मराठी असो वा हिंदी कलाकार हे बरेचदा वेळ न पाळणं किंवा शूटला उशीर करणं यासाठी चर्चेत असतात. पण काही कलाकार याला नक्कीच अपवाद असतात. जे आपल्या प्रोफेशनलिजममुळे सगळ्यांसमोर आदर्श ठेवतात. त्यापैकीच एक मराठी आणि हिंदीत गाजलेलं नाव म्हणजे मिलिंद गुणाजी. मागच्याच वर्षी मिलिंद गुणाजी यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या ऐतिहासिक पानिपत चित्रपटात दत्ताजी शिंदे यांची भूमिका केली होती. आता बऱ्याच कालावधीनंतर ते मराठी चित्रपटात दिसणार आहेत. मिलिंद आगामी गोष्ट एका पैठणीची या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
मिलिंद यांचं प्रोफेशनलिज्म
या चित्रपटाच्या सेटवर अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी शिस्तीचा एक वस्तूपाठ घालून दिला आहे. या चित्रपटाची संहिता मिलिंद यांनी चित्रीकरणापूर्वीच मागवून घेतली आणि दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ते बँकॉकला गेले. त्या चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यावर ते ठरल्यानुसार गोष्ट एका पैठणीच्या सेटवर दाखल झाले. त्यावेळी त्यांचे सर्व संवाद तोंडपाठ होते. त्यांच्या शिस्तबद्ध वागण्याने सर्वजण थक्क झाले आहेत.
मिलिंद यांचं वागणं आहे प्रेरणादायी
मिलिंद गुणाजी यांचं या चित्रपटात इनामदार असं भूमिकेचं नाव आहे. बायकोवर मनापासून प्रेम करणारा, तिच्या आदेशाने सगळी कामं करणारा, प्रेम करणारा खानदानी असा हा माणूस आहे, या चित्रपटात ते साकारत आहेत. इनामदार या भूमिकेसाठी मिलिंद गुणाजी यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय चपखल दिसणार आहे. त्यांचा आवाज, उंची, अभिनयाच्या जोरावर ते या भूमिकेला नक्कीच न्याय देतील. तसंच त्यांचं शिस्तबद्ध वागणंही प्रेरणादायी आहे, असं निर्माता अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितलं.
मागच्या वर्षी गुणाजी यांनी एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात क्वीन ऑफ झांसीमध्येही गंगाधर राव ही भूमिका केली होती. तसंच त्यांनी आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. ज्यामध्ये द्रोहकाल, फरेब, विरासत आणि देवदास यांसारख्या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. मिलिंद गुणाजी यांनी आत्तापर्यंत केलेल्या बऱ्याचश्या भूमिका या ग्रे शेडच्या असल्यामुळे गोष्ट एका पैठणीची मधील त्यांची भूमिकाही ग्रे असणार की वेगळी असणार याबाबत नक्कीच उत्सुकता आहे.
‘बस्ता’तील अजयनं गायलेलं ‘फुल झुलत्या येलीचं’ गाणं रिलीज
“गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाची निर्मिती प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स करत आहेत. अक्षय बर्दापूरकर चित्रपटाचे निर्माते आहेत. तर शंतनू रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी यांच्यासह मिलिंद गुणाजींची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तसंच या चित्रपटात सध्या मन हे बावरे या मालिकेतील अभिनेता शशांक केतकर असल्याचीही चर्चा आहे. काहे दिया परदेस मालिकेतून घराघरात पोचलेली सायली संजीव ही अभिनेत्री सध्या मराठी चित्रपटात स्थिरावली आहे. तिचे बॅक टू बॅक अनेक चित्रपट येत आहेत. त्यापैकीच एक हा चित्रपट आहे. सुव्रत आणि सायलीची जोडी मन फकिरा या चित्रपटातही दिसणार आहे.
प्रेक्षकांपर्यंत न पोहचू शकलेला ‘दाह : एक मर्मस्पर्शी कथा’
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.