ADVERTISEMENT
home / मनोरंजन
मालिकांमधील लग्नसोहळे ठरत आहेत टीआरपीसाठी फायदेशीर

मालिकांमधील लग्नसोहळे ठरत आहेत टीआरपीसाठी फायदेशीर

मालिका हा घराघरातील चर्चांचा विषय. हिंदी असो अथवा मराठी मालिका असो, जेव्हा जेव्हा मालिकांचा टीआरपी खाली येतोय असं वाटतं तेव्हा तेव्हा त्याचा टीआरपी वाढविण्यासाठी नायक आणि नायिकेचे लग्न आणि लग्नसोहळ्याचे भाग हे नक्कीच कामी येतात. त्यांच्या फुलणाऱ्या प्रेमापेक्षाही कथानकामध्ये जेव्हा जेव्हा मालिकांमध्ये लग्नसोहळे दाखविण्यात आले आहेत तेव्हा तेव्हा त्या त्या मालिकेचा टीआरपी नक्कीच वाढलेला दिसून आला आहे. आताही अनेक मराठी मालिकांमध्ये लग्नाचे सोहळे सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतील शंतनू आणि शर्वरीच्या लग्नाची. तर त्यानंतर या आठवड्यात दुसरं लग्न लागणार आहे ते म्हणजे ‘अशी बायको हव्वी’ या मालिकेत. एकंदरीतच जूनचा हा आठवडा हा दोन्ही जोड्यांच्या लग्नसोहळ्यात निघून जाणार आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षक जरी स्वतः कुठेही लग्नाच्या कार्यक्रमांना जाऊ शकले नसले तरीही घरबसल्या मात्र आपल्या आवडत्या जोड्यांच्या लग्नामध्ये नक्कीच सहभागी होऊ शकणार आहेत. 

‘गाथा नवनाथांची’ मालिकेतून नाथांचा महिमा प्रेक्षकांच्या भेटीला

शंतनू आणि शर्वरीचे अखेर लग्न

सुयश टिळक (Suyash Tilak) आणि सायली संजीव (Sayli Sanjeev) या दोघांच्या आणि इतर सहकलाकारांच्या अभिनयामुळे शुभमंगल ऑनलाईन (Shubhmangal Online) ही मालिका अल्पावधीतच सर्वांच्या घराघरात पोहचली आणि चांगला टीआरपी असणारी ही एक मालिका आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अखेर शंतनू आणि शर्वरीचे लग्न होणार आहे. सध्या त्याचीच लगबग मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे. नेहमीप्रमाणे लवाजमा दाखवता येत नसला तरीही मराठी मालिका आता अगदी लॉकडाऊनमध्ये होणारे लग्नसोहळेही मालिकेत दाखवत आहेत. त्यामुळे अगदी घरच्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. पण या आठवड्यात नक्कीच प्रेक्षकांचा या मालिकेला चांगला प्रतिसाद लाभेल. कारण कोणत्याही मालिकेतील  लग्नसोहळा हा आवर्जून पाहिला जातो आणि शंतनू आणि शर्वरी ही जोडी तर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. या दोघांचेही लग्न पारंपरिक पद्धतीने होणार असून दोघांच्याही लग्नाचे विधी दाखविण्यात येणार आहेत. तर अगदी खास उखाणे घेण्याचा सोहळाही पार पडणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या लग्नातील सप्तपदी विशेष असून शंतनू शर्वरीला उचलून हे फेरे पूर्ण करणार आहे. ऑनलाईन लग्नाच्या अनुभवातून आणि अनेक अडचणींना सामोरे जात आता खऱ्या अर्थाने ही जोडी कायमची एकत्र येणार आहे. त्यामुळेच ही मालिका सध्या खास आहे. 

अखेर प्रतीक्षा संपली, ‘समांतर’ चा तुफान ट्रेलर प्रदर्शित

ADVERTISEMENT

विभास आणि जान्हवीचे लग्न दुसऱ्या बाजूला

दुसऱ्या बाजूला ‘अशी बायको हव्वी’ या मालिकेतील जोडी विभास आणि जान्हवीदेखील लग्नबंधनात अडकत असून विभास जान्हवीला फसवत आहे आणि हे कथानकदेखील एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचले आहे. त्यामुळे दोन्ही लग्नं असली तरीही त्यामध्ये असणारी तफावत अर्थात एका ठिकाणी प्रेमाने होणारे लग्न तर दुसऱ्या बाजूला फसवणुकीने होणारं लग्न अशा दोन्ही बाजू प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. विभासचा खरा चेहरा अजूनही जान्हवीसमोर आलेला नाही. तो चेहरा समोर आल्यानंतर नक्की काय घडणार याचीही आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तसंच मालिकांमधील लग्नसोहळे हे नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि टीआरपीदेखील वाढवायला मदत करतात हे निश्चित.  एकंदरीतच या आठवड्यात एकाच वाहिनीवर दोन लग्नसोहळे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळे या मालिकांचाही टीआरपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

‘बिग बॉस’ची तयारी सुरु, यंदा 6 महिने चालणार हा रिअॅलिटी शो

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

20 Jun 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT