दिवाळीत गोडधोड पदार्थांची चांगलीच रेलचेल असते. येणारा प्रत्येक पाहुणा काहीना काही मस्त खायला घेऊन येत असतो. पण दिवाळी म्हटल्यावर खूप जण गोडाचे पदार्थच घरात घेऊन येतात. कितीही आवडीचा गोड पदार्थ असला तरी एका वेळेनंतर तो खाण्याचा आपल्या सगळ्यांनाच कंटाळा येतो. गोड पाहायची इच्छाही होत नाही. अशावेळी जर तुम्हाला काही चटपटीत स्नॅक खायची इच्छा होणे अगदी स्वाभाविक आहे. पाहुण्यांनाही फराळ द्यायला कंटाळा आला असेल तर तुम्ही घरीच शेंगदाण्यापासून चटपटा शेंगदाणा जो चवीला लागतो एकदम मस्त. दिवाळी फराळ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी करु शकता.
असा बनवा चटपटा शेंगदाणा
चटपटा शेंगदाणा बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत.त्यापैकी अगदी सर्वसामान्यपणे मिळणारा प्रकार म्हणजे मसाला शेंगदाणा. जाणून घेऊया कसा बनवायचा मसाला शेंगदाणा
साहित्य:
एक वाटी कच्चे शेंगदाणे,½ वाटी बेसन, अंदाजे तांदुळाचे पीठ, हळद, लाल तिखट, आलं-लसूण पेस्ट, मीठ
मसाल्यासाठी:
काळे मीठ, चाट मसाला, लाल तिखट
कृती: एका बाऊलमध्ये बेसन, तांदुळाचे पीठ, हळद, लाल तिखट एकत्र करुन घ्या.
त्यामध्ये आवडीनुसार आलं-लसूण पेस्ट घालून एकजीव करा. आता त्यामध्ये शेंगदाणे घालून पाणी न घालता कोट करुन घ्या.
जर मिश्रण घट्ट असेल किंवा शेंगदाण्याला कोट करेल इतकेच पाणी त्यामध्ये घाला. जास्त पाणी घालू नका.
आता कढईत तेल गरम करुन त्यामध्ये शेंगदाणे छान तळून घ्या.
मसाल्यासाठी असलेले साहित्य एकत्र करुन तळलेल्या मसाला शेंगदाण्यामध्ये हा घाला. आणि छान मिक्स करा. तुमचा मसाला शेंगदाणा तयार
चिझी मसाला शेंगदाणा
चीझ हा खूप लोकांच्या आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे मसाला शेंगदाण्याला थोडासा ट्विस्ट देऊन तुम्ही चिझी मसाला शेंगदाणे देखील बनवू शकता.
साहित्य :
एक वाटी शेंगदाणे, बेसन, चीझ पावडर, लाल तिखट, मीठ,
मसाल्यासाठी:
पीरी पीरी पावडर, चाट मसाला
कृती :
एका बाऊलमध्ये बेसन, तांदुळाचे पीठ, चीझ पावडर, लाल तिखट,मीठ एकत्र करुन घ्या. त्यामध्ये शेंगदाणे घालून मग लागेल इतके पाणी घ्या
शेंगदाण्याला कोट होऊ शकेल इतका मसाला लागला की, तेल गरम करायला ठेवा आणि लगेच शेंगदाणे तळून ध्या
मसाल्यासाठीचे साहित्य एकत्र करुन तळून थंड झालेल्या शेंगदाण्यामध्ये घालून टॉस करा.
तुमचे चीझी मसाला शेंगदाणे तयार
आता घरी नक्की बनवा शेंगदाण्यापासून चटपटा शेंगदाण्याचा झटपट स्नॅक्स
अधिक वाचा
Chakli Recipe In Marathi | चकली रेसिपी मराठी
दिवाळीसाठी बनवा खवा पासून बनणारे पदार्थ | Khava Recipe In Marathi