गेली दोन वर्ष कोव्हिडमध्ये गेल्यानंतर कधी एकदा बाहेर फिरायला जातोय असे अनेकांचे झाले आहे. कोरोनातून बाहेर येताना किंवा लसीकरणानंतर अधिक काळजी घेत बाहेर जाण्याचे खूप जण प्लानिंग करत असाल आणि विमानाने जाण्याची वेळ येणार असेल तर तुमच्यासाठी आजचा लेख खूपच फायद्याचा असणार आहे. या कोव्हिड काळाने अनेका काही गोष्टी शिकवल्या. खूप जणांचे ट्रॅव्हलिंग प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर आता अनेकांना बाहेर जाण्याचे बुकिंग करताना नेमके करायला हवे ते माहीत असण्यासाठी काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. कारण एकदा हे प्लॅनिंग यशस्वी झालं की, तुम्हाला मस्तपैकी तुमच्या फोटोसोबत ट्रॅव्हल कोट्सही शेअर करता येतील.
फ्लाईट बुक करताना
हल्ली रुग्णांची वाढती संख्या पाहता कधी काय होईल सांगता येत नाही. देश आणि परदेशासाठी कोणतेही फ्लाईट बुक करायचे म्हणजे एक धास्ती मनात असते की, जर सगळे बंद झाले तर काय? सगळ्यात आधी तुम्ही जो प्लॅन केला आणि ज्या तारखेसाठी तुम्ही बुकिंग केलं आहे. तो दिवस उजाडेपर्यंत काही झाले नाही तर उत्तम. पण त्या आधी जर तुम्हाला विमान प्रवास कॅन्सल होऊ शकतो असे वाटत असेल तर तुम्ही घाई करुन तिकिट कॅन्सल करायला अजिबात जाऊ नका. कारण अचानक आलेल्या काही गोष्टींमुळे विमान कंपनी सगळी उड्डाणं रद्द करते. त्यावेळी तुम्हाला पैसे किंवा त्या बदल्यात तारखा बदलण्याची संधी मिळते. तुम्ही घाई करुन विमान कॅन्सल केले तर तुमचे त्यामध्ये खूप नुकसान होऊ शकते.
उदा. विमान कंपन्या तुम्ही कॅन्सल केलेल्याचे खूप कमी पैसे मिळतात. त्यामुळे तुमचे खूप नुकसान होते. त्यामुळे तुम्ही याची काळजी नक्की घ्या.
नियमांचे वाचन करा
हल्ली कोव्हिडमुळे बरेच नियम बदलले आहेत. तुम्हाला विमानात बसताना अनेक गोष्टींची पालन करावे लागते. म्हणजे तुमच्याकडे तुमचे वॅक्सिन प्रमाणपत्र असायला हवे असते. इतकेच नाही तर काही वेळा आरटी पिसिआर टेस्ट देखील कराव्या लागतात. त्याची माहिती तुम्हाला आदल्या दिवशी फोनवर येते. पण असे असले तरी देखील तुम्ही त्याची माहिती आधीच घ्या. जेणेकरुन तुमचा वेळ विमानतळावर वाया जाणार नाही. त्यामुळे नियम वाचून घ्या. तुम्ही त्या नियमांमध्ये बसता की नाही ते बघा.
तुम्ही कुठे जात आहात?
देशांतर्गत काही प्लॅन्स असतील तर ठिक पण परदेशात जाण्याचे प्लॅन करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल ती अशी की, काही देशांमध्ये जाण्याची अजूनही बंदी आहे. त्यांचे व्हिसा मिळवताना तुम्हाला काही गोष्टींची अधिक पूर्तता करावी लागते. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजीही घ्यायला हवी. शक्यतो तुम्ही असा देश निवडू नका. जिथे तुम्हाला जाण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे असे ठिकाण निवडा जेथे कोव्हिडचा आकडा हा कमी असेल आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर खूप नियमांचे पालन करावे लागेल.
आता फ्लाईटचे बुकिंग करताना तुम्ही या काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमचा पैसाही वाया जाणार नाही.