ADVERTISEMENT
home / आरोग्य
mild-parenting-is-constantly-evolving-style-says-experts-in-marathi

सौम्य पालकत्व म्हणजे सातत्याने विकसित होणारी शैली, तज्ज्ञांचा सल्ला

आपण बाळाच्या जन्माचे नियोजन करतो (किंवा काहीवेळा नाही). परंतु आपण पालकत्वाच्या शैलीचे मात्र नियोजन करू शकत नाही, तुमची पालकत्व शैली ही नैसर्गिकरीत्या विकसित होत जाते. तुमच्या बाळाच्या वर्तणुकीनुसार तुमची पालकत्व शैली तयार होत असते. यासंदर्भात आम्ही पल्लवी उतागी, संस्थापक आणि सीईओ, सुपरबॉटम्स यांच्याकडून जाणून घेतले.  पल्लवी यांनी सांगितले की, ‘जेव्हा मी बाळाची अपेक्षा करीत होते, तेव्हा मी बाळाला सहज सांभाळू शकेन असा आत्मविश्वास होता. पण जसे, तुम्ही बाळाचे पालकत्व तोपर्यंत करू शकत नाही, जोपर्यंत बाळाच्या पालकत्वासाठी पूर्ण तयार नसता. मला हे तेव्हा  शिकायला मिळाले जेव्हा मी पाहिले की माझा मुलगा त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा कितीतरी जास्त भावनिक प्रतिक्रिया देत होता. त्याचे ‘नखरे ‘ आणि ‘खोड्या’ झेलण्यासाठी मी स्वतःला तयार केले होते…पण पालकत्व हाताळण्यासाठी नाही. 

पालकत्वाच्या शैलींवर संशोधन

प्रत्येक पालक हा वेगळा असतो कारण त्यांची मुलं वेगळी असतात, हे सत्य आहे. अनेकदा मग पर्यायी पालकत्वाच्या शैलींवर संशोधन सुरू करण्यात येते. अशा वेळी अतिसंवेदनशील मुलाचे व्यवस्थापन योग्यपणे कसे करावे हेदेखील शिकण्याची गरज भासते. सौम्य पालकत्व ही एक अशी शैली आहे जी मुले जशी आहेत हे स्वीकारणे आणि त्यांना सर्वोत्तम बनवण्यासाठी त्यांचे पालनपोषण करणे शिकवते. हे एक सजग पालकत्व तंत्र आहे जे मुलाच्या गरजांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणे आणि न पूर्ण झालेल्यांना जाणीवपूर्वक प्रतिसाद देण्यास सुचवते. सौम्य पालकत्व हे चार स्तंभावर उभे आहेत – सहानुभूती, आदर, समजून घेणे आणि मर्यादा. बाळाशी तणावपूर्ण न वागता, त्यांच्याशी करण्यात येणारे वर्तन हे आपल्याला भविष्यामध्ये सुधारण्यासाठी आणि त्रास टाळण्यासाठी समस्येचे मूळ कारण समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षा करणे किंवा तीव्र प्रतिक्रिया देणे हे मुलांना अजिबात सहन होत नाही. त्याचे परिणाम नक्कीच चुकीचे ठरू शकतात. अशा अप्रिय परिणामांना टाळण्यासाठी एखाद्या विशिष्ट मार्गाने जाण्यास मोठ्या प्रमाणावर पालकत्व प्रवृत्त करते.   

आपले वर्तन योग्य असावे 

सौम्य पालकत्व हे या तत्वावर आधारित आहे की, आपली लहान मुले ही नेहमी पालकांच्या क्रियांचे परावर्तन करतात. त्यामुळे आपल्याला मुलांकडून जे वर्तन अपेक्षित आहे त्याच प्रकारच्या वर्तनाचा नमुना आपण त्यांना दाखवायला हवा आणि त्यांच्यासाठी एक सकारात्मक परावर्तक म्हणून कार्य करावे.  मुलांची भावनिक परिपक्वता ही अजून विकसित होत आहे हे समजून घेणे हे देखील आवश्यक आहे. म्हणूनच आपण जे वर्तन प्रौढ व्यक्तींकडून अपेक्षित करतो ते लहान मुलांच्या भावनिक मर्यादेपलीकडे आहे. सौम्य पालकत्व दृष्टीकोन हा पालकांना त्यांच्या अपेक्षा हे मुलाचे वय आणि परिपक्वता पाहून ठरवायचे आवाहन करतो.  

वाढत्या वयाप्रमाणे शैली होते विकसित 

सौम्य पालकत्व म्हणजे लहान मुलांची प्रत्येक गोष्ट समजून घेऊन पालकत्व निभावणे. तुमच्या मुलाला चांगल्या पद्धतीने गोष्टी करण्यास शिकवतात आणि प्रोत्साहित करतात अशाच गोष्टींचे उदाहरण साधारणतः तुम्ही त्यांच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. उदाहरणार्थ, मुलाला  टीव्ही उशिरापर्यंत पाहण्याऐवजी लवकर झोपायला लावणे – त्यामुळे, तो वेळेत उठतो आणि घाई न करता शाळेसाठी तयार होतो. आदर्शपणे मुलांना अधिक शिस्तबद्ध आणि गोंधळरहित जीवनाकडे नेण्यासाठी तुमची ही पालकत्व शैली विकसित होत जाते.  त्यांच्या गरजांसोबत जाणीवपूर्वक राहून तुम्हाला मुलांमध्ये कोणते गुण असायला हवेत यावर लक्ष द्यायला हवे असे सौम्य पालकत्व प्रामुख्याने ध्यान केंद्रित करते. संशोधनातून सिद्ध झाले आहे की, पालक आणि मूल यांच्यात सकारात्मक बंध असतील तर मूल त्यामुळे आनंदी, स्वतंत्र आणि मानसिकदृष्ट्या प्रौढ बनते.   नाओमी अल्डॉर्ट यांनी जसे म्हटले आहे,” मुलांना आपण त्यांना आपण आकार द्यावा हे अपेक्षित नसते, त्यांना जे जसे आहेत त्यात प्रतिसाद देणे आवश्यक असते.” 

ADVERTISEMENT

तुम्हीही तुमच्या मुलांच्या विकासासाठी सौम्य पालकत्वाचा आधार घेतल्यास, पुढची पिढी चांगली घडण्यासाठी नक्कीच मदत मिळू शकते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

01 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT