Advertisement

DIY सौंदर्य

मिनिमल मेकअप लुक हवाय, तर वापरा ही उत्पादने

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jul 4, 2021
मिनिमल मेकअप लुक हवाय, तर वापरा ही उत्पादने

मिनिमल मेकअप (Minimal Makeup) सध्या खूपच ट्रेंडिंग आहे आणि यामागे कारणेही तशीच आहेत. मिनिमल मेकअप केल्याने त्वचेला श्वास घेणे सहज सोपे होते आणि त्वचा अधिक तजेलदार आणि तरूण दिसते. गडद मेकअप सगळ्यांनाच चांगला दिसतो असं नाही. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या नियमित वापरासाठी मिनिमल मेकअप करायचा असेल तर नक्की कोणती उत्पादने वापरायला हवीत ते आम्ही या लेखातून सांगणार आहोत. तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने या उत्पादनांचा वापर करून मिनिमल मेकअप लुक (Minimal Makeup Look ) मिळवू शकता. कोणत्याही समारंभासाठी अथवा कुठेही जाण्यासाठी तुम्हाला हा लुक नक्कीच छान दिसू शकतो. तसंच याचा वापर करायला जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही पटकन तयार होता.  

ब्रो जेल (Bro Gel)

तुमचे आयब्रो अर्थात भुवया या तुमच्या चेहऱ्याला योग्य फ्रेम मिळवून देतात आणि तुम्ही याकडे नक्कीच दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे तुमच्याजवळ आयब्रो जेल (Eyebrow Gel) असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या भुवयांवर सर्वात आधी जेलने ब्रश करून घ्या आणि नंतर तुमचा चेहरा अधिक आकर्षक दिसतो. टिंटेड आयब्रो जेल यासाठी एक अत्यंत चांगला पर्याय आहे जो तुमच्या चेहऱ्याला अधिक डिफाईंड लुक देतो. तुम्हाला अधिक मेकअप आवडत नसेल तर तुम्ही क्लिअर जेलचाही वापर करून घेऊ शकता. 

मस्कारा (Mascara)

मस्कारा तुमच्या डोळ्यांच्या केसांना केवळ कर्लच करतात असं नाही तर तुमच्या चेहऱ्याला एक वेगळा लुक मिळवून देण्यासाठीही याचा उपयोग होतो. मस्कारा तुमच्या डोळ्यांना मोठे दाखविण्यासाठी मदत करतो. तसंच तुम्ही मस्कारा केवळ सिंगल कोट (single quote mascara) लावला तरीही तुमच्या डोळ्यांमधील फरक आपोआप जाणवतो. तुम्हाला जर आयलायनर लावायचे नसेल तर तुम्ही केवळ मस्कारा वापरूनही तुमचा मेकअपलुक वेगळा करू शकता. अधिक मेकअप नको असेल तर केवळ मस्कारा, काजळ आणि न्यूड लिपस्टिक तुमचा लुक अप्रतिम करू शकते.  

कन्सीलर (Concealer)

तुमच्या त्वचेवर अधिक निशाण अथवा डाग नसतील आणि तुम्हाला लाईट कव्हरेज हवे असेल तर तुम्ही कन्सीलरचा वापर करून घेऊ शकता. जेव्हा मिनिमल मेकअप हवा असतो तेव्हा खरं तर हेव्ही बेस वा कन्सीलरची गरज भासत नाही. तुम्ही तुमच्या शेडपेक्षा 1 वा 2 शेड अधिक लाईट कन्सीलर निवडा. तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि मग बोटाने व्यवस्थित तुम्ही पसरवून घ्या आणि ब्युटी ब्लेंडरचा वापर करून ब्लेंड करा. 

ऑनलाईन फाऊंडेशन आणि कन्सीलर खरेदी करताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

पावडर फाऊंडेशन (Powder Foundation)

मिनिमल मेकअप लुकसाठी तुम्हाला अधिक गडद बेसची गरज भासत नाही. तुम्हाला कन्सीलर नको असेल तर तुम्ही पावडर फाऊंडेशन अथवा सुट्या पावडरचा वापर करा. याच्या जागी तुम्ही बीबी क्रिम अथवा सीसी क्रिमचा वापरही करून घेऊ शकता.  

लिप बाम (Lip Balm)

तुम्हाला जर लिपस्टिक लावावी असं वाटत नसेल तर तुम्ही लिप बाम लावा. तुमच्या ओठांना चमकविण्यासाठी आणि ओठांची काळजी घेण्यासाठी दोन्हीसाठी याचा उपयोग होईल. तसंच तुम्हाला लिपस्टिक खूप आवडत नसतील तर तुम्ही नक्कीच लिप बामचा वापर करू शकता.

गुलाबी रंगाचे ओठ हवे असतील तर करा घरीच Lip Balm तयार

न्यूड लिपस्टिक (Nude Lipstick)

न्यूड लिपस्टिक हा सध्याचा ट्रेंड आहे. तुमच्या बॅगमध्ये न्यूड लिपस्टिक नसेल तर तुमचा मेकअप किट अपूर्ण आहे असंच समजा. न्यूड लिपस्टिकमध्येही खूपच पर्याय आहेत. तुम्ही जर नुकतीच लिपस्टिक लावायला सुरूवात केली असेल तर तुम्ही गुलाबी अथवा ब्राऊन लिप शेड्सच्या न्यूड लिपस्टिक वापरून पाहा. तुम्हाला हव्या तशा शेड्स मिळत नसतील तर तुम्ही लिप कलर मिक्स करून नव्या शेड्स बनवा आणि वापरा.

स्किनटोननुसार परफेक्ट न्यूड लिपस्टिक कशी निवडावी

चीक टिंट (Chick Tint)

चीक टिंट सध्या खूपच ट्रेंडिंग आहे. तसंच याचा वापर करणे अत्यंत सोपे आहे. नैसर्गिक फिनिशसाठी तुम्ही ब्राईट गुलाबी शेड निवडा. तजेलदार लुकसाठी आणि मिनिमल मेकअपसाठी हा उत्तम पर्याय आहे. तसंच आयलिड्सवरदेखील तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. 

मॅट आयशॅडो पॅलेट (Matte Eyeshadow Palette)

तुम्हाला आयशॅडो लावायला आवडत असेल तर तुम्ही न्यूड मॅट आयशॅडो पॅलेटचा नियमित मिनिमल मेकअप साठी उपयोग करा. यामध्ये तुम्ही बिंज, रोझ पिंक, न्यूड ब्राऊन इत्यादी रंग मिळतात. मोठ्या आयशॅडो ब्रशच्या मदतीने तुम्ही कोणताही रंग तुमच्या आयलिड्सवर लावा आणि त्यानंतर ओल्या टिश्यूने फॉलआऊट स्वच्छ करून घ्या. त्यानंतर मस्कारा लावायला विसरू नका. 

डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी भारतातील उत्तम (Best Eyeshadow Palette In Marathi)

हायलायटर (Highlighter)

मेकअप किट हायलायटरशिवाय पूर्ण होतो का? सनकिस्ड, मिनिमल लुकसाठी हायलायटर अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या गाल, नाक आणि ब्रो बोनवर हायलायटरचा वापर करून तुमचा मिनिमल लुक पूर्ण करू शकता. यासह मस्कारा आणि न्यूड लिपस्टिक लावली की तुमचा मेकअप पूर्ण. 

मेकअपमध्ये हायलायटर लावते चार चाँद, अशी करा निवड

आयलायनर (Eyeliner)

डोळ्यांना हायलाईट करण्यासाठी आयलायनर अत्यंत गरजेचे आहे. आयलायनर आणि काजळ असेल तर इतर कोणत्याही मेकअपची गरज भासत नाही. तुम्ही लिक्विड, जेल अथवा पेन आयलायनरचा वापर करू शकता. यामध्ये तुम्ही विंग्ड, रेग्युलर, थिक लायनर असे लुकही करू शकता. तसंच यासह न्यूड लिपस्टिकचा वापर करून तुमचा लुक पूर्ण करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक