ADVERTISEMENT
home / मनोरंजन
chandrmukhi_fb

चंद्रमुखी’ फिव्हर सगळीकडे, रिलीज आधी सगळीकडे बझ

मराठी चित्रपट हा उत्तम आणि दर्जेदार असतात. फक्त त्यांची पब्लिसिटी किंवा त्यांचे प्रमोशन हे बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत फारच कमी असते. पण आता तसे काहीच राहिलेले नाही. कारण आगामी मराठी चित्रपट ‘चंद्रमुखी’ ने प्रमोशनसाठी चांगलीच कंबर कसलेली दिसत आहे. त्यामुळे सगळीकडे ‘चंद्रमुखी’ चा फिव्हर चढलेला दिसत आहे. सोशल मीडियावर कुठेही पाहिलं तरी ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील गाणं, तिचा मेकअप लुक सगळं काही वायरल होताना दिसत आहे. तिच्या या लुक आणि लावणीप्रमाणेच हा चित्रपट असणार आहे. प्रमोशनच्या या नव्या फंडामुळे या चित्रपटाची रिलीज आधीच बझ होऊ लागली आहे. 

अमृताची सुंदर लावणी सगळीकडे

 अमृता सुंदर नृत्यांगना आहे हे आपण सगळेच जाणतो. तिच्या या नव्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटात असलेली चंद्रा ही लावणी आता सातासमुद्रापार जाऊन पोहोचली आहे. अनेकांनी या गाण्यावर रिल्स केलेले आहेत. इतकेच नाही तर अमृता स्वत: या चित्रपटासाठी अनेक ठिकाणी प्रमोशन करताना दिसत आहे. कधी मेट्रो तर कधी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत अशा अनेक व्हिडिओमध्ये ती दिसत आहे. तिचा नुकताच पुणे मेट्रोमधील लावणीचा परफॉर्मन्स अनेकांनी डोक्यावर घेतला. चित्रपटासोबतच अमृताच्या साड्यांची देखील चांगलीच चलती पाहायला मिळत आहे.

अमृताच्या साड्यांची क्रेझ

अमृता या चित्रपटात एक लावणी कलाकार म्हणून दिसणार आहे. तिच्या चित्रपटातील आणि प्रमोशनदरम्यान नेसलेल्या सगळ्या साड्यांची क्रेझ तिच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. अमृता आज कोणती साडी नेसेल, त्याचा ब्लाऊज, त्याची स्टाईल कशी असेल त्याची चर्चा फॅशन फॉलो करणाऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे अमृताच्या लुकची चर्चा सध्या सगळीकडे होताना दिसत आहे. अमृताने नेसलेल्या जॉर्जेटच्या साध्या साड्याही सध्या भाव खाऊन जात आहेत. तिचे दागिनेही यात मागे नाहीत. तिने वापरलेली नथ ही सध्या चांगलीच ट्रेंडमध्ये आहे. जी पाहून नक्कीच अनेक जण प्रेमात पडले असतील यातही काही शंका नाही. कारण तिच्या प्रत्येक फोटोखाली अशा कमेंट्स नक्कीच पाहायला मिळतात. 

रोलसाठी घेतली बरीच मेहनत

अमृताने आतापर्यंत अनेकांना चंद्रमुखी’  चित्रपटासाठी मुलाखत दिलेली आहे. तिच्या चित्रपटाबद्दल आणि लुकबद्दल तिने अनेकदा सांगितले आहे. पण तिने यासाठी वर्षभर सराव केला हे कौतुकास्पद आहे. इतकेच नाही तर या रोलसाठी तिने वजन देखील वाढवले आहे.  वजन वाढवूनही ती यामध्ये फिट दिसते. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता आदिनाथ कोठारे हा देखील प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी दिसत आहे. 

ADVERTISEMENT

ट्रेलरला चांगला प्रतिसाद

मराठी चित्रपट आता चांगलेच चालतात. अनेक अमराठी प्रेक्षकही मराठी चित्रपटाचा आनंद लुटण्यासाठी चित्रपट आवर्जून पाहतात. आता चंद्रमुखीचा ट्रेलर आल्यापासून हा चित्रपट रिलीज होण्याची प्रतिक्षा अनेकांना आहे. ज्या पद्धतीने या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार करण्यात आले आहे. तसाच हा चित्रपटही जबरदस्त असेल अशी अपेक्षा सगळ्यांना आहे. येत्या 29 एप्रिल रोजी हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित केला जाणार आहे. आता अवघ्या चार दिवसांवर याचे रिलीज येऊन ठेपले आहे.

दरम्यान तुम्हाला चंद्राचा कोणता लुक आवडला आम्हाला कळवायला विसरु नका.

25 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT