ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Lovestory : मिलिंद सोमण आणि अंकिता कोन्वर

Lovestory : मिलिंद सोमण आणि अंकिता कोन्वर

प्रेम पडल्यावर मनात वय आणि इतर गोष्टींबाबतचे प्रश्न निर्माण होत नाहीत. एकदा प्रेमात पडलं की, फक्त समोरचा माणूस दिसतो. असंच काहीस आहे मॉडेल-अॅक्टर मिलिंद सोमण (Milind Soman) ने अंकिता कोन्वर (Ankita Konwar) यांचं. ज्यांनी 2018 मध्ये लग्न केलं आणि तेव्हापासूनच हे #tulapahtere जोडपं चर्चेत असतं. नुकतीच अंकिताने त्यांची इंटरेस्टींग लव्हस्टोरी इंस्टाग्रामवर शेअर केली. अंकिता मिलिंद सोमणपेक्षा तब्बल 26 वर्षाने छोटी आहे. 53 वर्षीय मिलिंद सोमण (Milind Soman) ने 27 वर्षीय अंकिता कोन्वर (Ankita Konwar) शी लग्न केल्यावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यात काहींचा टीकेचा सूरही होता. पण आता मात्र त्यांच्या जोडीला पसंती मिळतेय.

त्यांच्या लव्हस्टोरी, लग्न आणि सहजीवनाचा प्रवास सांगणारी पोस्ट अंकिताने मीडिया ब्लॉग ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ वर शेअर केली. जी सध्या खूपच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितलं की, तिची मिलिंद सोमणशी पहिली भेट कशी झाली आणि मग कशी सुरू झाली त्यांची प्रेमकहाणी

अशी सुरू झाली अंकिता मिलिंदची प्रेमकहाणी

milind %281%29

अंकिता कोन्वर (Ankita Konwar) ने आपल्या या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, मी तर देश सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि एअर एशियामध्ये काम करायला सुरूवात केली. मी मलेशियाच्या केबिन क्रूमध्ये होते. याच दरम्यान माझ्या बॉयफ्रेंडचं अचानक निधन झालं होतं. या प्रसंगामुळे मी कोलमडून गेले होते. काही महिन्यांनंतर माझं पोस्टींग चैन्नईला झालं. मी आपल्या कलिग्ज्सबरोबर एका हॉटेलमध्ये राहत होते. याचवेळी मी पहिल्यांदा मिलिंदला पाहिलं. मी त्याची खूप फॅन होते. मला त्याला हॅलो करायचं होतं पण तो बिझी होता. काही दिवसानंतर मी त्याला पुन्हा हॉटेलच्या नाईट क्लबमध्ये पाहिलं.

ADVERTISEMENT

milind ankita 1

मी त्याच्याकडे पाहत होते आणि तो माझ्याकडे पाहत होता. माझ्या मित्रांनी मला सांगितलं की, तू त्याच्याशी जाऊन बोल. मग मी जाऊन मिलिंदशी बोलले आणि त्याला माझ्यासोबत डान्स करण्याबाबत विचारले. तोही तयार झाला. त्याचवेळी मला आमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे व्हाईब्स जाणवले होते. पण मला पुन्हा कोणामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नव्हतं. त्यामुळे मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण त्याने लवकरच माझा शोध घेतला आणि माझा नंबर मागितला. पण माझा नंबन नवीन असल्यामुळे तो मला पाठ नव्हता. काही दिवस होऊन गेल्यावरही माझ्या डोक्यातून मिलिंद जात होता. मी त्याला मेसेज केला आणि एक आठवड्यानंतर आम्ही एकत्र डिनरला गेलो. त्यानंतर आम्ही दोघंही एकमेकांच्या टचमध्ये होतो आणि भेटत होतो.   

मुलींना आवडतात वयस्क पुरुष, चित्रपट मालिकांमध्ये दिसतोय ट्रेंड

अंकिताच्या मनात होती शंका

पण यानंतरही अंकिताला संकोच वाटत होता. पण एक दिवस तिने मिलिंदला सांगितलं की, माझ्या आधीच्या बॉयफ्रेंडच्या आठवणी नेहमीच माझ्यासोबत राहतील. तेव्हा मिलिंद म्हणाला की, मी जेव्हा तुझ्यावर प्रेम केलं तेव्हा तुझ्याशी निगडीत सर्व गोष्टीही त्यात सामील झाल्या. तू घाबरू नकोस आता आपण एकत्र आहोत. त्यावेळी मला जाणीव झाली की, मिलिंद फक्त माझ्यासाठी बनला आहे.  

ADVERTISEMENT

लग्नाचा निर्णय

लग्नाचा निर्णय घेण्याआधी आम्ही पाच वर्ष एकमेंकाना डेट करत होतो. आमच्या वयाच्या अंतरामुळे आमचे कुटुंबिय हैराण होते. पण आमच्यासाठी हा मुद्दा गौण होता. जेव्हा आमच्या घरच्यांनी आम्हाला एकमेकांसोबत आनंदात पाहिलं तेव्हा तेही या लग्नासाठी तयार झाले. अशाप्रकारे अंकिताने आपल्या प्रेम ते लग्नाचा प्रवास लोकांसमोर मांडला. यात तिने मिलिंदशी तीन वेळा तीन ठिकाणी लग्न केल्याचंही लिहीलं आहे. एक म्हणजे अलिबाग इथलं डेस्टीनेशन वेडींग, दुसरं स्पेनमध्ये झऱ्याखाली आणि तिसरं एंड ऑफ द वर्ल्ड नावाच्या ठिकाणी. काही दिवसांपूर्वीच या दोघांचे मालदीव्समधल्या बीच वेकेशचे हॉट आणि रोमँटीक फोटोजही व्हायरल झाले होते.

हेही वाचा 

प्रेमातील विविध भाव व्यक्त करणाऱ्या सुंदर चारोळ्या

03 Jun 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT