ऑफिसमधून आल्यानंतर अगदी संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मराठी मालिकांचा सपाटा बऱ्याच घरांमध्ये अगदी पूर्वीपासून चालत आहे. त्यामध्ये ‘वादळवाट’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘आभाळमाया’ अशा अनेक दर्जेदार मालिकांची नावे घेता येतील. पण सध्याच्या मालिका पाहिल्यानंतर नक्कीच आताच्या मराठी मालिकांच्या विषयांना झालंय तरी काय असा प्रश्न एक प्रेक्षक म्हणून नक्कीच मनात येतो. मराठी मालिकांचा दर्जा इतका का घसरला आहे हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. अनेक मालिकांमध्ये सध्या लग्नानंतरचे अफेअर (Extra Marital Affair) दाखविण्यात येते. यातून नक्की प्रेक्षकांना मालिका काय संदेश देतात? घरात असणाऱ्या आणि अगदी मालिकांमध्येही काम करणाऱ्या लहान मुलांच्या मनावर याचे काय परिणाम होऊ शकतात याचा सारासार विचारही सध्या केला जातोय की नाही? दर दोन मालिकांमध्ये विषय तोच मात्र कलाकार वेगळे अशी स्थिती निर्माण झाली आहे.
लॉकडाऊन नियम मोडल्याने लग्नानंतर 9 दिवसातच सुगंधा मिश्राविरोधात FIR दाखल
लहान मुलांना कोणती शिकवण मिळतेय
अनेक मालिकांमध्ये बालकलाकार काम करताना दिसतात. पण यामध्ये त्यांच्या आई – वडिलांची भूमिका साकारणारे कलाकार हे सतत एकमेकांशी भांडत असतात अथवा त्यातील वडिलांचे दुसऱ्या बाईबरोबर दाखविण्यात येणारे प्रेमसंबंध या लहान मुलांच्या मनावर नक्की कोणते संस्कार करत आहेत याचा जराही विचार करण्यात येत नाही. लहान मुलांना नक्की कोणती शिकवण मिळत आहे. त्यानंतर त्याच्या आईच्या आयुष्यात येणारा पुरूष हा चांगलाच असतो. मग ज्याच्याशी लग्न झालं आहे तोच पुरूष चांगला का नाही असू शकत? हिंदी मालिकांचे अनुकरण करत तेच तेच विषय मांडण्यात आता मराठी मालिकाही पुढारल्या आहेत. पण त्याचा मराठी प्रेक्षकांवर नक्की काय परिणाम होत आहे अथवा नक्की आपल्याला कोणता दर्जा दाखवायचा आहे याचा विचार होताना मात्र दिसत नाही. प्रत्येक मालिकेत कोणतेही वळण दाखवताना किमान खऱ्या आयुष्यात अशा परिस्थिती किती वेळा निर्माण होत असतील आणि खरंच असं असेलही तरी प्रत्येक घरात तर हे नक्कीच नसणार याचेही भान मालिकेच्या निर्मात्यांनी आणि लेखकांनी राखायला हवे.
उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे प्रिया बापटचं साड्यांचे कलेक्शन
कलाकारांचाही नाईलाज
सध्या प्रत्येक दोन मालिकांची कथा अथवा मालिकेचा प्लॉट हा अशा तऱ्हेचा दिसून येतो. त्यामुळे काम हवे असेल तर कलाकारांनाही होकार देण्याचा नाईलाज आहे. कारण त्यावर त्यांचे पोट भरत असते. मग अशावेळी कलाकार किती मालिकांना नकार देणार? असाही प्रश्न उद्बवतो. त्यामुळे मनाला पटो वा न पटो मालिकांमध्ये काम करताना विषय काहीही असला तरीही चांगला पैसा मिळत असेल तर अगदी नावाजलेले कलाकारही अशा भूमिका साकारताना सध्या दिसून येत आहेत. काही चॅनेल्सने तर लग्नानंतर एक तरी अफेअर करायलाच हवे अशीच भूमिका घेतल्याचे सध्या दिसून येत आहे. पण हे कुठपर्यंत चालणार. आता खरं तर प्रेक्षकांनीच आवाज उठवायची वेळ आली आहे. जर अभिजात दर्जांच्या मालिका येत नसतील तर कुठेतरी बोलायला हवं. कारण जोपर्यंत प्रेक्षक असे विषय पाहत राहणार तोपर्यंत अशा मालिका तयार होतच राहणार आहेत. मग मालिकांचा दर्जा घसरला म्हणताना प्रेक्षकांचा दर्जाही घसरला आहे का? असाच प्रश्न निर्माण होतो. पूर्वी अगदी तरूण पिढीदेखील मालिका बघण्यात रस घेत होती. पण या सगळ्या विषयांमुळे आताची पिढी मालिकांकडे ढुंकूनही पाहत नाही याचाही फेरविचार पुन्हा एकदा मालिकांच्या आणि निर्मात्यांच्या क्रिएटिव्ह टीमने करायला हवा हे नक्की.
तारक मेहता…’ फेम मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी, जाणून घ्या कारण
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक