ADVERTISEMENT
home / Fitness
वडाच्या झाडाचे आरोग्याला होतात अफलातून फायदे (Medicinal Uses Of Banyan Tree In Marathi)

वडाच्या झाडाचे आरोग्याला होतात अफलातून फायदे (Medicinal Uses Of Banyan Tree In Marathi)

वडाचं झाड आठवतं ते फक्त वटपौर्णिमेला. पण खरं तर हे जाड आपल्याला दशकानुदशके सावली देत असतं. वडाचं झाड एकदा लावलं की तुम्हाला वर्षानुवर्षांची साथ मिळते. वडाच्या झाडाच्या पारंब्या आणि वडाचं झाड हे कायमच सर्वांना हवंहवंसं वाटणारं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळतो. त्यामुळेच वटपौर्णिमेलादेखील हे झाड पूजलं जातं. या झाडाची पौराणिक महती तर आपल्याला माहिती आहेच. पण या झाडाचे आपल्या आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात याची तुम्हाला कल्पना आहे का? कदाचित तुम्हाला याबद्दल जास्त माहिती नसेल. असं असेल तर या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला याचं महत्त्व सांगणार आहोत. वडाचं झाड हे केवळ पूजण्यासाठीच नाही तर त्याचा तुमच्या आरोग्यासाठीही फायदा होतो. नक्की याचा फायदा काय आहे हे सांगण्याआधी आपण वडाच्या झाडाचं पोषक तत्व काय आहे ते पाहूया – 

वडाच्या झाडाचं पोषक तत्व (Nutritional Value of Banyan Tree In Marathi)

Banyan Tree Information In Marathi

वड हा भारतीय उपखंडामध्ये आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. फायकस या प्रजातीमध्ये मोडणारी वड ही बेंगालेन्सिस नावाची जात  आहे. हा वृक्ष सर्वसाधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतो. महत्त्वाचं म्हणजे या वडाला ज्या पारंब्या फुटतात त्या जमिनीपर्यंत पोहचतात. या जमिनीपर्यंत पोहचून त्यांना खोडांचा आकार येतो आणि मग त्या खोडांचा विस्तार होत जातो. वडाच्या पानाचा उपयोग जेवणासाठी पत्रावळींसाठी करतात. तसंच याची मुळे, पाने, फुले आणि चीक तसंच साल या सगळ्याचा उपयोग औषध म्हणून करण्यात येतो. इतकंच नाही तर त्याचे केशवर्धक म्हणूनही करतात. तसंच याच्या पारंब्या शिकेकाईमध्ये घालून पाणी उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास, केसांच्या वाढीसाठी उपयोग होतो. त्यामुळे वडाच्या झाडांमध्ये पोषक तत्व असतात.

वाचा – Health Benefits Of Peepal Leaves In Marathi

वडाच्या झाडाबाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी ( Facts About Banyan Tree In Marathi)

ADVERTISEMENT

Vadachya Zadachi Mahiti

वडाच्या झाडाचं पौराणिक महत्त्व तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण काही महत्त्वाच्या गोष्टी मात्र आपल्याला माहिती नसतात. त्याच काही महत्त्वाच्या गोष्टी आपण इथे जाणून घेऊया – 

  • पूर्ण वाढलेले वडाचे झाड हे एका तासाला साधारण सातशे बारा किलो इतक्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडते
  • वडाच्या  झाडाखाली तुम्ही जितक्या जास्त वेळ बसता तितका जास्त वेळ तुमच्या शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन तुम्हाला मिळतो
  • वडाच्या काटक्यांचा उपयोग हा होमहवनामध्ये आणि यज्ञामध्ये समीधा म्हणून करण्यात येतो. तसंच वडाच्या प्रत्येक फांदी, पारंबी आणि पानामधूनही नवीन वटवृक्ष जन्माला येतो. त्यामुळे या वृक्षाला अक्षयवट असं म्हणतात. त्यामुळेच वटपौर्णिमेला वडाचं पूजन केलं जातं
  • वडाची उंची साधारण तीस मीटरपर्यंत असते. तसाच हे झाड सदापर्णी आहे. अर्थात हे झाड कधी सुकत नाही. 
    वडाचा चीक हा दातदुखी, संधीवात तसंच तळपायाच्या भेगांवर फायदेशीर ठरतो
  • वडाच्या सालीचा काढा हा मधुमेहावर गुणकारी ठरतो. तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुम्ही नियमित हा काढा करून प्या. लवकरच तुमचा मधुमेहाचा आजार दूर होईल
  • विंचवाचे विष काढण्यासाठीही तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. तसंच पायावर भिंगरी अथवा चिखल्या झाल्यास, तुम्ही वडाचा चीक लावू शकता
  • तुमच्या शरीरात अचानक लचक भरल्यास किंवा सांधे दुखत असल्यास, वडाची पानं लावून थोडी गरम केल्यास, त्या दुखणाऱ्या भागावर लावा. असं केल्याने सांधे मोकळे होऊन बरे होतात
  • ताप कमी होण्यासाठी वडाच्या झाडाच्या पारंब्यांचा रस देतात. यामुळे घाम येऊन शरीरातील ताप निघून जाण्यास मदत होते
  • पोटात जंत झाल्यास, पारंब्याचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस देण्यात येतो. तसंच तुम्हाला आव अथवा अतिसार झाल्यास, तुम्ही ताकामध्ये  मिसळून हे घेतल्यास लवकर बरं होतं

घरच्या झाडांची काळजी कशी घ्यावी

वडाच्या झाडाचे 15 आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Banyan Tree In Marathi)

वडाच्या झाडामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. अगदी तुमच्या त्वचेपासून ते तुमच्या शरीरातील अन्य समस्यांसाठीही वडाच्या फांद्यापासून ते अगदी सालीपर्यंत सर्वाचा उपयोग करून घेता येतो. तुम्हाला जर याचे संपूर्ण फायदे माहीत नसतील.  तर आम्ही तुम्हाला याविषयी पूर्ण माहिती देत आहोत – 

ADVERTISEMENT

गुळवेल म्हणजे जणू अमृतच (Benefits of Giloy In Marathi)

1. चेहरा उजवळण्यासाठी (To Improve Facial Glow)

Banyan Tree Information In Marathi

चेहरा उजळवण्यासाठी तुम्हाला वडाच्या पानांचा उपयोग करून घेता येईल. वडाची 5-6 पानं घ्या आणि त्यामध्ये साधारण 10-20 ग्रॅम लाल डाळ मिक्स करून वाटून घ्या. त्यानंतर ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची समस्या असेल तर यामुळे बरी होते. त्याशिवाय तुम्ही जर वडाची पिकलेली पानं, जास्वंदीची पानं आणि लाल चंदन पाण्यात एकत्र करून वाटलं आणि त्याची पेस्ट चेहऱ्याला लावलीत तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स निघून जाण्यासही मदत होते.  तसंच तिसरा उपयोग म्हणजे तुम्ही पिकलेली वडाची पानं घ्या, त्यामध्ये कमळाचं फूल आणि केशर घाला. पाण्यासह याची पेस्ट बनवून घ्या आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावा. यामुळे तुमचा चेहरा अधिक उजळतो आणि चमकदार बनतो.

ADVERTISEMENT

मेथी दाण्याने होतं वजन कमी आणि केस होतात सुंदर, जाणून घ्या फायदे 

2. कानाच्या समस्येवर उपाय (Cures Ear Problem)

Vadachya Zadachi Mahiti

कानाच्या समस्या असतील तर त्यावरदेखील तुम्हाला वडाच्या चीकाचा उपयोग करून घेता येतो. त्यासाठी तुम्ही काही थेंब वडाचा चीक घ्या त्यामध्ये मोहरीचं तेल मिक्स करा. याचे 2-2 थेंब तुम्ही कानामध्ये घाला. यामुळे तुमच्या कानात गेलेले किटाणू मरून जाण्यास मदत होते. तसंच तुम्हाला कमी ऐकायला येत असेल तर हे किटाणू मेल्याने तुमचे कानही व्यवस्थित साफ होतात आणि समस्या सुटण्यास मदत होते. 

ADVERTISEMENT

3. केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय (Treatment For Hair Problems)

Banyan Tree Information In Marathi

केसांच्या समस्या तर प्रत्येकालाच असतात. त्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण त्यामध्ये तुम्ही जर वडाचा उपयोग करून पाहिलात तर तुम्हाला लवकर त्याचा परिणाम दिसून येईल. अनेक उपाय करून आपण थकतो. तुम्ही वडाच्या पानांची राख करा आणि साधारण 20 ग्रॅम ही राख घ्या त्यामध्ये तुम्ही लीनसीड ऑईल घाला. नंतर याचं मिश्रण करून तुम्ही तुमच्या डोक्याला लावा आणि मसाज करा. यामुळे तुम्हाला केसगळतीची समस्या असेल तर ती जाऊन पुन्हा नव्याने केस उगवू लागतील. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही वडाची मऊ पानं काढा. ती व्यवस्थित वाटून घ्या. त्यामध्ये मोहरीचं तेल घाला. हे तुम्ही तेलात व्यवस्थित उकळून घ्या. नंतर थंड करून केसांना लावा. केसांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग होतो. तुम्ही केसांवर तिसरा उपायदेखील करू शकता. त्यासाठी  तुम्ही वडाची मूळं आणि तीळ समान मात्रेत घ्या. दोन्ही नीट वाटून घ्या आणि केसांना लावा. साधारण अर्धा तास तसंच ठेवा आणि मग त्यावर नारळ आणि भृंगराज तेल लावून मसाज करा. तुमच्या केसांच्या वाढीसाठी हा एक उत्कृष्ट उपाय आहे. 

4. नाकातून येणारं रक्त थांबवण्यासाठी (Treats Nasal Bleeding)

ADVERTISEMENT

Vadachya Zadachi Mahiti

वातावरण बदलतं तसं बऱ्याच जणांना नाकातून रक्त येण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. विशेषतः थंडीच्या दिवसात. मग अशावेळी नक्की काय उपाय करायचा याची कल्पना नसते. तर यावर तुम्ही नक्कीच घरच्या घरी उपचार करू शकता. ताकासह तुम्ही वडाच्या मूळाची साधारण 3 ग्रॅम पावडर मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही प्यायलात तर तुमच्या नाकातून येणारं रक्त थांबवण्यास याची मदत होते. सर्वात सोपा आणि लवकरात लवकर रक्त थांबवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. 

5. दाताच्या समस्येवर (Tooth Problems)

Banyan Tree Information In Marathi

ADVERTISEMENT

दाताच्या समस्येवर वडाच्या सालांचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. साधारण 10 ग्रॅम सालीची पावडर, 5 ग्रॅम केटचू आणि 2 ग्रॅम काळी मिरी एकत्र वाटून नीट पावडर करून घ्या. ही पावडर घेऊन तुम्ही ब्रशने दात घासा. तसंच तुमचे दात दुखत असतील. तर तुम्हाला यातून सुटका मिळेल. तसंच तुम्ही हा चीक कापसाच्या मदतीने दाताला लावल्यास तुम्हाला लवकर आराम मिळतो. तसंच दातांना काही इन्फेक्शन झालं असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. 

वाचा – Home Remedies For Toothache In Marathi

6. अति लघवी होत असल्यास त्यावरील उपचार (Treats Excessive Urination)

तुम्हाला जर अति लघवीचा त्रास होत असेल तर तुम्ही वडाच्या झाडांच्या बियांची व्यवस्थित पावडर करून घ्या. त्यातील साधारण 1-2 ग्रॅम पावडर दिवसातून दोन वेळा गायीच्या दुधात घालून प्या. हा डोस कायम ठेवा. त्यामुळे तुम्हाला याचा त्रास कमी होईल. 

वारंवार लघवी होण्याच्या समस्येवर घरगुती उपचार

ADVERTISEMENT

7. मधुमेहाकरिता (For Diabetes)

Vadachya Zadachi Mahiti

सध्या मधुमेहाची समस्येबद्दल खूप जास्त ऐकू येतं. त्यासाठी तुम्ही वडाच्या झाडाच्या सालीची पावडर करा. साधारण 20 ग्रॅम पावडर अर्धा लीटर पाण्यामध्ये मिसळा आणि उकळवा. हे मिश्रण सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही घ्या. साधारण एक महिना तुम्ही हे सतत करा. त्यामुळे तुमचा मधुमेह बरा होईल. मधुमेह हा सध्याच्या लाईफस्टाईलमुळे पटकन कोणालाही होतो. त्यामुळे तुम्हाला यापासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही नक्की वडाच्या सालीच्या पावडरीचा वापर करा. 

8. अतिसरावर उपाय (Treats Diarrhoea)

अतिसारावरदेखील याचा उपयोग करू शकता.  तुम्ही साधारण 6 ग्रॅम वडाची पावडर घ्या आणि 100 मिली पाण्यात उकळा. त्यामध्ये थोडी साखर मिसळा. ताक पिऊन झाल्यावर तुम्ही हे मिश्रण रूग्णाला द्या. अतिसारावर याचा लगेच परिणाम होतो. तुम्हाला त्वरीत परिणाम हवा असेल तर तुम्ही याचा उपयोग नक्की करून पाहा. 

ADVERTISEMENT

9. नॉशियावर करतो उपचार (Treatment Of Nausea)

वडाचे झाड – Banyan Tree Information In Marathi

वडाची साधारण काही पानं घ्या आणि त्याचबरोबर 7 लवंग घ्या. पाण्यात व्यवस्थित वाटून घ्या. त्यानंतर हे तुम्ही नॉशिया असणाऱ्या अर्थात ज्याला मळमळ व्हायचा त्रास होतो त्या रूग्णाला द्यावा. वास्तविक काही जणांना सकाळीच उठल्यावर या गोष्टीचा त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला जर असा त्रास होत असेल तर तुम्ही याप्रमाणे उपाय करून बघा. 

10. मूत्रविकारावर इलाज (Cure For Urinary Disorders)

तुम्ही यासाठी वडाची ताजी पावडर आणि साखर घ्या. ताज्या पाण्यात व्यवस्थित मिक्स करून याचं मिश्रण बनवा अथवा तुम्ही वडाच्या मूळाची पावडर 4 ग्रॅम घ्या आणि दिवसातून दोन वेळा ताज्या पाण्यात मिक्स करून प्या. तुम्हाला वाटणारा अशक्तपणा आणि मूत्रविकाराचा त्रास यामुळे नक्की कमी होईल. यामध्ये पोषक तत्व आणि मिनरल्स असतात. त्यामुळे तुम्हाला मूत्रविकाराचा त्रास असल्यास, तुम्ही हे नक्की करून पाहा.  

ADVERTISEMENT

11. डोळ्यांची सूज करतं कमी (Treats Swelling Of Eyes)

Vadachya Zadachi Mahiti

सतत काम आणि सतत मोबाईवर अथवा लॅपटॉपवर काम करण्याने आजकाल डोळयांवर अथवा डोळ्यांखाली सूज येणं हे खूपच कॉमन झालंय. पण त्यासाठी तुम्हाला वडाच्या चीकाचा उपयोग करता येऊ शकतो. तुम्ही थोडा चीक घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे मध मिसळा आणि 125 ग्रॅम चांफोर मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही तुमच्या डोळ्यांवर लावा. तुमच्या डोळ्यांवरील सूज कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. 

12. अल्सरवर गुणकारी (Helpful In Severe Ulcers)

अल्सरमुळे शरीराला जास्त त्रास होत असतो. अल्सरसाठी वडाची पानं घेऊन पाण्यात उकळवा आणि नंतर त्याती पेस्ट करा त्यामध्ये तीळाच्या तेलामध्ये तुम्ही हे गरम करा. अल्सरसाठी हे खूपच गुणकारी आहे. हे तेल तुम्ही दिवसातून 2-3 वेळा अल्सरवर लावा आणि यामुळे अल्सर त्वरीत बरं करण्यासाठी याचा उपयोग होतो.

ADVERTISEMENT

13. खाजेवर करू शकता उपाय (Treats Itching)

Banyan Tree Information In Marathi

साधारण अर्धा किलो वडाची पानं घ्या आणि ती साधारण 4 लीटर पाण्यात रात्रभर ठेवा. त्यानंतर सकाळी ते पाणी एक लीटर होईपर्यंत उकळवा. त्यामध्ये अर्धा लीटर मोहरीचं तेल मिसळा आणि हे तेल तुम्ही नीट बाटलीत भरून ठेवा. या तेलाने मसाज करा. तुम्हाला कोरड्या जागेवर अथवा ओल्या जागेवर कुठेही खाज आल्यास, तुम्हाला याचा वापर करता येऊ शकेल. 

14. रक्तस्राव थांबण्यास होते मदत (Helpful In Bleeding Diathesis)

बऱ्याचदा काही जणांना अंगावरून रक्त जाण्याचा खूपच त्रास होतो अशावेळी वडाच्या झाडाची पानं उपयोगाला येतात. तुम्ही साधारण 20-25 पानं वाटून त्याची पेस्ट करून घ्या. या पेस्टमध्ये मध आणि साखर घालून मिक्स करून ही पेस्ट खायला द्या. यामुळे त्वरीत रक्तस्राव थांबण्यास मदत होईल. 

ADVERTISEMENT

15. भाजलेल्या जागी करू शकता उपयोग (Cures Burn)

बऱ्याचदा आपण काम करत असताना विशेषतः स्वयंपाकघरात काक करताना आपला हात भाजतो अथवा तेल अंगावर उडून भाजतं. पण त्यावेळी आपण पटकन जो उपाय सुचेल तो करतो. अशावेळी तुम्ही त्वरीत परिणाम होण्यासाठी दह्यात वडाची पानं मिसळून त्याची पेस्ट भाजलेल्या ठिकाणी लावा. तुम्हाला त्वरीत आराम मिळेल. जळजळ कमी होईल. 

वडाच्या झाडामुळे होणारे दुष्परिणाम (Side Effects Of Banyan Tree In Marathi)

Vadachya Zadachi Mahiti

तसं तर वडाच्या झाडामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. कोणतंही वैज्ञानिक कारणही नाही. पण कोणतीही गोष्ट वापरण्याआधी त्याचा संतुलित मात्रामध्ये प्रयोग करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 

ADVERTISEMENT
  • तुम्ही कोणत्याही प्रकारच्या औषधाचा शरीरासाठी अर्थात आरोग्यासाठी उपयोग करत असाल तर तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. याचा कोणताही दुष्परिणाम तुम्हाला होऊ न देण्यासाठी ही काळजी घ्या. 
  • तुम्हाला जर वडाच्या साल, मूळ, पानं अथवा चीकापासून कोणत्याही प्रकारची अलर्जी असेल तर त्याचा उपयोग त्वरीत बंद करा आणि डॉक्टरांकडे  वेळीच जा. 

प्रश्नोत्तरं (FAQ’s)

1. वडाच्या झाडाच्या सर्व गोष्टींपासून आरोग्याला फायदे होतात का?

वडाच्या झाडाचे मूळ, पानं, फळं या सगळ्याचा आपल्या आरोग्यासाठी फायदाच होतो. त्याच्या प्रत्येक गोष्टीपासून वेगवेगळ्या आजारांसाठी औषध तयार होतं. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता. 

2. दातदुखीसाठी याचा काय उपयोग होतो?

तुम्हाला दातांमधून कळा येत असतील अथवा दातदुखी असेल तर तुम्ही त्वरीत गुण मिळण्यासाठी वडाच्या झाडाचा चीक लावल्यास लगच परिणाम दिसून येईल. 

3. सांधेदुखीसाठी गुणकारी आहे का?

वडाच्या झाडाची पावडर ही सांधेदुखीवर नक्कीच गुणकारी आहे. सांधे दुखत असल्यास, तुम्ही वडाची पानं गरम करून सांधे शेकवल्यास, तुम्हाला त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. 

10 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT