ADVERTISEMENT
home / आरोग्य
औषधी वनस्पती माहिती

औषधी वनस्पती माहिती व उपयोग मराठीत | Medicinal Plants Information In Marathi

पूर्वीच्या काळी आजार कोणताही असो त्या आजारावर इलाज करण्यासाठी काही खास औषधी वनस्पतींचा वापर हा केला जात असे.. आयुर्वेदात अशा काही खास वनस्पती सांगितल्या आहेत ज्यांच्या उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. आजही खूप जण औषधी वनस्पती (medicinal plants in marathi) यांचा वापर करुन आरोग्याची काळजी घेतात. कारण औषधी वनस्पतीचा वापर हा आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. आयुर्वेद चाळण्याचा हल्ली कोणालाही वेळ नसेल त्यामुळेच औषधी वनस्पती माहिती व उपयोग (medicinal plants information in marathi) तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही ही वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची माहिती शेअर करत आहोत. शाळेत असताना आपल्याला औषधी वनस्पतींची बऱ्यापैकी माहिती नक्कीच असेल पण या औषधी वनस्पती माहितीमध्ये काही आणखी औषधी वनस्पतींचा समावेश होतो हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊया अशाच काही औषधी वनस्पतींविषयी

अर्जुन (Arjun)

Arjun
Instagram

अर्जुन हे आतापर्यंत आपण पौराणिक कथांमध्ये वाचलेले नाव आहे. पण या नावाची औषधी वनस्पती असते हे कदाचित फार कमी जणांनाच माहीत असेल. अर्जुनच्या झाडाला इंग्रजीमध्ये Terminalia असे म्हणतात. ऋग्वेदामध्ये या झाडाचा उल्लेख केलेला आहे. अर्जुन हे झाड मूळ भारतातील वनस्पती आहे. हे झाड वृक्ष आहे. या झाडाची साल ही औषधी आहे. अर्जुनाची पाने ही आयताकार आकाराची असतात. या जाडाला पांढऱ्या रंगाची फुले असतात.  हे झाड 25 ते 30 मी. उंचीपर्यंत वाढते. ह्रदयरोगासाठी अर्जुन हे झाड फारच फायद्याचे मानले जाते.

अर्जुन वनस्पतीचे फायदे

  • रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अर्जुन ही वनस्पती खूप फायदेशीर ठरते.
  • अर्जुनाची साल दूधासोबत घेतल्यामुळे  शरीराल हानिकारक असलेला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते.
  • अर्जुन सालीच्या सेवनामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
  • ह्रदयरोग असणाऱ्यांनी दररोज दुधातून अर्जुन पावडर घेतल्यामुळे त्याचा फायदा होतो असे निदर्शनास आले आहे.

डिकमली (Dikamali)

Dikamali
Instagram

डिकमली ही एक औषधी वनस्पती असून याचा उपयो अनेक आजारांवर केला जातो. महत्वाच्या औषधी वनस्पतीमध्ये याचा समावेश केला जातो. डिकमली हे लहान पण दीर्धकाळ जगणारे असे हे वृक्ष आहे. डिकमलीचा डिंक हा फारच फायद्याचा असतो. झाडातून आलेला चिकट पदार्थ हा अनेक आजारांवर वापरला जातो. डिकमली या औषधी वनस्पती माहिती व उपयोग मराठी (medicinal plants information in marathi) जाणून घेताना त्याचे फायदे पाहुयात.

डिकमलीचे फायदे

  • जर जंताचा त्रास होत असेल तर डिकमली दिली जाते. त्यामुळे जंत कमी होण्यास मदत मिळते.
  • हिवतापात कापरे भरत असेल तर डिकमलीचे सेवन करावे नक्कीच फायदा होतो.
  • मुलांना दात येताना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होतो अशावर डिकमली ही फार फायद्याची ठरते.

अश्वगंधा (Ashwagandha)

Ashwagandha
Instagram

औषधी वनस्पती माहिती घेताना अश्वगंधाची माहिती ही आवर्जून घ्यायला हवी. अश्वगंधा ही गुणकारी वनस्पती आहे. अश्वगंधामुळे अनेक आजार बरे होण्यास मदत मिळते. अगदी प्राचीन काळापासून अश्वगंधाचा उल्लेख अनेक आजारांमध्ये केला आहे. क्षयरोग,  खोकला, खाज, व्रण, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा फारच फायद्याची आहे. अश्वगंधाची पाने उकळून त्यापासून चहा तयार केला जातो. जो आरोग्यासाठी फारच लाभदायक ठरतो. अश्वगंधा याला इंग्रजीमध्ये Withania somnifera नावाने ओळखले जाते. औषधी वनस्पती माहिती मराठी medicinal plants information in marathi जाणून घेताना त्याचा उपयोग नेमका कसा करावा ते जाणून घेऊया.

अश्वगंधाचे फायदे

ADVERTISEMENT
  • अश्वगंधाचा कर्करोगापासून दूर ठेवण्याचे काम करते.
  • पुरुषांमधील टेस्टेस्टेरॉन वाढवण्याचे काम अश्वगंधा करते.
  • ज्यांना निद्रानाशाचा त्रास असेल किंवा चांगली झोप येत नसेल तर अशांनी अश्वगंधाचे सेवन केल्यामुळे तणाव कमी होऊन  झोप चांगली लागते.
  • अश्वगंधाच्या सेवनामुळे पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करते.
  • डोकेदुखी आणि अर्धशिशीवर अश्वगंधा फार चांगले आहे.
  • शरीर मजबूत करण्यासाठी आणि हाड मजबूत करण्यासाठी अश्वगंध फारच फायद्याचे ठरते

अडुळसा (Adulsa)

Adulsa
Instagram

खोकला आल्यानंतर, घसा दुखणे यावर अडुळसा लहानपणी सगळेच प्यायले असतील. अडुळसा ही औषधी वनस्पती मराठी माहिती medicinal plants information in marathi जाणून घेताना ही वनस्पती सगळ्यांच्या माहितीची आहे. अडुळसा ही आयुर्वेदातील अशी वनस्पती आहे. अडुळसा या वनस्पतीला संस्कृतमध्ये ‘वासा’ असे म्हटले जाते. बाजारात अडुळसा असलेले अनेक सिरप मिळतात. जे खोकला, सर्दी, बसलेला घसा, चोंदलेले नाक यासाठी फारच फायद्याचे असतात. ज्या ठिकाणी साधारण 300 मिमी इतका पाऊस पडतो तिथे अडुळसा उगवतो. अडुळशाचे दोन प्रकार आहेत हिरवा आणि लाल अडुळसा असे प्रकार असतात. अडुळशाच्या पानांचा उपयोग करुन शिंपी पक्षी त्यांचे घर बांधतो. औषधी वनस्पती माहिती व उपयोग असल्यामुळे पानाच्या मुळाशी असलेले मधासारखे गोड द्गव्य मधमाशांनाही आवडते. त्यामुळे या झाडावर मधमाशांचे पोळे अगदी हमखास असते. 

अडुळशाचे फायदे

  • अडुळसामध्ये कफनाशक गुणधर्म आहेत. अडुळशाची पाने जाळून त्याचा धूर शरीरात घेतला तर कफ कमी होण्यास मदत मिळते.
  • क्षयरोगावारही अडुळसा हा फारच फायद्याचा मानला जातो. कारण अडुळशाच्यापानामध्ये ज्येष्ठमध घालून अष्टमांश काढा केला जातो. असा काढा करुन प्यावा.
  • नाकातून रक्त येण्याचा त्रास खूप जणांना असेल तर अशांनी अडुळसा आणि त्यामध्ये खडीसाखर घालून त्याचे सेवन केले तर याचा त्रास कमी होतो.

इसबगोल (Isabgol)

Isabgol
Instagram

इसबगोल नावाची औषधी वनस्पती कसपटासारखी दिसायला असते. अनेक कारणांसाठी ही औषधी वनस्पती ही फारच फायद्याची ठरते. ईसबगोल प्लाटांगो ओवाटा (Plantago Ovata) या प्रकारातील औषधी वनस्पती माहिती medicinal plants information in marathi आहे. वाळवंटात वाढणारी अशी ही औषधी वनस्पती आहे. सध्याचे लाईफस्टाईल पाहता पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी इसबगोल खाण्याचा सल्ला दिला जातो. इसबगोलची लागवड ही भारतच नाही तर इतर देशातही केली जाते. भारतात याची शेती अधिक केली जाते. त्यामुळे भारत ही औषधी वनस्पती ही निर्यात केली जाते. त्यामुळे इसबगोल ही वनस्पती किती फायद्याची आहे ते जाणून घेताना त्याचे फायदेही जाणून घ्यायला हवेत.

इसबगोलचे फायदे

  • अयोग्य अशा पोटाच्या सवयीमुळे खूप जणांचे वजन वाढते. इसबगोलचे सेवन केले तर तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. इसबगोलचे सेवन केल्यामुळे पोट साफ होण्यास चांगलीच मदत मिळते.
  • इसबगोलमध्ये मोठ्याप्रमाणात फायबर असते. फायबर समृद्ध असा हा पदार्थ असल्यामुळे ह्रदयाशी संबधित आजार कमी होण्यास मदत मिळते.
  • लिपिडची पातळी वाढवण्यात आणि स्नायूंना बळकटी मिळण्यास इसबगोल मदत करते.
  • रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी इसबगोलचा उपयोग करावा.

चंदन (Chandan)

Chandan
Instagram

चंदनसा बदन चंचल चितवन… हे गाणं आपण सगळ्यांनाच परिचयाचे आहे आणि चंदन हे देखील अनेकांना परिचयाचे आहे. औषधी वनस्पती व उपयोग (medicinal plants information in marathi ) जाणून घेताना चंदनाचा उल्लेख होणार नाही असे मुळीच नाही. चंदनाची ओळख बहुगुणी वनस्पती म्हणून केले जाते. सौंदर्य वाढवण्यासाठी चंदनाचा वापर केला जातो. चंदनाचा मंद सुगंध हा परिचयाचा असेल. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये चंदनाचा वापर केला जातो. चंदनाला इंग्रजीमध्ये Sandalwood असे म्हटले जाते.  भारताच्या साऊथ इंडिया आणि साऊथ इस्ट आशिया भागात चंदनाची लागवड केली जाते. चंदनाच्या लाकडाचा उपयोग करुन त्याची पावडर केली जाते आणि त्याचा वापर केला जातो. चंदनाचे फायदे लक्षात घेऊन त्याचा वापर करायला हवा

चंदनाचे फायदे 

ADVERTISEMENT
  • चंदन हे थंड असते. कपाळावर ते लावल्यामुळे चिडचिडेपणा करणाऱ्यांना चंदनाचा टिळा लावल्यामुळे डोके शांत होण्यास मदत मिळते. अनेक विज्ञानातही चंदनाचा उल्लेख केलेला आहे.
  • एकाग्रता वाढवण्यासाठी चंदन मदत करते. मुळात चंदनाचा टिळा लावल्यामुळे डोक्याकडे जाणाऱ्या नसांना शांतता मिळाल्यामुळे हा फरक दिसून येतो.शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी चंदन हे फार फायदेशीर ठरते.

शरीरावर कोठेही सूज आली  किंवा शरीराची लाही लाही होत असेल तर तुम्ही चंदन भिजवून त्या ठिकाणी लावले तर चंदनामुळे आराम मिळू शकते. 

ह्रदयासाठीही चंदन हे फार फायद्याचे आहे. उगाळलेल्या चंदनामध्ये चिमूटभर खडीसाखर आणि थेंबभर मध घालून त्याचे चाटण घ्या.

उष्णतेमुळे खरुज उठली असेल तर त्यापासून आराम मिळण्यासही चंदन हे फार फायद्याचे ठरते. 

एरंड (Castor)

Castor
Instagram

एरंड ही औषधी वनस्पती आहे जी अनेक जण रोजच्या वापरातही एरंडीचा उपयोग करत असतील. एरंडीचे तेल याला castor oil असे म्हणतात. केसांसाठी, त्वचेसाठी एरंडीचा उपयोग केला जातो. अनेक आजारांवर एरंडीचा उपयोग केला जातो. एरंडला मराठीत Ricnius असे म्हणतात. भारतच आणि इतर देशांमध्येही याची लागवड केली जाते. एरंडीचे तेल काढून त्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. औषधी वनस्पती माहिती व उपयोग (medicinal plants information in marathi) जाणून घेताना एरंड तेलाचा उपयोग आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात.

एरंड तेलाचे फायदे

  • शरीराच्या कोणत्याही भागाला सूज आली असेल तर एरंडाचे तेल घेऊन ते त्या भागावर लावावे. त्या भागाला मसाज करावा त्यामुळे आराम मिळतो.
  • पोटाचे आरोग्य खराब झाले असेल किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही एरंडेल तेल एक चमचाभर रात्रभर प्यावे त्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते.
  • शरीरावरील अनावश्यक चरबी आणि वजन कमी होण्यासाठी गरम पाण्यात ग्रीन टी- एरंडेल तेलाचे काही थेंब घेऊन ते प्यावे.
  • एरंडेल तेल घेऊन त्यामध्ये सोडा घालून तो चेहऱ्यावरील डागांवर लावावा त्यामुळे तुमच्या त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळेल.
  • एरंडेल तेलामध्ये ओमेगा आणि रेसिनोलेईक घटक असतात. ज्यामुळे केसांची उत्तम वाढ होण्यास मदत मिळते. 

बेल (Bel)

Bel
Instagram

बेल हे फळ अत्यंत आयुर्वेदीक आणि औषधी आहे. उष्ण कटीबंध अशा ठिकाणी हे दिव्यवृक्ष उगवते. प्राचीन काळापासून याचा उपयोग अनेक कारणांसाठी केला जातो.शंकरासाठी अत्यंत प्रिय अशी बेलाची पाने आहेत. पण बेलाची पानेच नाहीतर बेलाची फळ देखील फारच फायद्याची असतात. अनेक शुभकार्यात बेलाची पाने ही आवर्जून वापरली जातात. सध्याच्या काळात होणारी झाडांची कत्तल पाहता हे असे दिव्यवृक्ष काळाच्या आड जाऊ नये म्हणून या वृक्षाला देवपुजेत स्थान देण्यात आलेले आहेत बेल याला हिंदीमध्ये सिरल, संस्कृतमध्ये बिल्व असे म्हणतात. बेल ही अशी आयुर्वेदीक वनस्पती माहिती व उपयोग (medicinal plants information in marathi) जाणून घेत त्याचे फायदे जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

बेलाचे फायदे

  • बेलाच्या फळाच्या सेवनामुळे अस्थमाचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.
  • कमी ऐकण्याचा त्रास तुम्हाला होत असेल तर गोमूत्रात बेलफळ वाटून ते कानात घातले जाते त्यामुळे कमी ऐकू येण्याची समस्या कमी होते. 
  • भूक लागत नसेल तर अशावेळी बेलफळ खाण्यासाठी दिले जाते त्यामुळे भूक वाढण्यास मदत मिळते
  • मलावरोध व बद्धकोष्ठता या त्रासामध्ये बेलफळाच्या रसाचे सेवन केले जाते. त्यामुळे याचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

बेहडा (Behda)

Behda
Instagram

आयुर्वेद आणि औषधी वनस्पती माहिती व उपयोग यामध्ये बेहडाचा समावेश केला जातो. बेहडा ही अशी औषधी वनस्पती आहे जिचा शालेय पुस्तकापासून सगळीकडे समावेश केला जातो. बेहडा हे पानझडी वृक्ष आहे. आग्नेय आशियात याची लागवड केली जाते. म्यानमार, श्रीलंका आणि भारत या देशातील काही भागांमध्ये बेहडा ही आयुर्वेदिक वनस्पती आढळते. बेहडा हे झाड 20 ते 30 मीटर उंच वाढते. या झाडाची साल राखाडी रंगाची असते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाने गळून पडतात. त्यानंतर बेहडा फुलायला सुरुवात होते. या झाडाची फुलं ही लहान व पिवळट रंगाची असतात. या फुलांना उग्र असा वास येतो.

बेहड्याचे फायदे

  • बेहड्याचे चूर्ण करुन त्याचे सेवन केल्यामुळे कफाचा त्रास कमी होतो. बेहड्याचे चूर्ण अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असते. पोटाच्या विकारासाठी ते अत्यंत गुणकारी असते.
  • बेहड्याच्या सालीची पूड करुन त्यामध्ये मध घालून ती डोळ्यांना लावल्यामुळे डोळ्यांची सूज कमी होण्यास मदत मिळते.
  • बेहडाची पूड आणि मधु यांना एकत्र करुन त्याचा उपयोग काजळ म्हणून करु शकता. त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळण्यास मदत मिळेल.
  • त्वचा रोगावरही बेहड्याच्य तेलाचा उपयोग करुन त्वचेवर लावल्यामुळे त्वचेवरील खाज, पुरळ कमी होण्यास मदत मिळते

मंजिष्ठा (Manjistha)

Manjistha
Instagram

मंजिष्ठा ही आयुर्वेदीक आणि औषधी वनस्पती आहे. मंजिष्ठा वनस्पतीची मूळ, फळ, पान ही सगळीच फायद्याची असतात. अनेक शारीरिक समस्यांसाठी मंजिष्ठाचा उपयोग केला जातो. आयुर्वेदात मंजिष्ठाचे अनेक फायदे नोंदवण्यात आलेले आहेत. मंजिष्ठाला मराठीत Rubia cordifolia  असे म्हणतात. अनेक स्त्रीरोगावर देखील मंजिष्ठाही फारच फायद्याची ठरते. मंजिष्ठाची मुळी वापरुन त्याची पूड केली जाते आणि त्याचा उपयोग केला जातो. औषधी वनस्पती माहिती व उपयोग (medicinal plants information in marathi) याची माहिती करुन घेताना मंजिष्ठाचे फायदे जाणून घेऊया.

मंजिष्ठाचे फायदे

  • वजन कमी करण्यासाठी मंजिष्ठाही फारच फायद्याची ठरते. मंजिष्ठाची पूड अगदी अर्धा चमचा मंजिष्ठा पूड चहात घालावी. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
  • रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे डाएबिटीझ पेशंटसाठी हा खूप चांगला असा पर्याय आहे.
  • मासिक पाळीमध्ये जर तुम्हाला त्रास होत असेल तर मंजिष्ठाचे सेवन करु शकता. त्यामुळे पोटाचे दुखणे आणि ब्लड फ्लो चांगला होण्यास मदत मिळते.
  • जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर तुम्ही मंजिष्ठाचे सेवन तुमच्यासाठी फारच फायद्याचा ठरतो.

शतावरी (Shatavari)

Shatavari
Instagram

शतावरी हे आयुर्वेदातील वरदान आहे. शतावरी कल्पचा उपयोग अनेक ठिकाणी केलेला तुम्ही नक्कीच ऐकला असेल. औषधी वनस्पती माहिती व उपयोग (medicinal plants information in marathi) जाणून घेताना शतावरीचा उपयोग जाणूनव घ्यायलाच हवा शतावरी हे बेलाच्या झाडाची मूळ असतात. बेलाच्या मूळांना एकावेळी खाली 100 हून अधिक मूळ येतात. साधारण 30 सेटींमीटर लांब अशीही मूळ असतात. फिक्कट चॉकलेट रंगाची ही मूळ सुकवली जातात आणि मग त्यांचा वापर केला जातो. शतावरी ही दोन प्रकारची असतात.

ADVERTISEMENT

१. विरलकन्द शतावरी: शतावरीचा हा प्रकार मांसल, लुसलुशीत असा असतो. अशा प्रकाची शतावरील काढल्यानंतर त्यांचा गुच्छाच निघतो.
२. कुन्दपत्रा शतावरी: या प्रकारातील शतावरीला सफेद रंगाची फुले येतात. याला लागलेली फळ गोल आकाराची असतात. 

शतावरीचे फायदे

  • शतावरी स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाची वनस्पती आहे. स्त्रियांना शक्तीवर्धक अशी ही वनस्पती आहे. त्याच्या सेवनामुळे प्रजनन क्षमतेवर चांगला प्रभाव पडतो.
  • मासिक पाळी आणि मोनोपॉज या दोन्ही काळात आरोग्याची काळजी घेण्यास शतावरी कल्प मदत करते.
  • स्तनपान करणाऱ्या मातांसाठी ही उत्तम वनस्पती आहे त्यामुळे बाळांना दूध मिळते.
  • शतावरी कल्पमुळे त्वचा चिरतरुण राहण्यास मदत मिळते
  • सतत पिंपल्स येत असतील तर त्या पिंपल्सवर शतावरी कल्पाची पेस्ट लावल्यामुळे त्यांचा त्रास कमी होतो. त्वचा अधिक तजेलदार आणि चमकदार होण्यास मदत मिळते.
  • शतावरी पावडर केसांना लावल्यामुळे केस मजबूत होतात. आयुर्वेदिक उपायांनी केसांची काळजी उत्तम पद्धतीने घेता येते

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. औषधी वनस्पतीचा वापर नेमका कसा करावा?

प्रत्येक औषधी वनस्पती वापरण्याची पद्धत ही वेगळी असते. त्यांचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे असते. आयुर्वेदात अशा वनस्पतींचा वापर नेमका कसा करायचा त्याचे प्रमाण किती असावे याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यानुसारच त्याचा वापर करावा लागतो.

2. औषधी वनस्पतींचे काही दुष्परिणाम असतात का?

हो, औषधी वनस्पती या नैसर्गिक असल्या तरी देखील त्या परिणामकारक असतात. ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा त्रासदायक ठरु शकतो. त्यामुळे कोणत्याही औषधी वनस्पतींचे वापर करताना त्याची योग्य माहिती असल्याशिवाय करु नका. नुसते फायदे वाचून त्यांचा उपयोग करणे हे आरोग्यासाठी चांगले नाही. 

ADVERTISEMENT

3. औषधी वनस्पती या केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगल्या असतात का?

हो, काही निवडक औषधी वनस्पती जसे की, अश्वगंधा, कडिपत्ता अशा काही वनस्पती या केसांसाठी फारच उत्तम काम करतात. तर चंदन, गुलाब पावडर, आंबेहळद अशा काही वनस्पती या त्वचेसाठी फारच चांगल्या असतात. 

28 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT