ADVERTISEMENT
home / मनोरंजन
गणराज स्टुडिओ

मराठी रॅपर किंग जेडीचे यश, सुरु केला स्वत:चा स्टुडिओ

मराठीत असे अनेक दमदार कलाकार आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीने आपले विश्व निर्माण केले आहेत. केवळ पडद्यावर अभिनेता बनण्यासाठी नाही तर अनेकांची इतरही काही स्वप्ने असतात. आता संगीत क्षेत्रच घ्या ना… वेगवेगळी नवी गाणी आणि नवे गायक आपल्या भेटीला येतात. पण त्यातील काही निवडक आवाज आपल्या मनाचा ठाव घेतात. पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग असलेला रॅप सध्या आपल्या देशातही चांगला प्रचलित आहे. या रॅपमुळे अनेक नावं पुढे आली आहेत. या पैकीच एक म्हणजे किंग जेडी अर्थात श्रेयस जाधव.त्याच्या शिरपेचात आणखी तुरा सजला आहे कारण त्याने आपला नवा स्टुडिओ सुरु केला आहे. चला जाणून घेऊया या विषयी अधिक 

मान्यवरांच्या उपस्थिती उदघाटन

सुरु केला नवा स्टुडिओ

गणराज स्टुडिओ

मराठी पहिला मराठी रॅपर म्हणून श्रेयस जाधवची ओळख आहे. त्याच्या गाण्यांनी त्याला ओळख मिळवून दिली आहे. श्रेयसने अनेक यशस्वी असे चित्रपट केल्यानंतर अजून एक पाऊल पुढे टाकत  गणराज स्टुडिओची निर्मिती केली आहे. या अतंर्गत तो आता डबिंग, व्हिएफएक्स अशा काही प्रॉडक्शनच्या सेवा उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे त्याच्यासारख्या अनेक कलाकारांना काही वेगळ्या संधी उपलब्ध होणार आहे. त्याच्या या स्टुडिओच्या उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला आहे.  या स्टुडिओबाबत त्याने सांगितले की, गणराज स्टुडिओमुळे आता एकाच छताखाली झाला चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.मराठीत अधिकाधिक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती व्हावी त्यासाठीच त्याने एक पाऊल टाकत या स्टुडिओची स्थापना केलेली आहे.  

या स्टुडिओचे लोकार्पण प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनिस बाझमी यांच्या हस्ते झाले. यावेळी मराठीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. 

मराठीला दिले बरेच काही

 मराठी प्रेक्षकांसाठी त्याने बाबू बँड बाजासारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, मी पण सचिन, बघतोस काय मुजरा कर, बसस्टॉप असे अनेक चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांमुळे मराठी सिनेमाला नक्कीच एक वेगळी दिशा मिळाली आहे. आता या नव्या स्टुडिओमुळे त्यात आणखी भर पडणार यात काहीही शंका नाही. 

ADVERTISEMENT

फुल टू मॅडनेस

इन्स्टाग्रामवर श्रेयसचे अनेक चाहते आहेत. त्याची एकूण प्रोफाईल चाळल्यानंतर त्याला अनेक गोष्टींची आवड आहे असे दिसून येते. संगीत ही त्याची आवड असली तरी त्याची प्रोफाईल जियो जी भरके असे सांगणारी आहे.  कारण त्याला जीम, ट्रेकिंग आणि नव्या जागा  फिरायला जास्तीत जास्त आवडतात असे त्याच्या एकूणच प्रोफाईलवरुन दिसून येते. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग नुसत्या त्याच्या संगीतासाठी नाही तर त्याच्या या दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळेही आहे. 

दरम्यान, श्रेयशच्या या नव्या सुरुवातीला POPxo Marathi कडून शुभेच्छा 

01 Aug 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT