल्या परफॉर्मन्सने पहिल्या 16 मध्ये आपली जागा तयार केली. चाळीशीमध्ये नृत्यामधील सूचनाचा उत्साह हा नक्कीच लाजवणारा आहे. तर केवळ नृत्यच नाही, त्याबरोबर चेहऱ्यावरील हावभावांनीही सूचनाने परीक्षकांचे मन जिंकून घेतले असल्याचे दिसून येत आहे. 

अजय आणि शिल्पा फाळके

कोल्हापूरचे मिथुन आणि श्रीदेवी म्हणून नावाजलेले अजय आणि शिल्पा फाळके (Ajay and Shilpa Phalke) हीदेखील मराठमोळी जोडी सध्या स्टेजवर धमाल करते आहे. लग्नाला 22 वर्ष झाली असून यांच्यामधील प्रेम आणि केमिस्ट्री परीक्षकांना भावली. दोघेही स्टेजवर तुफान डान्स करत असून तिसऱ्या पिढीमध्ये दोघांनी स्थान मिळवलं आहे. खरं तर डान्स दिवानेच्या तिसऱ्या हंगामात तिसऱ्या पिढीमध्ये मराठीचा झेंडा गाडला गेला आहे. 

बॉलीवूड अभिनेत्री ज्या सौंदर्य खुलवण्यासाठी करतात आयुर्वेदिक उपचार

पियुष गुरभेले

नागपूरचा डान्सचा तुफान असणारा मराठमोळा पियुष गुरभेले (Piyush Gurbhele) हा धर्मेश येलांडेचा नुसता चाहता नाही तर भक्तच म्हणावे लागेल. धर्मेशने सादर केलेल्या गाण्यावरच पियुष या शो मध्ये नृत्य करत आहे. पण त्याची कोरिओग्राफी मात्र अफलातून आहे. आपल्या वेगळेपणाने आणि साधेपणाने मराठमोळ्या पियुषने धर्मेशचेच नाही तर माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांचेही मन जिंकून घेतले आहे. ‘Killer Moves’ मुळे पियुषने आतापर्यंत आपल्या तिन्ही परफॉर्मन्सनंतर परीक्षकांची वाहवा मिळवली आहे. इतकंच नाही तर डान्सची देवता मानल्या जाणाऱ्या रेमो डिसुझाकडूनही पियुषला शाबासकी मिळाली आहे. 

गुडबॉय’ ऋषी सक्सेनाच्या वेबला भरभरून प्रतिसाद, रिना आणि खुशबूचं कौतुक

द पनवेलकर्स

पनवेलकर्स (Panvelkars) हा एकमेव असा ग्रुप आहे ज्यांनी टॉप 16 मध्ये जागा मिळवली आहे. खरं तर यांच्यासाठी 16 वी जागा निर्माण करण्यात आली आहे. पहिल्या 15 मध्ये जागा पूर्ण झालेली असताना यांचा परफॉर्मन्स इतका चांगला होता की, त्यांच्यासाठी एक जागा निर्माण करावी लागली. आपल्या परफॉर्मन्स, कॉमेडी टायमिंगमुळे पहिल्या सहामध्ये नक्कीच जागा मिळवू शकेल असा विश्वास परीक्षकांनीही यांच्यावर दर्शवला आहे. मराठमोळा असा हा ग्रुप सध्या या शो मध्ये धमाल करतो आहे. 

यावर्षी डान्स दिवाने 3 हा शो एखादा मराठी स्पर्धक जिंकणार का? याकडेच आता चाहते नक्की डोळे लावून बसले आहेत. कारण हे सर्वच मराठी स्पर्धक इतर स्पर्धकांना नक्कीच तगडी टक्कर देणार यात शंका नाही.

अग्गंबाई सूनबाईमधील सोहम- शुभ्राचे बदलते रुप पाहून चक्रावले प्रेक्षक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक