ADVERTISEMENT
home / मनोरंजन
marathi-movie-bhirkit-teaser-released-in-marathi

हास्याचे फवारे उडवणाऱ्या ‘भिरकीट’चा टिझर प्रदर्शित

क्लासिक एंटरप्राईज प्रस्तुत, सुरेश जमतराज ओसवाल व भाग्यवंती सुरेश  ओसवाल निर्मित ‘भिरकीट’चे काही दिवसांपूर्वीच एक मजेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पोस्टरवरून चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यातच आता चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  अनुप जगदाळे दिग्दर्शित या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालीसा बागुल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांचा हास्यकल्लोळ पाहायला मिळणार आहे. पैसा कमावण्याचे, प्रसिद्धीचे, सुखी राहाण्याचे ‘भिरकीट’ (Bhirkit) सगळ्यांच्या मागे असताना ‘तात्या’ मात्र वेगळ्याच दुनियेत जगत आहे. त्याच्या या दुनियेत नेमके काय होते आणि त्यातून तो बाहेर येतो का, हे ‘भिरकीट’ पाहिल्यावरच कळेल. हा एक धमाल विनोदी आणि कौटुंबिक चित्रपट असल्याचे कळतेय. 

‘भिरकीट’ म्हणजे काय 

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात, ” या चित्रपटाची जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हाच अनेकांनी  ‘भिरकीट’ म्हणजे नक्की काय? असे विचारले होते. प्रेक्षकांच्या मनातही प्रश्न आहे नक्की काय विषय आहे हा? तर हळूहळू  ‘भिरकीट’ म्हणजे काय हे प्रेक्षकांना कळू लागेल. सध्या एकाच सांगू शकेन हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटात इतके दमदार कलाकार आहेत. सगळेच  विनोदाचे बादशाह आहेत. त्यामुळे तुफान धमाल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.” अनुप जगदाळे यांनी पुढे सांगितले की, ” मुळात ‘भिरकीट’ म्हणजे काय?  चित्रपटाचे नावच प्रशचिन्ह उपस्थित करणारे आहे. ‘भिरकीट’ हे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अदृश्यरिता मागे लागलेले असतेच.  मुळात ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. टिझरवरून कळले असेलच माणूस ‘माणूस’ म्हणून किती उरलेला आहे. त्याच्यात किती बदल झाला आहे. हे सर्व ‘भिरकीट’मध्ये पाहायला मिळणार आहे. हा एक मल्टीस्टारर सिनेमा आहेत. अर्थात ती कथेची गरज होती. मात्र यात सगळे कसलेले कलाकार आहेत. ‘देऊळ’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) यात तात्याच्या भूमिकेत आहेत. यापूर्वी आपण वळू, विहीर, गाभ्रीचा पाऊस, जाऊद्या ना बाळासाहेब, फास्टर फेणे अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिलेला आहे. बॅालिवूडच्या चित्रपटांमध्येही त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘भिरकीट’मध्ये आता ते पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.’’

एक जबरदस्त विनोदी चित्रपट

‘भिरकीट’ची पटकथा व संवाद प्रताप गंगावणे यांचे असून हा एक जबरदस्त विनोदी चित्रपट आहे.  शैल व प्रितेश या हिंदी जोडीचे ‘भिरकीट’ला संगीत लाभले आहे. क्लासिक एंटरप्राईज प्रस्तुत, सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल निर्मित ‘भिरकीट’ या चित्रपटाचे नवीन आणि धमाल पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  अनुप जगदाळे यांची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी (Rushikesh Joshi), मोनालिसा बागल (Monalisa Bagal), कुशल बद्रिके (Kushal Badrike), सागर कारंडे (Sagar Karande), सैराट फेम तानाजी गालगुंडे (Tanaji Galgunde), कैलास वाघमारे (Kailas Waghmare), उषा नाईक (Usha Naik), याकूब सय्यद (Yakub Sayyed) यांच्या प्रमुख भूमिका आहे. जबरदस्त कलाकारांची फळी असलेला हा चित्रपट येत्या 17 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 

विनोदवीरांची धमाल

पोस्टरमध्ये सगळेच विनोदवीर एकत्र दिसत असून हा चित्रपट धमाका उडवणार हे नक्की. सध्यातरी चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे, याचा अंदाज येत नसला तरी ‘भिरकीट’ प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणार आहे. चित्रपटाचे छायाचित्रण तनवीर मिर यांनी केले असून संकलन फैजल महाडिक यांचे आहे. तर शैल-प्रितेश या हिंदी जोडीचे ‘भिरकीट’ला संगीत लाभले आहे. युएफओने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT