ADVERTISEMENT
home / मनोरंजन
middle-age-actress-actors-new-trend-in-marathi-tv-serial-in-marathi

प्रेक्षक आहेत जुन्या अभिनेत्रींच्या प्रेमात, कमबॅक करणाऱ्या अभिनेत्रींच्या मालिकांना अधिक प्राधान्य

मराठी मालिका आणि प्रेक्षकांचं एक अतुट नातं आहे. मराठी मालिकेचा विषय आवडो वा न आवडो प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी साधारण 6 नंतर टीव्हीवर मराठी मालिका पाहिल्या जातातच. त्यामध्येही सध्या अल्लड नायिकांपेक्षा मध्यमवयीन गृहिणी आणि अशा संबंधित विषयांवरील मालिका जास्त पाहिल्या जात असलेल्या दिसून येत आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कमबॅक करणाऱ्या अभिनेत्रींच्या मालिकांना प्रेक्षक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. घरातील गृहिणी त्यांच्याशी आपलं नातं जोडताना दिसून येत आहे. मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) (आई कुठे काय करते), शिल्पा तुळसकर (Shlipa Tulaskar Shetty (तू तेव्हा तशी), माझी तुझी रेशीमगाठ (Prarthana Behere) (प्रार्थना बेहेरे), उर्मिला कोठारे (Urmila Kothare) (तुझेच मी गीत गात आहे) या सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. 

तरूणांच्या रोमान्सपेक्षा घरगुती विश्वात रमत आहेत प्रेक्षक 

तरूण – तरूणींचा रोमान्स, सासू – सुनेची तक्रार, लग्न याभोवती गुंफलेल्या कथांपेक्षा आता मध्यमवयीन अभिनेत्री, गृहिणी, ऑफिसमधील काम करणाऱ्या महिला यासंबंधित गोष्टी मालिकांमधून समोर येत असल्यामुळे आणि आपल्या आवडत्या अभिनेत्री पुन्हा दिसू लागल्यामुळे तसंच वेगवेगळ्या कथांमुळेही आता प्रेक्षक अशा मालिकांकडे अधिक आकर्षित होताना दिसून येत आहेत. सतत कॉलेजवयीन मुलांच्या मालिका बघून अथवा तरूण – तरूणींच्या कथा पाहण्यापेक्षा आपल्याशी संबंधित काहीतरी असं वेगळं जेव्हा कथांमधून समोर येत आहे तेव्हा प्रेक्षकांना ते अधिक भावताना दिसून येतंय. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तेच तेच अल्लड चेहरे पाहण्यापेक्षा पूर्वीचे नावाजलेले चेहरे पाहणं प्रेक्षकांना अधिक चांगलं वाटतंय असंच या मालिकांना मिळत असलेल्या टीआरपीवरून दिसून येत आहे. या अभिनेत्रींचा कमबॅक प्रेक्षकांना हवाहवासा वाटत असलेलाच आता दिसून येत आहे. 

35-40 च्या नायिका आपल्याशा 

साधारण याच वयोगटातील महिला घरात टीव्हीवर मालिका पाहताना दिसून येतात. त्यामुळे या वयोगटातील अभिनेत्रीदेखील त्यांना अधिक आपल्याशा वाटतात. त्यांच्या व्यतिरेखाही अगदी आपल्या जवळच्या आणि वास्तवातील असल्यासारखे गृहिणींना वाटत असल्यामुळेच या मालिका सध्या गाजताना दिसून येत आहे. तसंच बऱ्याचदा नव्या चेहऱ्यांपेक्षा जुन्या अभिनेत्रींचा कसलेला अभिनय आणि सहजाभिनय प्रेक्षकांना अधिक जवळचा वाटतो. त्यामुळेच मालिकांमध्ये हा ट्रेंड सध्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यमवर्गीय महिलांचा त्रास या मालिकांमधून सहज दिसून येतो. ऑफिस, घरकाम आणि घर सांभाळण्याची कसरत हे सर्वच त्यांना या मालिकांमधून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. तर कायम संसारात रमून केवळ कुटुंबासाठी झटणाऱ्या या महिलांना आपणही आता स्वतःची ओळख निर्माण करावी असा विश्वासही या मालिकांमधून दर्शविण्यात येत असल्यामुळे अशा मालिका आता अधिक पाहिल्या जातात आणि त्यामध्ये नायक – नायिकांसह अन्य कथानकांचे संबंध जोडून सामान्य माणसाच्या आयुष्यातील गोष्टी गुंफल्या जात असल्यामुळे एक आपलेपणा निर्माण झालेला दिसून येत आहे. प्रेक्षकांची नस सध्या मालिकेच्या कथाकार आणि निर्मात्यांनी अचूक पकडली आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. 

मध्यमवयीन जोड्यांमुळे पुरूषही मालिकांकडे होतात आकर्षित 

मालिकेतील नायक आणि नायिका या मध्यमवयीन असल्यामुळे एका ठराविक वेळेत संध्याकाळी ऑफिसमधून घरी येणारे पुरूषही या मालिकातील कथांकडे आकर्षित होताना दिसून येत आहे. करिअर, मूल आणि इतर गोष्टींमुळे संसारात होणारी ओढाताण, करिअरमुळे पुढे जाणारे लग्न असे वेगवेगळे विषय आजकाल मालिकांमध्ये हाताळले जात असल्यामुळे पुरूष प्रेक्षकांनाही या मालिका आपल्याकडे आकर्षित करून घेत आहेत असं म्हणायला हरकत नाही. 

ADVERTISEMENT

सध्याचा हा ट्रेंड एकंदरीतच मालिका आणि अभिनेता – अभिनेत्रींसाठी फायद्याचा ठरतोय हे नक्की!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT