ADVERTISEMENT
home / मनोरंजन
प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मालिकांचे चित्रीकरण वेगळ्या ठिकाणी

प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मालिकांचे चित्रीकरण वेगळ्या ठिकाणी

सध्या वाढत्या कोरोनामुळे (Coronavirus) सगळीकडेच हाहाःकार माजला आहे. महाराष्ट्रात सध्या मालिका अथवा चित्रपट चित्रीकरणाला बंदी आहे. मात्र गेल्यावर्षीप्रमाणे आता हातावर हात धरून बसता येणार नाही. त्यामुळे अनेक मालिकांनी महाराष्ट्राबाहेर ज्या ज्या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे तिथे चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. मराठी आणि हिंदी दोन्ही मालिकांचे चित्रीकरण हे बाहेर चालू करण्यात आले असून ‘Show must go on’ या उक्तीप्रमाणे प्रेक्षकांचे मनोरंजन करणे न थांबवता आता या लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांना आपल्या मालिकांचे पुढील भागही पाहता येणार आहेत. 

होम मिनिस्टर

आता घरबसल्या महिलांना पैठणी मिळविण्याची संधी मिळणार आहे. घरोघरी जाऊन आदेश बांदेकर अगदी महाराष्ट्राचे भाऊजी म्हणून प्रसिद्ध झाले. मात्र आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आदेश महाराष्ट्रातील वहिनींशी संवाद साधत चित्रीकरण करत आहेत. याच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून लवकरच हे भाग प्रदर्शित होतील. काम थांबवून चालणार नाही. निर्मात्यांचेही नुकसान होत आहे. त्यामुळेच आता अनेक निर्मात्यांनी ही शक्कल लढवत चित्रीकरण चालू केले आहे. 

येऊ कशी तशी मी नांदायला

सध्या झी मराठीवरील गाजत असलेली आणि अगदी मनोरंजक वळणावर येऊन पोहचलेली मालिका म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला. स्वीटू आणि ओमच्या प्रेमकहाणीमध्ये प्रेक्षक सध्या रंगून गेले आहेत. यामध्ये कोणताही भंग पडू नये, यासाठी या मालिकेचे कलाकार दमणला रवाना झाले असून मालिकेच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता ओम आणि स्वीटू एकमेकांवरील प्रेम स्वीकारून पुढे काय करणार हे प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

आरस्पानी सौंदर्याने केलंय अमृताने चाहत्यांना घायाळ

ADVERTISEMENT

सिल्वासामध्ये चित्रीकरण करत आहे स्टार प्रवाह

‘आई कुठे काय करते’, ‘स्वाभिमान’,  ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘मुलगी झाली हो’ या सर्व स्टार प्रवाहवरील मालिकांचे चित्रीकरण हे सिल्व्हासामध्ये सुरू झाले आहे. तसंच ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मराठी मालिकेचे सर्व कलाकार हे गुजरातला रवाना झाले असून अहमदाबादमध्ये या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे आता या मालिकांचे पुढचे भागही प्रेक्षकांना पाहता येतील. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि ‘रंग माझा वेगळा’ या दोन्ही मालिकांचे चित्रीकरण हे गोव्यामध्ये करण्यात येणार आहे. 

अवघ्या 4 दिवसांत अर्जुन रामपालची कोरोनावर मात

बजेट वाढवून चित्रीकरणाला सुरूवात

अनेक मालिका या मुंबईत चित्रीत होत असतात. पण या काळात मनोरंजनही करणे महत्वाचे आहे. तसंच निर्मात्यांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे आता बजेट वाढवत अनेक मालिकांचे चित्रीकरण हे विविध ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जितका लागेल तितकाच क्रू आणि कलाकार यांची टीम घेऊन आणि त्यांच्या आरोग्याची नीट काळजी घेऊन तसंच त्यांच्या सर्व टेस्ट आणि त्याचे नेगेटिव्ह रिपोर्ट घेतल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लागणारे बजेटही निर्मात्यांनी वाढवून दिले आहे. केवळ हिंदीच नाही तर आता मराठी मालिकांनाही हा निर्णय घेत आपणही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात मागे नाही आणि आपणही कोविड योद्धे असून काम करायला तयार आहोत हे दाखवून दिले आहे. कोविडच्या सर्व गाईडलाईन्स पाळल्यानंतरच या चित्रीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे हेदेखील मालिकेच्या सर्व कलाकारांनीही नमूद केले आहे. 

जागतिक पुस्तक दिनानिमित्त मालिकांमधील कलाकारांनी व्यक्त केले वाचनप्रेम

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

22 Apr 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT