ADVERTISEMENT
home / मालिका
माझा होशील ना

माझा होशील ना’ मालिका देखील घेणार का प्रेक्षकांचा निरोप

टीआरपीच्या गणितात मागे पडत चाललेल्या अनेक मालिकांना आतापर्यंत चॅनेलने नारळ दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेल्या काही मालिका पुन्हा एकदा सुरु झाल्या खऱ्या पण त्यांना म्हणावा तितका टीआरपी काही मिळवता आला नाही. त्यामुळेच की काय काही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला दिसत आहे. या बंद होणाऱ्या मालिकांच्या यादीमध्ये झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेचा समावेश आहे. या मालिकेतील सई- आदित्य या फ्रेश जोडीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती. पण त्याचा फारसा फरक हा टीआरपीवर दिसून आलेला दिसत नाही. त्यामुळेच की काय ही मालिका लवकरच गाशा गुंडाळणार आहे अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आलेली आहे.

मालिकेचा अर्थ जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक,या नव्या मालिकेची होतेय चर्चा

खोट्या आदित्य देसाईचं भांड फोडणार

सध्या मालिकेत आदित्यला तो आदित्य कश्यप नसून आदित्य देसाई आहे हे कळले आहे. तो ज्या कंपनीत काम करत होता. ती कंपनी त्याचीच आहे. हे त्याच्या मामांनी त्यांना सांगून टाकले आहे. पण कंपनी ताब्यात घेण्याच्या आधीच जेडी (जयवंत देसाई) अर्थात आदित्यचा काका त्याच्या मुलाला खोटा आदित्य म्हणून उभा करतो आणि कंपनी हडपतो. आदित्यचे नाव काकापासून बचावासाठी बदलण्यात आल्यामुळे त्याला ते सिद्ध करता येत नाही. पण आदित्य कश्यप हाच आदित्य देसाई आहे हे सिद्ध करण्यासाठी आता सगळे मामा आणि सई यांचे प्लॅन सुरु झाले आहे. खोटा आदित्य देसाई कोण आहे? त्याला कसे फसवायचे हे सगळे सुरु असताना सईच्या एका चुकीमुळे सई- आदित्य दोघेही अडचणीत सापडले आहेत.  आता मामा आदित्य आणि सईला कसे जेडीच्या तावडीतून सोडवणार हे जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. 

आदित्य- सईला मिळाली पसंती

ADVERTISEMENT

या मालिकेची सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी मामांची जुगलबंदी आणि आदित्य-सई यांचे विरोधाभासाचे असलेले स्वभाव सगळ्यांनाच आवडले होते. गौतमी देशपांडे यामध्ये सईची भूमिका साकारत आहे. तर आदित्यची भूमिका यामध्ये विराजस कुलकर्णी साकारत आहे.  या भूमिकेला खूप जणांची पसंती मिळाली. या मालिकेची सुरुवात आदित्य-सईच्या लव्हस्टोरीपासून झाली होती. दोन  वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे असलेले दोन लोक एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर हे लग्न साकारण्यासाठी जे काही होते तो सगळा गोंधळ पाहण्यात मजा आली होती. ही एक कौटुंबिक मालिका खूप जणांच्या आवडीची झाली होती. 

बेल बॉटममधला लाराचा लुक व्हायरल, इंदिरा गांधींच्या भूमिकेत ओळखणं कठीण

अनेक मालिका देणार निरोप

‘माझा होशील ना’ ही अशी एकमेव मालिका नाही जी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अजूनही अशा मालिका आहेत ज्या प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. काही मालिका या संपणार आहेत. तर काही मालिका आता अर्ध्यावरच पूर्णविराम घेणार आहेत. त्यामुळे टीआरपी या कारणामुळेच ही मालिका संपणार आहे हे नक्की! या जुन्या मालिकांच्या जागी आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, ‘मन झालं बाजिंद’, ‘ती परत आलीये’ अशा काही मालिका येणार आहेत. याचे प्रोमोजही आता दाखवा.यला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या मालिका लवकरच दिसणार आहेत. 

काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत या बद्दल तुमचे मत काय?

ADVERTISEMENT

खण मंगळसूत्राचा ट्रेंड, समिधा गुरूचा मराठमोळा साज

04 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT