ADVERTISEMENT
home / मनोरंजन
टाईमपास 3′ वादाच्या भोवऱ्यात, या कारणामुळे झाला वाद

टाईमपास 3′ वादाच्या भोवऱ्यात, या कारणामुळे झाला वाद

‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी काहीशी अवस्था चित्रपटांची झाली आहे. देशातील कोरोना परिस्थिती थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे चित्रपटांच्या रिलीजचा मार्ग काही केल्या मोकळा होत नाही. अनेक हिंदी- मराठी चित्रपट थिएटर रिलीजची वाट पाहात आहेत.तर काहींनी होणारे नुकसान लक्षात घेत ओटीटीवर चित्रपट रिलीज करण्यास सुरुवात केली आहे.आगामी मराठी चित्रपट ‘टाईमपास 3’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा चित्रपट पूर्ण होणाच्या मार्गावर असताना आता हा नवा वाद उद्धवल्यामुळे चित्रपटाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण हा वाद दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यामुळे झाला आहे. दिग्दर्शक रवी जाधव आणि निर्माते मौर्य फिल्म्स यांच्यामध्ये हा वाद झालेला आहे.

कोरोनापेक्षाही देशाला लागलेली कीड म्हणजे राजकारण, अभिनेत्रीने व्यक्त केला राग

निर्मात्यांनी केली नाही पूर्तता

चित्रपट म्हटला की, त्याचे एक बजेट आले. चित्रपट पूर्ण होण्यासाठी आर्थिक बाजू ही सक्षम असावी लागते. त्यामुळेच एखाद्या प्रोजेक्टसाठी निर्माता हा फार महत्वाचा असतो.  टाईमपास 3 या चित्रपटाचे निर्माते अर्थात मौर्य फिल्म्स यांनी या चित्रपटासाठी लागणारा पैसा पुरवलेला नाही. असा दावा दिग्दर्शक रवी जाधव यांनी केला आहे.असे असताना या चित्रपटाचे सर्व हक्क मागण्याचा त्यांना अधिकार नाही असे रवी जाधव यांचे म्हणणे आहे.  रवी जाधव यांनी या आधी टाईमपास, टाईमपास 2 याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे सगळे हक्क हे रवी जाधव यांच्याकडेच आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी पूर्तता केली नसताना असे वागणे अजिबात चांगले नाही यामुळे काहीही साध्य होणार नाही. 

अपघातातून बचावली गौतमी देशपांडे, चाहत्यांना दिली माहिती

ADVERTISEMENT

यामुळे झाली वादाला सुरुवात

 वादाला सुरुवात होण्यास कारणीभूत वर्तमानपत्रात छापून आलेली एक नोटीस ठरली. झाले असे की, मौर्य फिल्म्सचे ढाकने यांनी वर्तमानपत्रात टाईमपासच्या सगळ्या चित्रपटांचे हक्क त्यांच्याकडे असल्याचा दावा केला. अगदी चित्रपटाची पटकथा, गाणी, ट्रॅक्स अशा सगळ्यांवर निर्मात्याचा अधिकार असल्याची नोटीस पाहिल्यानंतर चक्रावून गेलेल्या रवी जाधव यांनी आपली बाजू मांडली आहे.  रवी जाधव यांनी आपले सगळे आरोप धुडकावून लावले आहे. यात काहीही तथ्य नसून या चित्रपटाचे सगळे हक्क त्यांच्याकडे असल्याचेच म्हटले आहे. 

लॉकडाऊन उत्तर नाही’असे ट्विट करणाऱ्या महेश कोठारेंवर नेटीझन्सची टीका

चित्रपटाच्या रिलीजवर येईल गदा

काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचे शूटिंग पूर्णत्वाकडे आले अशी बातमी सगळीकडे आली होती. आता हा चित्रपट लवकरच रिलीज होईल अशी अपेक्षा होती. पण हा नवा वाद उद्भवल्यामुळे आता हा चित्रपट नेमका कधी रिलीज होईल या बद्दल थोडी शंकाच आहे. आता हा नवा वाद मिटण्यास किती वेळ घेतो, या बद्दलही अद्याप कोणतीही माहिती नाही. पण लवकरच हा तिढा सुटेल आणिन या चित्रपटाचा आनंद लुटता येईल. 

आहे एक नवी कोरी लव्हस्टोरी

 ‘टाईमपास’ चे चाहते असाल तर तुम्ही आतापर्यंत याचे पहिले दोन भाग नक्कीच पाहिले असतील.  पहिल्या दोन भागात प्राजू- दगडूची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. पहिला भाग हा त्यांच्या पौंगडावस्थेतला तर दुसरा भाग तरुण झाल्यानंतर फुलणाऱ्या प्रेमकथेचा. पण आता या स्टोरीमध्ये वेगळेपण येणार आहे. प्रथमेश परब- ऋता दुर्गुळे या चित्रपटात दिसणार आहे. 

ADVERTISEMENT


आता या दोघांमधी वाद कधी मिटतो याची अनेकांना प्रतिक्षा आहे. 

19 Apr 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT